नोकरी मुलाखत मुलाखत技巧

मुलाखत घेताना काळजी कशी घ्यावी?

2 उत्तरे
2 answers

मुलाखत घेताना काळजी कशी घ्यावी?

3
मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र
स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 45560
0

मुलाखत घेताना घ्यावयाची काळजी:

  • तयारी: मुलाखत सुरू करण्यापूर्वी, मुलाखतीसाठी असलेल्या व्यक्तीबद्दल (candidate) माहिती मिळवा. त्यांचे शिक्षण, अनुभव आणि कौशल्ये तपासा.
  • प्रश्न तयार ठेवा: मुलाखतीत काय प्रश्न विचारायचे आहेत, त्यांची यादी तयार ठेवा. प्रश्न स्पष्ट आणि नेमके असावेत.
  • वेळेचे व्यवस्थापन: मुलाखतीसाठी पुरेसा वेळ द्या. जास्त वेळ नसेल, तर महत्त्वाचे प्रश्न विचारा.
  • शांत आणि सकारात्मक वातावरण: मुलाखती दरम्यान शांत आणि सकारात्मक वातावरण ठेवा. यामुळे मुलाखत देणाऱ्या व्यक्तीला आरामदायक वाटेल.
  • लक्षपूर्वक ऐका: मुलाखत घेताना, मुलाखत देणाऱ्या व्यक्तीचे बोलणे लक्षपूर्वक ऐका. मध्ये मध्ये प्रश्न विचारून अधिक माहिती मिळवा.
  • नोट्स घ्या: मुलाखत चालू असताना महत्त्वाच्या गोष्टींची नोंद (notes) घ्या.
  • समान वागणूक: सर्व उमेदवारांना समान वागणूक द्या. कोणताही पूर्वग्रह (bias) ठेवू नका.
  • प्रश्न विचारण्याची संधी: मुलाखत संपल्यावर, उमेदवाराला प्रश्न विचारण्याची संधी द्या.
  • feedback द्या: मुलाखत झाल्यावर उमेदवाराला feedback नक्की द्या.

या काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही मुलाखत प्रभावीपणे घेऊ शकता.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

इंटरव्ह्यू कसा द्यायचा?
मी जेव्हा मुलाखतीला जातो तेव्हा माझा आत्मविश्वास कमी होतो, मी पूर्ण आत्मविश्वासाने उत्तर नाही देऊ शकत?
मुलाखतीला (Interview) गेल्यावर स्वतःविषयी सांगा म्हणल्यावर काय सांगायचे?
मुलाखत कशी द्यावी?
एखाद्या मुलाखतीला सामोरे कसे जायचे?
इंटरव्यू कसा फेस करायचा?