व्याकरण वाक्य

मिश्र वाक्याची उदाहरणे कोणती?

3 उत्तरे
3 answers

मिश्र वाक्याची उदाहरणे कोणती?

1
मिश्र वाक्य

मराठी व्याकरणात जेव्हा एक प्रधान वाक्य आणि एक किंवा अधिक गौणवाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात, तेव्हा तयार होणाऱ्या वाक्याला मिश्र वाक्य असे म्हणतात.gramu

मिश्र वाक्याची 24 वा वैशिष्ट्ये 

अ वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य असते. • मिश्र

• मिश्र वाक्यामध्ये एक किंवा अधिक गौणवाक्ये असतात.• मिश्र वाक्यामधील जे वाक्य स्वतंत्र असते, त्या वाक्याला मुख्यवाक्य किंवा प्रधान वाक्य असते म्हणतात.

• प्रधान वाक्यावर अवलंबून असणाऱ्या वाक्याला गौणवाक्य असे म्हणतात.

• प्रधान वाक्य आणि गौणवाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात आणि त्यापासून मिश्र वाक्य तयार होते. 
उदाहरणार्थ,

उदाहरण क्र. १तुषार म्हणाला होता का आज पाऊस येणार.

वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य - तुषार म्हणाला होता

• गौणवाक्य - आज पाऊस येणार

ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे. 

उदाहरण क्र. २

सरिता आज उशिरा आली कारण तिचीसरिता आज उशिरा आली कारण तिची नेहमीची बस चुकली.

चरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य – सरिता आज उशिरा आली

• गौणवाक्य तिची नेहमीची बस चुकली 1

ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी कारण या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.उदाहरण क्र. ३

किरण नेहमी म्हणतो की मी मोठा होऊन डॉक्टर होणार. 

वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य किरण नेहमी म्हणतो

• गौणवाक्य – मी मोठा होऊन डॉक्टर होणारही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे. gram

उदाहरण क्र. ४

शरीरस्वास्थ्य व्यायाम करतो. म्हणून आम्ही

वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि गौणवाक्य आहे.गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य – शरीरस्वास्थ्य उत्तम रहावे

गौणवाक्य - आम्ही व्यायाम करतो

ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी म्हणून या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.

उदाहरण क्र. ५

स्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली तर तिला नवीन मोबाईल मिळेल.त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे.वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य - स्वरा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली

• गौणवाक्य - तिला नवीन मोबाईल मिळेल

ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी तर या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे. त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, असे समजावे. 

उदाहरण क्र. ६आई >हणते की पैसे सांभाळून

वरील वाक्यामध्ये एक प्रधान वाक्य आणि एक गौणवाक्य आहे.

• प्रधान वाक्य - आई नेहमी म्हणते

• गौणवाक्य - पैसे सांभाळून वापरावे

ही दोन वाक्ये एकत्र जोडण्यासाठी की या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग केलेला आहे.

त्यामुळे हे वाक्य मिश्र वाक्य आहे, 
उत्तर लिहिले · 16/12/2021
कर्म · 121765
0
संयुक्त वाक्य: आपला मुद्दा पटवून द्यायला वाद घालू नये.
उत्तर लिहिले · 14/3/2023
कर्म · 0
0

मिश्र वाक्याची काही उदाहरणे खालीलप्रमाणे:

  • उदाहरण १: जेंव्हा पाऊस सुरु झाला, तेंव्हा आम्ही घरात गेलो.
  • उदाहरण २: जर तुम्ही अभ्यास केला, तर तुम्ही पास व्हाल.
  • उदाहरण ३: ज्या माणसाने चोरी केली, तो पकडला गेला.
  • उदाहरण ४: मला माहित आहे की तो आज येणार आहे.
  • उदाहरण ५: जरी तो गरीब असला, तरी तो आनंदी आहे.

टीप: मिश्र वाक्य म्हणजे दोन किंवा अधिक वाक्येSubordinating conjunctions (उदा. जेंव्हा, तेंव्हा, जर, तर, ज्या, तो, की, जरी, तरी) वापरून जोडलेले वाक्य.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1600

Related Questions

वाक्याचे चार प्रकार लिहा?
वाक्याचे चार प्रकार कोणते?
"आम्हाला शिकवायला नवीन शिक्षक आले आणि आमच्या अडचणी दूर झाल्या", संयुक्त वाक्य करा?
खालीलपैकी संयुक्त वाक्याचे उदाहरण कोणते? 1 ती मुंबईला गेली आणि तिथे तिने चित्रपटात काम केले. 2 ती मुंबईला चित्रपटात काम करते. 3 ती जेव्हा मुंबईला गेली तेव्हा तिने चित्रपटात कामे केली. 4 ती मुंबईला जाऊन चित्रपटात काम करते?
धूळ चारणे वाक्यात वाक?
दिलेला कर्ता वापरून सकर्मक वाक्य तयार करा. कर्ता: अर्थव?
उदाहरण घेऊन वाक्य स्पष्ट करा.