१) सेवायोगी संत श्री गाडगे बाबा- जन्म : कोतेगाव (शेंडगाव), २३ फेब्रुवारी १८७६; - अमरावती, २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे
२) गणपती उर्फ हरी महाराज -
१९३० च्या दशकात, वारकरी संप्रदायातील गणपती उर्फ हरी महाराज भभुतकर (जन्म १८८५-मृत्यू १९४४, रा. मंगरूळ दस्तगीर, जिल्हा अमरावती) यांनी त्यांच्या अनुयायांना त्यांच्या जाती सोडायला लावल्या.
भारताच्या स्वातंत्र्यानंतर हे अनुयायी जातीच्या रकान्यात "अजात" लिहू लागले.
३) राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज -
पूर्ण नाव - माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते
४) संत श्री पाचलेगवकर महाराज-
यांचा जन्म नोव्हेंबर १९१२, नरक चतुर्दशी, जिंतूर तालुका, पाचलेगाव
आई/वडील: कृष्णाबाई /राजारामपंत पांडे (कुलकर्णी)
समर्थ रामदास स्वामींनी प्रतिकूल परिस्थितीत शिवाजी महाराजांकरवी स्वराज्य स्थापनेचं भव्यदिव्य कार्य करवून घेतलं, अगदी तशाच बिकट परिस्थितीत भारतमातेच्या मुक्तीचं कार्य जनता जनार्दनाच्या मदतीनं सिद्धिला नेणारे अगदी रामदास स्वामींचाच पुढचा अवतार म्हणता येईल असे संत म्हणजे प. पू. पाचलेगावकर महाराज.
५) वामनराव पै.-
जन्म -२१ ऑक्टोबर १९२३ मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यू -२९ मे २०१२ (वय ८९) मुंबई, महाराष्ट्र, भारत
मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले वामनराव पै मुंबई विद्यापीठाचे पदवीधर होते. जीवन विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री. वामनराव पै, सेवानिवृत्त उपसचिव, फायनान्स डिपार्टमेंट, मंत्रालय, मुंबई. हे गेली ५४ वर्षे सातत्याने व निरपेक्षपणे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून व नाम संप्रदाय मंडळातर्फे प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादी द्वारा समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.