2 उत्तरे
2
answers
मराठी उखाणा लग्नासाठी?
1
Answer link
एका स्त्रीच्या जीवनातील आनंदाच्या क्षणांपैकी एक आनंदाचा क्षण म्हणजे लग्न होय. प्रत्येक स्त्रीच्या लग्नाविषयी काही अपेक्षा असतात जसे काळजी करणारा नवरा हवा असणे, प्रेमळ तसेच स्वभावाने अगदी छान असा नवरा प्रत्येक मुलीला हवा असतो. कारण त्यांना आपलं संपूर्ण आयुष्य एका व्यक्तीसोबत काढायचे असते. मग त्या व्यक्तीने त्यांना जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्यांची साथ द्यावी, आणि आयुष्यभर त्यांची काळजी करावी या प्रमाणे.
लग्नासाठी बऱ्याच मुली उखाणे शोधत असतात. आजच्या लेखात नवरी साठी स्पेशल उखाणे ( तेही मराठी मध्ये आपल्या साठी घेऊन आलोत. ज्या उखाण्यांचा फायदा आपल्याला लग्नात होईल. तसेच आपल्या एखाद्या मैत्रिणीं चा विवाह असेल तर त्या मैत्रिणीला सुध्दा या उखाण्यांमुळे फायदा होईल, आणि लग्नात उत्कृष्ट उखाणे (बोलल्यामुळे समोरच्यावर एक उत्तम प्रभाव पडणार. तर चला पाहूया नवरी साठी उखाणे तेही मराठीत.
नवरीसाठी भरपूर नवीन उखाणे –
नवरी चे उखाणे –
१)छन छन बांगड्या, छुम छुम पैंजन,
… रावांचे नांव घेते, ऐका सारे जण.
२)गोकुळा सारखं सासर, सारे कसे हौशी
.. रावांचे नांव घेते, तिळ संक्रांती च्या दिवसी.
३)माहेर तसं सासर, नाते संबंधही जुने,
.. रावं आहेत सोबत, मग मला कशाचे उणे.
४)कपाळाचं कुंकु, जसा चांदण्यांचा ठसा,
… रावांचे नांव घेते, सारे जण बसा.
५)पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
… रावांच्या नावाने घालते मंगल सुत्रांचा हार.
६)मंदिरात वाहाते, फुल आणि पान,
… रावांचे नांव घेते, ठेऊन सर्वांचा मान.
७)रातराणीचा सुगंध, त्यात मंद वारा,
… रावांचे नांवाचा, भरला हिरवा चुडा.
७)खडी साखरेची गोडी अन् फुलांचा सुगंध,
… रावांच्या संसारात, स्वर्गाचा आनंद.
पंच पक्वांनाच्या ताटात, वाढले लाडू पेडे,
८)… रावांचे नांव घेतांना, कशाला आढे वेढे.
९)मंदिराचे वैभव, परमेश्वराची मुर्ती,
… रावांचे नांव घेऊन करने इच्छापूर्ती.
१०)सनई आणि चौघडा, वाजे सप्त सुरात,
… रावांचे नांव घेते, …च्या घरात.
पजेच्या साहीत्यात, उदबत्तीचा पुडा,
११)… रावांच्या नावाने, भरला सौभाग्याचा चुडा.
१२)सावित्रीने नवस केला-पती मिळावा सत्यवान,
… रावांच्या जीवावर मी आहे भाग्यवान.
१३)रला यांनी हात, वाटली मला भिती,
हळूच म्हणाले… राव अशीच असते प्रिती.
१४)नववधु आले मी घरी, जीव माझा गेला बावरुन,
…रावांनी मारली हाक, शिणच गेला निघुन,
१५)कपाळावर कुंकु, हिरवा चुडा हाती,
…रावं माझे पति, सांगा माझे भाग्य किती.
१६)हृदयात दिले स्थान, तेव्हा दिळा हातात हात,
… रावांच्या जीवनात लाविते प्रितीची फुलवात.
१७)नव्हती कधी गाठ मेट, एकदाचं झाली नजरा नजर,
आई-वडी विसरले…रावांसाठी सुटला प्रितीचा पाझर,
१८)चांदीचे जोडवे पतीची खुन,
.. रावांचे नांव घेते,… ची सुन.
१९)दारी होता टेबल, त्यावर होता फोन,
… रावांनी पिक्चर दाखवला हम आपके हैं। कौन?
२०)मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा,
… रावांच नाव घेते निट लक्ष ठेवा.
२१)अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,
आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.
गुलाबाचे फुल दिसायला ताजे,
… रावांचे नांव घेते, सौभाग्य माझे.
डाळिंबाचे झाड, पानोपानी दाटले,
… रावांचे नांव घेतांना, आनंदी मला वाटले,
…रावांच्या नावाने, भरला हिरवा चुडा,
त्यांच्यावर करेल मी प्रेमाचा सडा.
संसार रुपी वेलीचा, गगनात गेला झुला,
… रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला,
अंगणात वृंदावन, वृंदावनात तुळस,
… रावांच नांव घेतांना, कसला आला आळस.
पतीव्रतेचे व्रत घेऊन, नम्रतेने वागते,
… रावांचे नांव घेतांना, आशीर्वाद मागते.
पोर्णिमेचा दिवस चंद्राला लागते चाहूल,
…रावांच्या जीवनात टाकते मी पहिले पाऊल.
तळहातावर मेंदी रचली, त्यावर तेल ही शिंपडले,
…रावांचे मन, मी केव्हाच जिंकले.
एका जन्माचं वचन न घेता जन्मोजन्मी आपल्या पतीची सौभाग्यवती राहण्याचे वचन घेणारी नवरी. त्याच नात्याला उखाण्यांमधून एका विशिष्ट शब्दात मांडण्यासाठी या लेखात आपल्याला बरेच नवरी साठी उखाणे लिहिलेले दिसतील आणि त्या उखाण्यांचा उपयोग करून आपण सर्वांवर एक चांगला प्रभाव टाकू शकता. जर तुलना केली तर नवरदेवापेक्षा नवरीला बऱ्याच ठिकाणी उखाणे घ्यावे लागतात. आणि तेव्हा नवऱ्या मुलीला उखाणे येणे खूप आवश्यक असते.
आकाशी चमकते तारे, जमिनीवर चमकते हिरे,
… राव हेच माझे अलंकार खरे.
लावित होते कुंकु, त्यात पडला मोती,
…रावां सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती,
केसात माळते रोज, मी गुलाबाचे फुल,
… राव माफ करतात माझी प्रत्येक भुल.
डाळिंब ठेवले फोडून, संत्र्याची काढली साल,
.. रावांच्या नावाने कुंकु लावते लाल.
अंगणात होती मेथी, पाणी घालु किती,
… रावांच्या हातात सत्यनारायनाची पोथी.
ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,
… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल.
कण्वमुनीच्या आश्रमात शकुंतलेचे माहेर,
… रावांनी केला मला सौभाग्याचा आहेर,
शंकराची पुजा पार्वती करते खाली वाकुन,
… रावांचे नांव घेते, सर्वांचा मान राखुन,
श्री विष्णुचा मस्तकावर सदैव असतो शेष,
… रावांचे नांव घेऊन करते गृह प्रवेश.
ओल्याचींब केसांना, टावेल द्यां पुसायला,
… रावांचे नाव घेते शालु द्या नेसायला.
यमुना जलावर पडली ताजमहालाची सावली,
… रावांची जन्मदाती, धन्य ती माऊली,
अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
… रावाना घास घालते वरण-भात-तुपाचा,
लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
… रावांचे नांव घेऊन उरवाना करते पुरा.
राज हंस पक्षी शोभा देतो वनाला,
… रावांचे नाव घेते, आनंद माझ्या मनाला,
श्रीकृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,
… रावांच्या जिवनात आदर्श संसार करीन.
वय झाले लग्नाचे, लागली प्रेमाची चाहूल,
… रावांचे जीवनात टाकले मी पाऊल.
घातली मी वरमाला हसले… राव गाली,
थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली.
जेव्हा मी ह्यांना पाहते चोरुन विचार करते मुक होऊन,
घडविले देवानी… रावांना जीव लावून,
राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न दशरथाला पुत्र चार,
… रावनी घातला मला मंगळ सुत्राचा हार,
पोर्णिमेचा चंद्र आकाशात दिसतो साजरा,
… रावांनी आणला मला मोग-याचा गजरा,
गृह कामाचे शिक्षण देते माता,
…रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरीता.
दीन दुबळ्यांचे गाहाने परमेश्वरानी ऐकावे,
… रावा सारखे पत्ती मिळाले आणखी काय मागावे.
पषातील धुंद वारा छेडीतो, माझ्या अंगाला,
… रावांचे नांव घेते सुर्यनारायनाच्या साझीला.
चंदेरी सागरात, रुपेरी लाटा,
… रांवाच्या सुखदुःखात अर्धा माझा वाटा.
नाजुक अनारसे साजुक तुपात तळावे,
…रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.
हिमालय पर्वतावर, बर्फाच्या राशी.
… रावांचे नांव घेते… च्या दिवशी.
वेळेचे काळचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस,
…रावांचे नांव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस,
शरदाचे संपले अस्तीत्व, वसंताची लागली चाहूल,
…रावांच्या संसारात टाकते पहीले पाऊल.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
… रावांचे नांव घेते, पत्नी या नात्याने.
नवरदेवासाठी उखाणे (
माणसाच्या जीवनातील आनंदाच्या क्षणातील एक क्षण म्हणजे लग्न आणि आपल्याकडे म्हटल्या जात कि लग्न होणे म्हणजे दोनाचे चार हात होणे. लग्न म्हटलं म्हणजे एक जबाबदारी माणसावर येते आणि त्या जबाबदारी ला योग्य प्रकारे आपण स्वीकारायचे प्रयत्न करत असतो, संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या परंपरा आहेत.
लग्नाआधी कुठे गोंधळ होते, हळद होते, आणि बाकी गोष्टीही मग अश्या ठिकाणी नवरदेवाला आणि नवरीला सुध्दा उखाणे घ्यावे लागतात, म्हणजेच वर आणि वधूला उखाणे घ्यावे लागतात. आणि बरेचदा उखाणे पाठ नसल्याने आपल्याला तिथे हार मानावी लागते आणि फक्त नवरीचे किंवा नवरदेवाचे साधे नाव घेऊन आपल्याला समोरच्याला समजावे लागते पण तेच जर कोणी म्हटलं की उखाणा घ्या तेव्हा आपल्या तोंडातून खळ खळ उखाणे येण्यासाठी आजच्या लेखात नवरदेवासाठी काही उखाणे घेऊन आलेलो आहे.
आशा करतो आपल्याला आवडतील. तर चला पाहूया काही नवरदेवासाठी काही उत्कृष्ट उखाणे.
नवरदेवासाठी उखाणे /
काही शब्द येतात ओठातून, …… चं नाव येतं मात्र हृदयातून.
कोल्हापुरला आहे महालक्ष्मीचा वास, मी भरवितो …… ला जलेबी चा घास.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
पुरणपोळीत तुप असावे साजुक, ……. आहेत आमच्या फार नाजुक.
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …….च्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो प्रेमाने.
सितेसारखे चरित्र, लक्ष्मी सारखं रूप, …………..मला मिळाली आहे अनुरूप.
गाडीत गाडी डेक्कन क्वीन, ……. आहे माझी ब्युटी क्वीन.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, ……..झाली आज माझी गृहमंत्री.
चांदीच्या ताटात रुपया वाजतो खणखण, ………चे नाव घेऊन सोडतो कंकण.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
मोह नाही, माया नाही, नाही मत्सर हेवा, ……….चे नाव घेतो नीट लक्ष ठेवा.
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार,
श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी, … च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.
उखाणे ही एक पद्धत झालेली आहे वर किंवा वधूचे स्वरात किंवा एका वाक्यात नाव घेण्याची. आणि उखाण्यांमध्ये समोरच्या व्यक्तीची थोडीशी स्तुती केल्या जात असते की समोरची व्यक्ती आपल्यासाठी किती महत्वाची आहे. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला एक समाधान लाभावे. म्हणून या चालीरीती चे पालन आपल्या संस्कृतीत केल्या जात आहे.
खाली आणखी काही उखाणे दिलेले आहेत ज्याचा उपयोग नवरदेव लग्नाच्या उखाण्यां साठी करू शकतात. तर चला खाली पाहू आणखी काही उखाणे.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
पंचपक्वनाच्या ताटात वाढले जलेबी,पेढे, ………चे नाव घ्यायला कशाला आढे वेढे.
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.
टाळ चिपळ्यांचा गजर त्यामधे वाजे विणा, … चे नाव घेतो सर्व जयहिंद म्हणा.
निलवर्ण आकाशातुन पडती पावसाच्या सरी, … चे नावं घेतो… च्या घरी.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, ………चे नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.
अजिंठा वेरूळची शिल्पे आहेत सुंदर, ………..माझी सर्वांपेक्षा सुंदर.
एक होती चिऊ, एक होता काऊ, ……..चे नाव घेतो डोक नका खाऊ.
सनई चौघडा वाजतो सप्तसुरात, ………… चे नाव घेतो……..च्या घरात.
निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेतो ठेऊन सर्वांचा मान.
संसार रुपी सागरात पती पत्नीची नौका, …चे नाव घेतो सर्व जण ऐका.
पंच पक्वांनाच्या ताटात वाढले लाडू पेढे, ते नाव घेतांना कशाला हवे आढे वेढे,
उगवला सुर्य मावळली रजनी, … चे नाव सदैव माझ्या मनी,
कृष्णाच्या बासरीचा राधेला लागला ध्यास, … देतो मी लाडवाचा घास.
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला… प्रेमपुतळी,
हत्तीच्या अंबारीला मखमली झुल, माझी … नाजुक जसे गुलाबाचे फुल.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
लग्नाचा वाढदिवस करु साजरा, .. तुला आणला मोग-याचा गजरा.
लग्नात बरेच ठिकाणी नवरदेवाला अडवून त्याच्या तोंडून नवरीचे नाव बोलून घेतल्या जाते. आणि तो एक माध्यम असतो म्हणजे उखाणा. आणि त्याच उखण्याच्या जोरावर काही ठिकाणी नवरदेवाला गृह प्रवेश मान्य होतो नाहीतर नाही.
मग अश्या परिस्थिती मध्ये नवरदेवाला उखाणे घेता येणे आवश्यक होईल ना मग त्यासाठी च माझी मराठी सुध्दा खास नवरदेवासाठी मराठीत उखाणे घेऊन आलेली आहे.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
उभा होतो मळ्यात, नजर गेली खळ्यात, नवनांचा हार … च्या गळ्यात.
तासगावच्या गणपतीचा गोपुर बांधनारे होते कुशल. … चे नाव घेतो तुमच्या करीता स्पेशल
प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट, … बरोबर बांधली जीवनगाठ.
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
सायंकाळच्या आकाशाचा पिवळसर रंग, … माझी नेहमी घरकामात दंग,
चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती, … दर्शनाने / स्पर्शाने सारे श्रम हरती.
जन्म दिला मातेने पालन केले पित्याने, … च्या गळ्यात मंगळसुत्र बांधतो प्रेमाने,
वेरुळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, … आहे माझी सर्वा पेक्षा
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास,
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी … म्हणजे लाखात सुंदर नार,
अस्सल सोने चोविस कॅरेट, … अन् माझे झाले आज मॅरेज.
जीवनात लाभला मनासारखा साथी, माझ्या संसार रथावर … सारथी.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
चंद्रला पाहून भरती येते सागराला, … ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
0
Answer link
लग्नासाठी मराठी उखाणे:
-
आज आहे हळदीचा दिवस, रंगली आहे नवरी , यांच्या साथीने पूर्ण होतील माझ्या इच्छा साऱ्या!
चांदीच्या ताटात जिलेबीचे जोड
हे माझ्या सुखाचे Dough!
सासर माझे स्वर्ग, पती परमेश्वर
यांच्या नावाने भरते मी कुंकवाचा करंडा!
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
च्या नावाने मागते सौभाग्य!
शिव शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान
हे माझे प्राण!