व्याकरण नाम

नामाचे किती प्रकार आहेत?

2 उत्तरे
2 answers

नामाचे किती प्रकार आहेत?

3
 वास्तविक किंवा काल्पनिक सृष्टीतील कोणतीही वस्तू दाखविणारा जो विकारी शब्द त्यास नाम असे म्हणतात. 

उदा.- वही, हरी, धैर्य, चातुर्य, प्रामाणिकता.


याठिकाणी वस्तू ह्या शब्दाचा अर्थ प्राणी, पदार्थ व त्यांच्या ठिकाणी असणारे गुणधर्म असा आहे,



नामांचे प्रकार तीन आहेत ते पुढीलप्रमाणे :

 1. सामान्यनाम
2. विशेषनाम
3. धर्मवाचक (किंवा भाववाचक)


१) सामान्य नाम :-
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखतो त्यास सामान्य नाम असे म्हणतात. 
उदाहरणार्थ - मुलगा , समुद्र , फुले, नदी, शहर, पुस्तक, खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी.

२) विशेष नाम :-
एखाद्या वस्तूंना , व्यक्तींना , प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने ओळखतो त्या नामास सामान्य नाम असे म्हणतात.
उदाहरणार्थ - गोदावरी , मुंबई , जया, भारत, कावेरी, हिमालय, लाल, गणपती, अमित, अरबी इत्यादी.

३) भाववाचक नाम :-
ज्या भावना किंवा कल्पना आपण पाहू शकत नाही पण त्यांचा अनुभव घेतो अशांच्या नामास भाववाचक नाम असे म्हणतात .
उदाहरणार्थ - उदास , नम्रता , एकता, आळस, राग, प्रेम, हुशारी, मोठेपणा, लबाडी, सौंदर्य, पावित्र्य इत्यादी.

उत्तर लिहिले · 3/9/2021
कर्म · 25830
0
येथे नामाच्या प्रकारांविषयी माहिती दिली आहे:

नामाचे मुख्य पाच प्रकार आहेत:

  1. सामान्य नाम: एकाच जातीच्या पदार्थांमधील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम म्हणतात.
    • उदा: मुलगा, नदी, शहर, पर्वत, पुस्तक.
  2. विशेष नाम: ज्या नामाने एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तु, प्राणी किंवा स्थळाचा बोध होतो, त्यास विशेष नाम म्हणतात.
    • उदा: राम, गंगा, मुंबई, हिमालय, रामायण.
  3. भाववाचक नाम: ज्या नामाने एखाद्या वस्तूतील गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो, त्यास भाववाचक नाम म्हणतात.
    • उदा: सौंदर्य, धैर्य, कीर्ती, आनंद, दुःख.
  4. समूहवाचक नाम: ज्या नामाने एखाद्या समूहाचा बोध होतो, त्यास समूहवाचक नाम म्हणतात.
    • उदा: वर्ग, सैन्य, समिती, मंडळ, कुटुंब.
  5. पदार्थवाचक नाम: ज्या नामाने धातू, द्रव्य किंवा वस्तूंचा बोध होतो, त्यास पदार्थवाचक नाम म्हणतात.
    • उदा: सोने, पाणी, साखर, तेल, कापड.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

नामाचे प्रकार कसे शिकवाल?
नामाचे मुख्य प्रकार सांगून प्रत्येकाची व्याख्या सांगा आणि उदाहरणे लिहा.
खालीलपैकी समूहवाचक नाम ओळखा: स्पर्धा, गडी, संघ, खेळ?
खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते?
खालीलपैकी समूहवाचक नाम कोणते आहे? 1 स्पर्धा 2 गडी 3 संघ 4 खेळ?
नामाचे तीन प्रकार?
नामाचे उपप्रकार किती?