विवाह संस्कृती

साक्षगंध सोहळा म्हणजे काय? त्याला असे का म्हणतात?

2 उत्तरे
2 answers

साक्षगंध सोहळा म्हणजे काय? त्याला असे का म्हणतात?

2
विवाह संस्कारातील आद्यविधी म्हणजे साखरपुडा अर्थात वाङनिश्चय / साक्षीगंध/ शालमुदी. मुला-मुलीच्या पालकांनी विवाह (लग्न) जुळल्याबद्दल बोलून केलेला ठराव यालाच प्रयोगशास्त्रात वाङनिश्चय व व्यवहारात साखरपुडा / साक्षी गंध/ शालमुदी असे संबोधतात. त्याचप्रमाणे मुलगी वरास देण्याचा ठराव झाल्यानंतर त्या गोष्टीचे साक्षी साठी मुलीस जे विधियुक्त गंध / टिळा किंवा कुंकू लावतात त्यास साक्षगंध म्हणतात. त्यात मुलीस साखरेचा पुडा देतात म्हणून त्यास साखरपुडा विधी म्हणतात. साक्षगंध / साखरपुडा झाल्यानंतर सोयरिक कायम केल्याचे दर्शन म्हणून मुलास शाल, दुशाल आणि अंगठी देण्याचा जो विधी करतात त्यास शालमुदी म्हणतात.
उत्तर लिहिले · 20/12/2021
कर्म · 121765
0
साक्षगंध सोहळा म्हणजे काय?

साक्षगंध हा विवाहपूर्व सोहळा आहे. 'साक्ष' म्हणजे साक्षीदार आणि 'गंध' म्हणजे सुवास किंवा सुगंध. या विधीमध्ये वधू आणि वर यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा होतो, म्हणजेच लग्नाची बोलणी पक्की होते. एकमेकांनाConfirmations दिली जातात.

या सोहळ्याला 'साक्षगंध' का म्हणतात?

कुटुंब, मित्र आणि नातेवाईक यांच्या साक्षीने हा विधी पार पडतो, त्यामुळे याला 'साक्षगंध' म्हणतात. "आम्ही साक्षी आहोत कि ह्या दोघांचा विवाह ठरला आहे "असे या मध्ये मानले जाते,वधू आणि वर एकमेकांनाConfirmations देतात आणि त्यांच्या नात्याला एक सुगंधित सुरुवात करतात, म्हणून याला साक्षगंध म्हणतात.

अधिक माहितीसाठी काही संदर्भ:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1640

Related Questions

राम राम चा उच्चार काय होतो?
ग्रामीण देवळांचे महत्त्व थोडक्यात लिहा?
कोरकू जमातीच्या कुल संघटनावर थोडक्यात माहिती लिहा?
चार आश्रमा विषयी माहिती द्या?
धर्म आणि संस्कृती यांचे परस्पर संबंध सांगा?
वैदिक लोकांच्या देवदेवता स्पष्ट करा?
भारतीय संस्कृतीतील विविधतेतील स्वरूप स्पष्ट करा?