नाव बदल आयकर नावाचा अर्थ अर्थशास्त्र

मी माझे पॅनकार्ड काढले होते, पण आता ते हरवले आहे. पॅनकार्ड नंबरही माझ्याकडे नाहीये. फक्त नावाने पॅनकार्ड नंबर मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

मी माझे पॅनकार्ड काढले होते, पण आता ते हरवले आहे. पॅनकार्ड नंबरही माझ्याकडे नाहीये. फक्त नावाने पॅनकार्ड नंबर मिळेल का?

2


पॅन कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, ई-पॅन 2 मिनिटात मिळणार
    
बऱ्याचदा गरजेमुळे अनेक लोक ते आपल्याजवळ ठेवतात. ते तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवले जाते. अशा परिस्थितीत जर तुमचे पॅन कार्ड चुकूनही हरवले, तर ते परत मिळवणे खूप कठीण होते. पण काळजी करण्यासारखे काहीच नाही.

पॅन कार्ड हरवले असेल तर काळजी करू नका, ई-पॅन 2 मिनिटात मिळणार
पॅन कार्ड
 
 आधार कार्ड, व्होटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादींप्रमाणे पॅन कार्डदेखील महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये समाविष्ट आहे, ज्याची आपल्याला अनेकदा आवश्यकता असते. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारातील मर्यादेनंतर पॅन कार्ड आवश्यक आहे. बँकेकडून कर्ज घ्यावे, कोणाकडे मोठी रक्कम हस्तांतरित करावी, व्यावसायिक व्यवहार करावा किंवा आयकर संबंधित कोणतेही काम करायचे झाल्यास पॅन कार्डशिवाय हे शक्य नाही.

बऱ्याचदा गरजेमुळे अनेक लोक ते आपल्याजवळ ठेवतात. ते तुमच्या खिशात किंवा पर्समध्ये ठेवले जाते. अशा परिस्थितीत जर तुमचे पॅन कार्ड चुकूनही हरवले, तर ते परत मिळवणे खूप कठीण होते. पण काळजी करण्यासारखे काहीच नाही.


सर्वप्रथम पोलीस ठाण्यात तक्रार करा
पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे. अशा परिस्थितीत जर ते कुठेतरी हरवले असेल किंवा ते पर्ससह चोरीला गेले असेल तर तुम्हाला आधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी लागेल. अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन तक्रारी दाखल करण्याची सोय आहे. जर कोणी तुमच्या पॅनचा गैरवापर केला तर तुम्ही फसवणुकीपासून वाचाल. यानंतरच तुम्ही पॅन कार्डच्या डुप्लिकेट कॉपीसाठी अर्ज करू शकता.

घरी बसून ई-पॅन कार्ड डाऊनलोड करा
जर तुमचे पॅन कार्ड कुठेतरी हरवले किंवा चोरीला गेले तर तुमची अनेक प्रकारची कामं थांबू शकतात. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी बसून ई-पॅन कार्ड म्हणजेच पॅन कार्डची डिजिटल प्रत डाऊनलोड करू शकता. आयकर विभागाने गेल्या महिन्यात नवीन वेबसाईट सुरू केली आहे. याद्वारे तुम्ही घरी बसून काही मिनिटांत तुमचे ई-पॅन कार्ड (ई-पॅन) डाऊनलोड करू शकता.

स्टेप बाय स्टेप प्रक्रिया समजून घ्या
💠 सर्वप्रथम आयकर विभागाच्या वेबसाईटवर लॉगिन करा (https://www.incometax.gov.in/).
💠 येथे तुम्हाला ‘Instant E PAN’ पर्यायावर क्लिक करावे लागेल. जर हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्ही Show More वर क्लिक करताच ते दिसेल.
💠 नवीन पेज उघडल्यानंतर येथे ‘New E PAN’ पर्यायावर क्लिक करा.
💠 तुमचा पॅन नंबर इथे टाका. जर पॅन नंबर लक्षात नसेल, तर तुमच्याकडे आधार क्रमांकाचा पर्याय आहे.
💠 येथे दिलेल्या अटी आणि शर्थी वाचा आणि ‘Accept’वर क्लिक करा.
💠 आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल. ते एंटर करा आणि ‘Confirm’ वर क्लिक करा.
💠 कन्फर्म केल्यानंतर, तुमचे पॅन कार्ड प्रक्रियेनंतर तुमच्या ईमेल आयडी वर PDF स्वरूपात येईल. तुम्ही हे ‘e-Pan’ डाऊनलोड करा.

डुप्लिकेट पॅन कार्डसाठी किती फी?
आपण आपले नवीन डुप्लिकेट पॅन कार्ड प्राप्तिकर विभागाकडून देखील मिळवू शकता. यासाठी तुम्ही विभागाच्या ऑनलाईन सेवा वेबसाईट https://www.onlineservices.nsdl.com/paam/ReprintEPan.html ला भेट देऊ शकता. येथे तपशील भरून, आपण आपल्या कम्युनिकेशन किंवा कायम पत्त्यावर डुप्लिकेट पॅन कार्ड मिळवू शकता. देशातील पॅन कार्डसाठी, तुम्हाला 93 रुपये + 18 टक्के जीएसटी दराने शुल्क म्हणून 110 रुपये भरावे लागतील. त्याच वेळी, जर तुम्ही परदेशात कुठेतरी राहत असाल आणि तेथे ऑर्डर करू इच्छित असाल तर तुम्हाला 1011 रुपये भरावे लागतील.


उत्तर लिहिले · 29/11/2021
कर्म · 121765
0

तुमचे पॅन कार्ड हरवले असल्यास आणि तुमच्याकडे पॅन नंबर नसेल, तरी तुम्ही काही विशिष्ट मार्गांनी तुमचा पॅन नंबर शोधू शकता:

1. आयकर विभागाची वेबसाइट:
  • आयकर विभागाच्या वेबसाइटवर ( https://www.incometax.gov.in/iec/foportal/ ) 'Know Your PAN' ही सुविधा उपलब्ध आहे.
  • या सुविधेमध्ये तुम्हाला तुमचे नाव, जन्मतारीख आणि इतर आवश्यक माहिती भरून तुमचा पॅन नंबर मिळू शकतो.
2. CSDL/NSDL च्या वेबसाइट:
  • CSDL (Central Depository Services Limited) किंवा NSDL (National Securities Depository Limited) या वेबसाइटवर जाऊन तुम्ही तुमचा पॅन नंबर शोधू शकता.
  • यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल.
3. तुमच्या बँकेचे स्टेटमेंट:
  • जर तुम्ही तुमच्या बँक खात्याशी पॅन कार्ड लिंक केले असेल, तर तुमच्या बँक स्टेटमेंटवर पॅन नंबर नमूद असतो.
  • तुम्ही आपले बँक स्टेटमेंट तपासू शकता.
4. क्रेडिट/डेबिट कार्ड स्टेटमेंट:
  • क्रेडिट किंवा डेबिट कार्डसाठी अर्ज करताना तुम्ही पॅन नंबर दिला असेल, तर स्टेटमेंटमध्ये तो नमूद असण्याची शक्यता आहे.
5. आयकर रिटर्न (ITR):
  • जर तुम्ही यापूर्वी आयकर रिटर्न भरला असेल, तर तुमच्या ITR फॉर्ममध्ये पॅन नंबर नमूद असतो.

वरीलपैकी कोणत्याही पद्धतीने तुम्ही तुमचा पॅन नंबर शोधू शकता. जर तुम्हाला काही अडचण आली, तर तुम्ही आयकर विभागाच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधू शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1440

Related Questions

भारताचे आयकर संदर्भात नवीन धोरण काय आहे?
खालीलपैकी अप्रत्यक्ष कर कोणता: आयकर, महामंडळ कर, जीएसटी, वरील सर्व?
विविध प्रकारच्या गुंतवणुकीपैकी 80C कलमानुसार आयकर गणनेसाठी जास्तीत जास्त किती वजावट मिळते?
नवीन पॅन कार्ड घरपोच किती दिवसात मिळेल?
डोंगराच्या बाजूने आवरून मारून टिंब टिंब कब्रिस्तान प्रवेश केला?
भारतीय आयकर अधिनियम कलमानुसार करणाची व्याख्या काय आहे?
आयकरचे पाच शीर्षक स्पष्ट करा?