पुरस्कार संरक्षण

परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांचे महत्त्व काय आहे आणि हे पुरस्कार केव्हा दिले जातात?

2 उत्तरे
2 answers

परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांचे महत्त्व काय आहे आणि हे पुरस्कार केव्हा दिले जातात?

5
शौर्य पुरस्कारांचा इतिहास :

भारतात असीम पराक्रम आणि त्यागाला सन्मानित करणाऱ्या पुरस्कारांची सुरुवात ईस्ट इंडिया कंपनी च्या काळात सुरु झाली. १७९५ साली मद्रास इन्फन्टरीच्या सुभेदार अब्दुल कादिर यांना सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले होते. १८३४ साली तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विलिअम बेंटिंक यांनी ऑर्डर ऑफ मेरिट नावाने पुरस्कार सुरु केला. १९०२ साली ऑर्डर ऑफ मेरिटचे नामविस्तार होऊन इंडियन ऑर्डर ऑफ मेरिट नावाने पुरस्कार देण्यात येऊ लागला. १९११ पासून व्हिक्टोरिया क्रॉस हा पुरस्कार देखील भारतीय जवानांना देण्यात येऊ लागला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे सहा वीरतेचे पुरस्कार सुरु करण्यात आले. या सर्व पदकांची रचना इव्ह इवान मडे दे मारोस (Eve Yvonne Maday De Maros) उर्फ सावित्रीबाई खानोलकर यांनी केली आहे.


सावित्रीबाई विक्रम खानोलकर

स्वित्झर्लंडमध्ये जन्मलेल्या इव्ह इवान मेडे दे मारोस यांनी ब्रिटिश भारतीय सैन्यात कॅप्टन असलेले विक्रम रामजी खानोलकर यांच्याशी लग्न केले व त्या सावित्रीबाई खानोलकर झाल्या.

लग्नानंतर सावित्रीबाई भारतात आल्या आणि त्यांनी मराठी, हिंदी व संस्कृत भाषा शिकून भारतीय संस्कृतीचा खोलवर अभ्यास केला.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मेजर जनरल हिरालाल अटल यांच्यावर स्वतंत्र भारतीय लष्कराच्या नव्या पदव्यांची नावे आणि पदकांची रचना करणे ही महत्त्वाची कामगिरी सोपवण्यात आली. एका भेटीत सावित्रीबाईंनी हिरालाल अटल यांना हिंदू पुराणे, वेद, भारतीय संस्कृती या बद्दलच्या अभ्यासाने विशेष प्रभावित केले. सोबतच त्या चित्रकलेत विशेष पारंगत होत्या म्हणून हिरालाल अटल यांनी सावित्रीबाई यांच्यावर पदकांची रचना करण्याची कामगिरी सोपविली.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा अभ्यास करत त्यांनी वरील सहा पदकांची रचना केली.

या पुरस्कारांचे दोन भाग आहेत.

१. युद्धकाळातील कामगिरीसाठी दिले जाणारे पुरस्कार.

परम वीर चक्र, महावीर चक्र आणि वीर चक्र हे तीन पुरस्कार वॉरटाईम अर्थात युद्धकाळातील कामगिरीसाठी दिले जातात. युद्धकाळ म्हणजे भारत आणि शत्रुराष्ट्रांदरम्यानच्या प्रत्यक्ष युद्धाचा काळ. उदा. १९६२ सालचे भारत -चीन युद्ध, कारगिल युद्ध इ.

वेगवेगळ्या धातूंपासून बनलेले हे सर्व पदक १-३/८ इंच व्यासाचे असतात.

प्रत्यक्ष युद्धात लढणारे आणि असामान्य कामगिरी करणारे भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांचे आणि राखीव दलातील सैनिक (स्त्री, पुरुष) आणि युद्धकाळात सैनिकांची वैद्यकीय शुश्रुषा करणारे परिचारक (स्त्री, पुरुष) हे या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.

हे तिन्ही पदक २६ जानेवारी १९५० रोजी जाहीर करण्यात आले, मात्र १५ ऑगस्ट १९४७ पासून असामान्य कामगिरी करणाऱ्या वीरांना हे पुरस्कार दिले जातात.

दरवर्षी २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टला या पुरस्कारांचे वितरण होते.

१.१ परम वीर चक्रसंदर्भ :





परम वीर चक्र कांस्य धातूपासून बनलेले असते. याच्या समोरच्या भागावर मध्यभागी भारताचे राष्ट्रचिन्ह आणि इंद्राचे चार वज्र उमटवलेले असते. मागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजी अक्षरांमध्ये (परम वीर चक्र PARAM VIR CHAKRA) लिहिलेले असते. देवनागरी आणि इंग्रजी नावांच्या मध्ये कमळाची दोन फुले असतात.
पदकांसोबत जांभळ्या रंगाचीच फीत वापरली जाते.
आजपर्यंत* फक्त २१ जणांना परम वीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. या २१ जणांपैकी १४ जणांना मरणोत्तर हा सन्मान मिळाला आहे. २१ पैकी २० जण लष्करातील तर १ जण वायुदळातील आहेत. नौदळातून एकाही वीराला परम वीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले नाही.
३ नोव्हेंबर १९४७ रोजी झालेल्या बडगामच्या संग्रामात धारातीर्थी पडलेले मेजर सोमनाथ शर्मा हे परम वीर चक्राने सन्मानित होणारे पहिले वीर आहेत. शेवटचा परम वीर चक्र सन्मान कारगिल युद्धाचे नायक ले. मनोज कुमार पांडे, ग्रेनेडीयर योगेंद्र सिंग यादव, रायफलमॅन संजय कुमार आणि कॅप्टन विक्रम बत्रा (१९९९) यांना मिळाला होता.
पहिले परमवीर चक्र मिळवणारे मेजर सोमनाथ शर्मा हे खानोलकरांचे जावई (खानोलकरांच्या मुलीचे दिर) होते.
परम वीर चक्र प्राप्त वीरांना महिना ₹ २०,०००/- मानधन दिले जाते.
१.२ महावीर चक्रआजपर्यंत*- ३० जुलै, २०२०.



महावीर चक्र चांदीपासून बनलेले असते. गोलाकार आकारातील या पदकाच्या समोरील भागावर पाच कोनांचा तारा आणि त्यावर भारताचे राष्ट्रचिन्ह उभारलेले असते तर मागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रही अक्षरांमध्ये महावीर चक्र MAHAVIR CHAKRA हे नाव उमटवलेले असते.
महावीर चक्रासोबत पांढरा आणि नारंगी रंगातली फीत वापरली जाते.
आजपर्यंत* एकूण २१२ वीरांना २१८ महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे. विंग कमांडर जगमोहन नाथ, मेजर जनरल राजेंद्र सिंग, जनरल अरुण वैद्य, विंग कमांडर पद्मनाभ गौतम, कर्नल चेवांग रिणशेन, ब्रिगेडियर संत सिंग या सहा जणांना दोन वेळा महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
महावीर चक्र प्राप्त वीरांना महिना ₹ १०,०००/- मानधन दिले जाते.
१.२ वीर चक्रआजपर्यंत*-


वीर चक्र हे तिसऱ्या क्रमांकाचे लष्करी पदक सुद्धा चांदीचे बनलेले असते. समोरील भागावर पाच कोनांच्या तारा असतो ज्याच्या मध्यभागी २४ आऱ्यांचे वलय आणि त्यात भारताचे राष्ट्रचिन्ह उमटवलेले असते. मागच्या बाजूला देवनागरी आणि इंग्रजी अक्षरांमध्ये वीर चक्र VEER CHAKRA हे नाव लिहिलेले असते.
वीर चक्रासोबत निळा आणि नारंगी रंगाची फीत वापरली जाते.
आजपर्यंत* १३२२ जणांना वीरचक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
वीर चक्र मिळवणाऱ्या वीरांना महिना ₹ ७,०००/- मानधन मिळते.
२. शांतीकाळातील कामगिरीसाठी दिले जाणारे पुरस्कार.


अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र हे तीन पुरस्कार पीसटाईम म्हणजेच शांतीकाळातील कामगिरीसाठी दिले जातात. शांतीकाळ म्हणजे दहशतवादी हल्ला, नैसर्गिक आपत्ती किंवा इतर असामान्य प्रसंग. शांतीकाळातील या पुरस्कारांसाठी भारताच्या तिन्ही सशस्त्र आणि राखीव दलातील सैनिक, सैनिकांची शुश्रुषा करणारे परिचारक, पोलिस आणि सामान्य नागरिक पात्र असतात.

शांतीकाळातील हे तिन्ही पदक पूर्वी अशोक चक्र-१ , अशोक चक्र-२ आणि अशोक चक्र-३ या नावाने दिले जात, १९६७ पासून या पदकांची नावे बदलून अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि वीर चक्र अशी ठेवण्यात आली. तिन्ही पदकांची रचना सारखीच आहे, १-३/८ इंच व्यास असलेल्या गोलाकार पदकावर समोरच्या भागावर मध्यभागी अशोक चक्र असते आणि चक्राच्या चहुबाजूला कमळाची गोलाकार माळ असते. मागच्या बाजूला अनुक्रमे अशोक चक्र, कीर्ती चक्र आणि शौर्य चक्र ही नावे देवनागरी आणि इंग्रजी भाषेत उमटवलेली असतात.

२.१ अशोक चक्रआजपर्यंत*- 

शांतीकाळातील वीरतेचा हा सर्वोच्च सन्मान आहे. परम वीर चक्राच्या समकक्ष याचे महत्व आहे.
कांस्य धातूपासून बनलेल्या अशोक चक्रावर सोन्याचा मुलामा दिलेला असतो, अशोक चक्रासोबत ३२ मीमी रुंदीची हिरव्या रंगाची फीत वापरली जाते, जीच्या मधोमध २ मीमी रुंद नारंगी रंगाची रेष असते.
आजपर्यंत* एकूण ९२ जणांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
१९८६ च्या विमान अपहरणात प्रवांशाचा जीव वाचविताना वीरगतीला प्राप्त झालेल्या विमानप्रवास सेविका नीरजा भनोत (सामान्य नागरिक), अंतराळात जाणारे पहिले भारतीय म्हणून राकेश शर्मा (असामान्य कामगिरी) , २००८ साली मुंबईवर दहशतवाद्यांच्या हल्यात शहीद झालेले पोलीस दलातील अशोक कामटे, हेमंत करकरे यांना अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले होते.
अशोक चक्राने सन्मानित वीरांना दरमहा ₹ १२,०००/- मानधन मिळते.
२.२ कीर्ती चक्र


कीर्ती चक्राचे महत्व महावीर चक्राच्या सामान आहे.
कीर्ती चक्र चांदी पासून बनवले जाते आणि याच्यासोबत ३० मीमी रुंदीची हिरव्या रंगाची फीत वापरली जाते. या फितीच्या दोन्ही बाजूंनी ८.५ मीमी अंतरावर नारंगी रंगाच्या २ रेषा असतात.
आजपर्यंत* एकूण ५१२ वीरांना कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
कीर्ती चक्राने सन्मानित वीरांना दरमहा ₹ ९,००० मानधन मिळते.
२.३ शौर्य चक्र


शौर्य चक्र आणि वीर चक्राचा दर्जा समान आहे.
शौर्य चक्र हे कांस्य धातू पासून बनवले जाते. याच्यासोबत ३० मीमी रुंदीची हिरव्या रंगाची फीत वापरली जाते. ही फीत २ मीमी रुंदीच्या ३ रेषांनी ४ सामान भागात विभागलेली असते.
आजपर्यंत* एकूण २२५५ वीरांना शौर्य चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
शौर्य चक्राने सन्मानित वीरांना दरमहा ₹ ६,००० मानधन मिळते.
वरील सर्व पदकांसोबत मिळणाऱ्या मानधनाच्या रकमे व्यतिरिक्त काही राज्य सरकार स्वतंत्रपणे नगद पुरस्कार जाहीर करतात.


उत्तर लिहिले · 4/9/2021
कर्म · 121765
0
sicher! तुमच्या प्रश्नाची विस्तृत माहिती खालीलप्रमाणे:

परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र, अशोक चक्र, कीर्ती चक्र व शौर्य चक्र यांचे महत्त्व आणि ते कधी दिले जातात याबद्दल माहिती:

1. परमवीर चक्र:

महत्व: परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्चMilitary सन्मान आहे. हा पुरस्कार शौर्य, त्याग आणि पराक्रमाचे असाधारण प्रदर्शन करणाऱ्या सैनिकांना दिला जातो. युद्धकाळात शत्रूंना पराभूत करण्यासाठी अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.

कधी दिला जातो: हा पुरस्कार युद्धकाळात शौर्य गाजवल्याबद्दल मरणोत्तर किंवा जीवित सैनिकांना दिला जातो.

2. महावीर चक्र:

महत्व: महावीर चक्र हा भारतातील दुसरा सर्वात मोठाMilitary सन्मान आहे. हा पुरस्कार भूमी, समुद्र किंवा आकाशात असामान्य शौर्य दाखवणाऱ्या सैनिकांना दिला जातो.

कधी दिला जातो: हा पुरस्कार युद्धकाळात शौर्य गाजवल्याबद्दल मरणोत्तर किंवा जीवित सैनिकांना दिला जातो.

3. वीर चक्र:

महत्व: वीर चक्र हा भारतातील तिसरा सर्वात मोठाMilitary सन्मान आहे. हा पुरस्कार शत्रू समोर शौर्य, पराक्रम आणि त्याग दर्शवणाऱ्या सैनिकांना दिला जातो.

कधी दिला जातो: हा पुरस्कार युद्धकाळात शौर्य गाजवल्याबद्दल मरणोत्तर किंवा जीवित सैनिकांना दिला जातो.

4. अशोक चक्र:

महत्व: अशोक चक्र हा शांतता काळात दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार शौर्य, शूरता आणि आत्म-बलिदान दर्शवणारे सैनिक किंवा नागरिकांना दिला जातो.

कधी दिला जातो: हा पुरस्कार शांतता काळात असामान्य शौर्य दाखवणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

5. कीर्ती चक्र:

महत्व: कीर्ती चक्र हा शांतता काळात दिला जाणारा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार शौर्य, शूरता आणि त्याग दर्शवणारे सैनिक किंवा नागरिकांना दिला जातो.

कधी दिला जातो: हा पुरस्कार शांतता काळात असामान्य शौर्य दाखवणाऱ्या व्यक्तींना दिला जातो.

6. शौर्य चक्र:

महत्व: शौर्य चक्र हा शांतता काळात दिला जाणारा तिसरा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार शौर्य, शूरता आणि पराक्रम दर्शवणाऱ्या सैनिकांना किंवा नागरिकांना दिला जातो.

कधी दिला जातो: हा पुरस्कार शांतता काळात शौर्य गाजवल्याबद्दल मरणोत्तर किंवा जीवित सैनिकांना दिला जातो.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1040

Related Questions

पृथ्वी क्षेपणास्त्रा विषयी माहिती लिहा?
भारतातील कोणList of equipment of the United States Marine Corps
सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
स्थल सेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात?
पर्यावरण संरक्षणाचे घोष वाक्य काय आहे?
भारतीय सैनिकांना दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्काराची नावे व माहिती मिळेल का?
टि ऐ आर्मी म्हणजे काय?