4 उत्तरे
4 answers

इंटरनेट म्हणजे काय?

5
इंटरनेट अर्थ ला मराठी मध्ये “आंतरजाल” किंवा “महाजाल” असे सुद्धा म्हणतात. इंटरनेट म्हणजे काय तर नेटवर्क चे असे जाळे जे संपूर्ण जगभरात पसरले आहे. इंटरनेटचे हे जाळे जगभरातील सर्व डिजिटल उपकरणांना टॉवर्स आणि कृत्रिम उपग्रहांच्या माध्यमातून वायरलेस कनेक्शनद्वारे एकमेकांना जोडले गेले आहे.
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 34235
1
आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि संगणकाचा चा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे त्यामुळे इंटरनेट हि माणसांची एक मूलभूत गरज बनली आहे. आपल्या दैनंदिन जीवनात इंटरनेट चा वापर मोठ्या प्रमाणात करत असतो, इंटरनेट शिवाय या जीवनाची कल्पनाच करता येत नाही.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का कि हे इंटरनेट म्हणजे काय? आणि आपल्याला इंटरनेट चा काय फायदा होतो, त्याची सुरुवात कधी झाली, इंटरनेट कसे कार्य करते अश्या अनेक प्रश्नांची उत्तरे या पोस्ट मध्ये पाहूया.              
             
तर चला जाणून घेऊया इंटरनेट बद्दल संपूर्ण माहिती.

इंटरनेट म्हणजे काय? | What is Internet in Marathi
इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे नेटवर्किंग चे जाळे आहे जे संपूर्ण जगामध्ये पसरले आहे. म्हणूनच इंटरनेट ला मराठी मध्ये महाजाल किंवा आंतरजाल असे सुद्धा म्हटले जात. इंटरनेट या शब्दाचा फुल्ल फॉर्म इंटरनॅशनल नेटवर्क असा आहे, ज्याचा मराठी अर्थ आंतरराष्ट्रीय नेटवर्क असा होतो.
महाजाल म्हणजेच एक विशाल जाळे जे संपूर्ण विश्वा मध्ये पसरले आहे. इंटरनेट च्या साहाय्याने जगातील सर्व संगणक आणि डिजिटल उपकरणे हे सर्व एका कृत्रिम उपग्रहाच्या मदतीने एकमेकांना जोडल्या जातात.

तसेच इन्टरनेट मध्ये क्लायंट सर्व्हर नेटवर्क सिस्टिम चा वापर करण्यात येतो, यात एका मोठ्या सर्व्हरला अनेक क्लायंट सर्व्हर जोडल्या जातात.

जगातील कोणताही संगणक उपयोगकर्ता आपले संगणक इंटरनेटशी जोडू शकतो, म्हणून इंटरनेट हे जगातील सर्वात मोठे आणि लहान मोठ्या संगणकाचे विशाल जाळे आहे. संगणकाला इंटरनेट शी जोडण्याकरीता कोणत्याही परवानगीची आवश्यकता नसते केवळ एक इंटरनेट अकाउंट तयार करून संगणक इंटरनेट शी जोडल्या जाते.

इंटरनेट चा वापर | Internet Information in Marathi

इंटरनेट चा वापर करण्यासाठी एका इंटरनेट सेवा प्रदान करणाऱ्या व्यक्तीकडून एक इंटरनेट प्लॅन घ्यावा त्यानंतर आपल्या मोबाइल, लॅपटॉप, पिसी, किंवा कॉम्पुटर ला एका इंटरनेट टॉवर म्हणजेच इंटरनेटच्या सर्वर शी जोडले जाते. 

आता इंटरनेट शी जोडल्या नंतर तुम्ही इंटरनेट वरील कोणतीही माहिती, वेबसाईट किंवा तुम्हाला हवी असलेली माहिती अगदी काही सेकांदात च मोबाइल किंवा लॅपटॉप वर पाहू शकता.

इंटरनेटचा वापर जवळपास सर्वच क्षेत्रात केला जात आहे. त्यापैकी काही क्षेत्र पुढील प्रमाणे दिलेली आहेत.
  • बँकिंग क्षेत्र
  • शैक्षणिक क्षेत्र
  • औद्योगिक क्षेत्र
  • वैद्यकीय क्षेत्र
  • संशोधन क्षेत्र
  • पर्यटन मध्ये
  • कृषी क्षेत्र
  • मीडिया क्षेत्र
  • रेल्वे क्षेत्र
अश्या प्रकारे इंटरनेट चा वापर आपल्या दैनंदिन जीवनात सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जात आहे. जर तुम्हाला वरील माहिती आवडली असेल तर नक्कीच कंमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका.

अश्याच प्रकारची इंटरनेट म्हणजे काय? याबद्दल आणखी माहिती हवी असेल तर आमच्या मराठी स्पिरिट वेबसाईट ला नक्की भेट द्या.

उत्तर लिहिले · 1/5/2022
कर्म · 2195
0

इंटरनेट म्हणजे काय?

इंटरनेट हे जगभरातील एकमेकांशी जोडलेल्या संगणकांचे एक विशाल जाळे आहे. हे 'जाळ्यांचे जाळे' (network of networks) म्हणूनही ओळखले जाते, कारण ते स्थानिक, सार्वजनिक, खाजगी, व्यावसायिक आणि सरकारी नेटवर्कला जोडते.

इंटरनेटचे मुख्य उद्देश:

  • संपूर्ण जगभरातील माहिती आणि डेटा सामायिक करणे.
  • संवाद आणि देवाणघेवाण सुलभ करणे.
  • संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन देणे.
  • नवीन तंत्रज्ञान आणि ॲप्लिकेशन्सचा विकास करणे.

इंटरनेट कसे कार्य करते?

इंटरनेट प्रोटोकॉल सूट (TCP/IP) नावाच्या नियमांच्या संचाचा वापर करून इंटरनेट कार्य करते. डेटा लहान 'पॅकेट'मध्ये विभागला जातो आणि प्रत्येक पॅकेटला गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी स्वतंत्रपणे मार्ग दिला जातो. हे पॅकेट विविध नेटवर्क आणि उपकरणांमधून प्रवास करतात आणि गंतव्यस्थानी पुन्हा एकत्र जोडले जातात.

इंटरनेटचे उपयोग:

  • माहिती मिळवणे: आपल्याला हवी असलेली कोणतीही माहिती शोधण्यासाठी.
  • संवाद: ईमेल, सोशल मीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकांशी बोलणे.
  • मनोरंजन: चित्रपट पाहणे, संगीत ऐकणे, गेम्स खेळणे.
  • शिक्षण: ऑनलाइन कोर्सेस करणे, शैक्षणिक साहित्य वाचणे.
  • व्यवसाय: ऑनलाइन खरेदी-विक्री करणे, जाहिरात करणे.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

गुगल न वापरलेले खाते बंद करण्याची प्रक्रिया काय आहे?
गुगल अकाउंट परत परत साइन इन केले, मी लॉगिन आयडी व पासवर्ड रिकव्हरी आयडी विसरलो आहे. मोबाईल नंबर आहे, मूळ आयडी कसा रिकव्हर करू?
तुम्ही इंटरनेटमुळे होणाऱ्या सकारात्मक व नकारात्मक परिणामांबद्दल चर्चा करा व लिहा?
वायफाय पासवर्ड कसा शोधता येईल?
आपल्याला इंग्रजी शिकायचं असेल, तर मराठी वाक्यांचं परफेक्ट ट्रांसलेशन करणारं कोणतं ॲप आहे?
Youtube ला किती पैसे मिळतात?
वॉटर रिले म्हणजे काय?