Topic icon

मुलाखत技巧

3
मुलाखतीमध्ये यश मिळवण्यासाठी तंत्र
स्वतःबद्दल सांगण्याची तयारी आरशासमोर करा. हे वारंवार करून त्यात नैसर्गिकता आणा
हसरा चेहरा महत्त्वाचा असतो. चेहऱ्यावर प्रसन्नता असू द्या. हसऱ्या चेहऱ्याची सवय करा.
योग्य व्यावसायीक पेहराव तुम्हाला उठाव देणारा असावा. योग्य कोट व टाय असल्यास चांगले परिणाम साधले जातात. काळी विजार व पांढरा शर्ट असल्यास उत्तम अथवा निळसर, करडे कपडे चालतात.
ही मुलाखत माझ्यासाठीच आहे आणि मी त्यात यशस्वी होणारच आहे असाच विचार करा.
मुलाखतीच्या ठिकाणी जाणवणाऱ्या गंभीर वातावरणामुळे भांबावून जाऊ नका. आपण निवांत राहण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी संथ श्वसन करा ताण कमी होईल.
तुमच्या अवगत कौशल्यांबाबत सांगताना उत्साहाने त्यामध्ये केलेले कार्य सांगा. उदाहरणे द्या.
मुलाखतीत असत्य कधीही बोलू नका.
मुलाखतीत घाई गडबड न करता शांत चित्ताने प्रश्नांची उत्तरे द्या.
प्रश्न न समजल्यास विनयाने परत विचारा, यात काही चुकीचे नाही.
मुलाखतकर्त्याच्या अपेक्षांची जास्तीत जास्त पूर्तता करता येईल याची काळजी घ्या.
मुलाखती नंतर विनम्रतेने आभार माना
व्यावसायिक मुलाखतीत बसणे, बोलण्याची पद्धत, शिष्टाचार, निटनेटकेपणा आणि प्रथमदर्शनी प्रभाव यांचा विशेष भाग असतो हे लक्षात घ्या. स्पर्धात्मक युगात इतरांपेक्षा सरस ठरण्याकरिता स्वतःचे वेगळेपण आणि विशिष्ट चमक दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वतःचा बायोडाटा किंवा करिक्युलम व्हिटे वेळोवेळी वर्तमान करत राहणे गरजेचे असते.
उत्तर लिहिले · 19/11/2021
कर्म · 45560
0

नोकरीसाठी मुलाखत (Interview) देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ज्यामुळे तुम्ही आत्मविश्वासाने मुलाखत देऊ शकाल आणि नोकरी मिळवण्याची शक्यता वाढवू शकाल.

मुलाखतीची तयारी:

  • कंपनीबद्दल माहिती: ज्या कंपनीत मुलाखत आहे, त्या कंपनीबद्दल संपूर्ण माहिती मिळवा. कंपनी काय करते, तिची उद्दिष्ट्ये काय आहेत, तिची संस्कृती कशी आहे, हे जाणून घ्या.
  • जॉब डिस्क्रिप्शन (Job Description): तुम्हाला नेमके कोणते काम करायचे आहे आणि तुमच्याकडून कंपनीच्या काय अपेक्षा आहेत, हे समजून घ्या.
  • प्रश्नांची तयारी: मुलाखतीत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे तयार ठेवा. तुमच्या अनुभवांबद्दल, कौशल्यांबद्दल आणि ध्येयांबद्दल माहिती तयार ठेवा. इथे काही सामान्य प्रश्नांची उदाहरणे दिलेली आहेत.

मुलाखतीच्या वेळेस:

  • वेळेवर पोहोचा: मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर किंवा थोडे लवकर पोहोचा. उशीर झाल्यास नकारात्मक प्रभाव पडू शकतो.
  • व्यवस्थित कपडे: औपचारिक (Formal) आणि स्वच्छ कपडे परिधान करा. तुमचा पेहराव सभ्य आणि व्यावसायिक (Professional) असावा.
  • आत्मविश्वास: आत्मविश्वासाने बोला. प्रश्न नीट ऐका आणि विचारपूर्वक उत्तरे द्या.
  • दृष्टी संपर्क: मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीकडे पाहून बोला.
  • देहबोली (Body Language): तुमची देहबोली सकारात्मक (Positive) असावी. ताठ बसा, शांत रहा आणि उत्साहाने उत्तरे द्या.

मुलाखतीनंतर:

  • धन्यवाद: मुलाखत घेतल्यानंतर मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीला धन्यवाद म्हणा.
  • फॉलोअप (Follow up): मुलाखतीनंतर कंपनीकडून काय प्रतिसाद मिळतो, याची विचारणा करा.

टीप: प्रत्येक मुलाखत एक शिकण्याचा अनुभव असतो. त्यामुळे अपयश आले तरी निराश होऊ नका, त्यातून शिका आणि पुढील मुलाखतीसाठी अधिक तयारी करा.

उत्तर लिहिले · 17/3/2025
कर्म · 980
4
मुलाखत घेताना तुमचा आत्मविश्वास बघितला जातो. त्यामुळे न घाबरता मुलाखत घेणाऱ्याशी संवाद साधा.
शक्यतो फॉर्मल पेहरावाला प्राधान्य द्या. तुम्ही ज्या पेहरावात सहजपणे वावरु शकता असा तुमचा पेहराव असू द्या.
तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांचं योग्य पण मोजक्या शब्दात उत्तर द्या.
मुलाखतीच्या ठिकाणी वेळेवर पोहोचा. जेणेकरुन तुम्हाला त्या वातावरणाची ओळख होईल.

¢нєтαи gαιкωα∂
उत्तर लिहिले · 13/11/2017
कर्म · 2350
0

मुलाखतीला (Interview) गेल्यावर 'स्वतःविषयी सांगा' असे विचारले গেলে, ત્યારે તમે નીચે પ્રમાણે उत्तरे देऊ शकता:

1. तुमची ओळख:

  1. तुमचं पूर्ण नाव सांगा.
  2. तुम्ही कुठून आला आहात ते सांगा.

2. शिक्षण आणि पात्रता:

  1. तुमच्या शिक्षणाबद्दल सांगा - तुम्ही काय शिकला आहात, तुमची पदवी (degree) आणि शिक्षण कुठून पूर्ण केले.
  2. तुम्ही केलेले कोर्स (course) किंवा ट्रेनिंग (training) सांगा.

3. कामाचा अनुभव:

  1. तुम्हाला असलेला कामाचा अनुभव सांगा. तुम्ही आधी कुठे काम केले, कोणत्या पदावर (designation) काम केले आणि तिथे काय काम केले, हे सांगा.
  2. तुमच्या कामामुळे कंपनीला काय फायदा झाला, हे सांगा.

4. कौशल्ये (Skills):

  1. तुमच्यामध्ये असलेल्या कौशल्यांबद्दल सांगा.
  2. तुम्ही तुमच्या कामात किती चांगले आहात हे सांगा.

5. आवड आणि छंद:

  1. तुमच्या आवडीनिवडी आणि छंद काय आहेत ते सांगा.
  2. उदाहरणार्थ, तुम्हाला खेळायला, वाचायला, संगीत ऐकायला आवडते का, वगैरे.

6. ध्येय (Goal):

  1. तुम्ही तुमच्या भविष्यात काय करू इच्छिता, ते सांगा.
  2. तुमची ध्येये काय आहेत आणि तुम्ही ती कशी पूर्ण करणार आहात, हे सांगा.

उदाहरण:

"नमस्कार, माझे नाव [तुमचे नाव] आहे. मी [शहराचे नाव] येथे राहतो/राहते. मी [शिक्षण] पूर्ण केले आहे आणि मला [कामाचा अनुभव] आहे. माझ्याकडे [कौशल्ये] आहेत, ज्यामुळे मी हे काम चांगल्या प्रकारे करू शकतो/शकते. मला [आवड] आहे आणि माझे ध्येय [ध्येय] आहे."

हे सर्व मुद्दे तुम्हाला मुलाखतीत स्वतःबद्दल सांगण्यास मदत करतील.

उत्तर लिहिले · 16/3/2025
कर्म · 980
5
इंटरव्‍यू देताना काही काळजी घेणे गरजेचे आहे. जर तुम्ही खालील टिप्स फॉलो केल्या तर तुम्हाला कुठीलीही अडचण येणार नाही. 

*1.* प्रथम अभिवादन करा. त्यानंतर आपले पूर्ण नाव सांगा.

*2.* बोलताना फार घाई करू नका. इंटरव्यू घेणाऱ्या व्यक्तीला प्रश्न विचारण्याची पूर्ण संधी द्या.

*3.* तुमच्या जुन्या जॉबबद्दल तेव्हाच बोला. जेव्हा त्याबद्दल विचारले जाईल.

*4.* एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल गोष्टी लपवू नका.

*5.* कंपनीशी संबंधित काही प्रश्न तुम्हाला वाटत असतील तर सोप्या पद्धतीने विचारा.

*6.* जास्त तर्क-वितर्क करत बसू नका. याने तुमची प्रतिमा खराब होईल.

*7.* कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देण्याअगोदर संबोधनासाठी सर/ मॅडम सुरूवात करा.

*8.* फोनवर गोष्ट करण्याअगोदर आपली गोष्ट कमी शब्दात स्पष्ट ठेवा.

*9.* इंटरव्‍यू दरम्यान खोटे बोलणे तुमच्या पुढच्या करियरसाठी वाईट असू शकते. ते टाळा.

*10.* तुमचा फोन ठेवण्या अगोदर धन्यवाद द्यायला विसरू नका.
😊
उत्तर लिहिले · 30/5/2020
कर्म · 3965
8
मुलाखतीला सामोर जाणं हे आपण आपल्या मनावर कोरून ठेवलाय तितकं अवघड नाहीये. मुलाखत देतांना आपल्या मध्ये आत्मविश्वास( self-confidence) असणे खूप महत्वाचे आहे. आपल्याला प्रबोधनकार ठाकरे माहीत असतील तर हेच सांगायचे की "तुझ्याकडे जर आत्मविश्वस असेल तर तू जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला मरण नाही. त्यामुळे मुलाखतीला जातांना जितकं फ्री जाता येईल तितकं जा.
जर तुम्हाला अजून पण अवघड वाटत असेल तर आरश्या समोर उभे राहून तुम्हीच तुमची मुलाखत घ्या. नक्कीच आत्मविश्वास वाढेल ...
कसलं ही टेन्शन न घेता सामोरे जा . यश नक्की मिळेल ...!



धन्यवाद...!!!
उत्तर लिहिले · 7/11/2017
कर्म · 915
1
YouTube वर Sandeep Maheshwari हे चॅनल पहा. तुम्हाला सर्व उत्तरे मिळून जातील.
उत्तर लिहिले · 26/3/2017
कर्म · 4560