2 उत्तरे
2 answers

पैसा कसा कमवावा?

2
आपल्या सर्वांनाच खूप खूप पैसे कमवायचे असतात. पण त्यासाठी नक्की काय करावे याबाबत मनात गोंधळ असतो. त्यासाठी पुढील गोष्टींचा उपयोग होईल असे वाटते.

1) स्वत:च्या ख-या गरजा ओळखा- आपण उत्साहाच्या भरात कधी कधी अनावश्यक गोष्टींचीही खरेदी करतो. हे टाळण्यासाठी महिन्याच्या जमाखर्चाचे अंदाजपत्रक बनवणे व त्याप्रमाणे खर्च करणे हा एक उपाय आहे.

2) आर्थिक नियोजन करा- ब-याच जणांना आर्थिक नियोजन कंटाळवाणे वाटते किंवा आहेच किती उत्पन्न/बचत असाही विचार केला जातो. कर भरायच्या वेळेसच अनेक जण आर्थिक सल्ला घेतात. जर योग्य नियोजन असेल तर थोड्या उत्पन्नातही मोठी गुंतवणूक होऊ शकते.

3) जोडव्यवसाय करायचा विचार करा- आपली नोकरी/व्यवसाय याशिवाय जिथे तुमची उपस्थिती आवश्यक नसेल असा एखादा जोडव्यवसाय करा.

4) दुस-या पिढीतील उत्पन्न वापरा- तुमचा पगार हे पहिल्या पिढीतील उत्पन्न मानले तर त्यातील गुंतवणुकीवर मिळणारा परतावा हे दुस-या पिढीतील उत्पन्न होय.

5) अशक्य परताव्याची अपेक्षा ठेवू नका- शेअर बाजारात तेजी-मंदीची चक्रे येतात. तुमच्या आर्थिक सल्लागाराशी विचारविनिमय करून वास्तविक परताव्याची अपेक्षा ठेवा.

६) कर्ज घेऊ नका व घेतल्यास लवकर फेडून टाका- कुठलेही कर्ज, ग्रहकर्ज धरून घेऊच नका व घेतल्यास लवकर फेडून टाका .

७) पैसे वेगवेगळ्या साधनांमध्ये गुंतवा- आपण गुंतवणुकीचाही तोल सावरायला हवा. म्हणजे शेअर्स, म्युच्युअल फंड्स, पोस्ट, सोने अशा निरनिराळ्या साधनांमध्ये पैसे गुंतवा.

८) लवकर सुरुवात करा- जे लवकर बचतीला सुरुवात करतात त्यांना पुढे आयुष्यात आर्थिक संकटांना तोंड द्यावे लागण्याची शक्यताही कमीच असते.

९) पुरेसे विमा संरक्षण घ्या- ‘मला काय होणार’, ‘पुढे बघू’ असा विचार करू नका. आपल्यावर अवलंबून असणाºया व्यक्तींप्रमाणे पुरेसे विमा संरक्षण घ्या.

10) गरजेप्रमाणे आर्थिक नियोजन बदला- लग्न न झालेल्या मुलाच्या आर्थिक गरजा व एक मूल असलेल्या माणसाच्या आर्थिक गरजा नक्कीच वेगळ्या असतील. त्याप्रमाणे आपले आर्थिक नियोजनही बदला.
उत्तर लिहिले · 11/12/2021
कर्म · 121765
0

पैसा कमवण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

नोकरी (Job):
  • नोकरी करणे हा सर्वात सामान्य मार्ग आहे.
  • आपल्या शिक्षणानुसार आणि कौशल्यानुसार नोकरी शोधा.
  • सरकारी किंवा खाजगी क्षेत्रात नोकरी मिळू शकते.
व्यवसाय (Business):
  • स्वतःचा व्यवसाय सुरू करणे हा देखील एक चांगला पर्याय आहे.
  • लहान स्तरावर व्यवसाय सुरू करता येतो.
  • उदाहरणार्थ, किराणा दुकान, कपड्यांचे दुकान, खाद्यपदार्थांचा व्यवसाय.
गुंतवणूक (Investment):
  • शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करणे.
  • गुंतवणूक करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
freelancing ( फ्रीलांसिंग):
  • तुम्ही तुमच्या कौशल्यांचा वापर करून ऑनलाइन freelancing करू शकता.
  • उदाहरणार्थ, लेखन, डिझाइनिंग, वेब डेव्हलपमेंट.
ॲप्स आणि वेबसाइट्स (Apps and Websites):
  • आजकाल अनेक ॲप्स आणि वेबसाइट्स आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता.
  • उदाहरणार्थ, Google Opinion Rewards, TaskBucks.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1200

Related Questions

माझी पत्नी १३००० रुपये कमावते आणि माझा खर्च मी स्वतः कमावतो. मला कोणतेही व्यसन नाही. ५ लोकांचे कुटुंब आहे, त्यामुळे शिल्लक काहीच रहात नाही. मी आजारी आहे, पण माझा खर्च मी स्वतः कमावतो. पत्नी घरखर्च चालवते.
माणसाची आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतो किंवा कशी सुधारणा करू शकतो?
आर्थिक नियोजन काय आहे? आर्थिक नियोजनाची गरज स्पष्ट करा. आर्थिक नियोजनाचा अर्थ काय?
वय 25 पर्यंत स्वतःच्या पायावर कसे उभे राहायचे?
वार्षिक नियोजन म्हणजे काय?
मला गरिबीतून बाहेर येण्यासाठी कोणते मार्ग आहेत?
व्यक्ती आपला आर्थिक प्रश्न कसा सोडवते?