मोबाईल फोन तंत्रज्ञान

मोबाईलचे फायदे तोटे काय आहेत?

2 उत्तरे
2 answers

मोबाईलचे फायदे तोटे काय आहेत?

2
मोबाईलचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या व्यक्तीशी संपर्क साधू शकतो. 
आज कालच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमुळे घर बसल्या अनेक गोष्टी करणे शक्य झाले आहे.
तुम्ही मोबाईल मध्ये मनोरंजनासाठी गाणी ऐकू शकतात, गेम खेळू शकतात व चित्रपट पाहू शकतात.
आज कालचे मोबाईल स्लिम असल्याने तुम्ही त्यांना खिश्यात ठेवून कुठेही जाऊ शकतात.
मोबाईल फोनच्या कॅमेराने तुम्ही फोटो, व्हिडिओ बनवू शकतात.
मोबाईल फोन मध्ये कॅलेंडर, कॅल्क्युलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक इ. सुविधा असतात, म्हणून आता तुम्हाला या सर्व गोष्टी सोबत नेण्याची गरज नाही. आपल्या मोबाईल फोन च्या साह्याने आपण कॅलेंडर, कॅल्कुलेटर, अलार्म, घड्याळ, नोटबुक या गोष्टी वापरू शकतात.
कुठेही जायचे असल्यास मोबाईल मध्ये गूगल मॅप आणि GPS च्या मदतीने आपण रस्ता शोधू शकतो.
मोबाईल फोन मुळे बँकेत न जाता, घरबसल्या एका खात्यातून दुसर्‍या खात्यात पैसे पाठविणे शक्य झाले आहे.
मोबाईलच्या साह्याने तुम्ही ऑनलाईन अन्न देखील मागवू शकतात.
मोबाईल मध्ये इंटरनेट ची सुविधा वापरून कोणतीही माहिती एका क्लिक वर मिळवता येते.
मोबाईल मध्ये फ्लॅश लाईट ची पण सुविधा असते याचा उपयोग अंधारात फोटो काढण्यासाठी होतो. परंतु तुम्ही याला टॉर्च म्हणून देखील वापरू शकतात.
व्यापारी लोकांना व्यवस्थित व्यापार करण्यात मोबाईल खूप मदत करतो.



मोबाईल वापराचे तोटे/ दुष्परिणाम (mobile che tote/ dushparinam)
मोबाईल फोन मधून निघणारे रेडिएशन मानवी शरीराला हानीकारक असतात, म्हणून कामापेक्षा जास्त वेळ मोबाईल धरून बसू नये.
मोबाईल इंटरनेट चे भाव भरपूर आहेत या मुळे प्रती माह जास्तीचे पैसे खर्च होतात. 
आजकालच्या तरुणांना अति मोबाईल वापराची सवय लागली आहे, सोशल मीडियाच्या अधिक वापर केल्याने ते वाईट रस्त्याला लागू शकतात.
लहान मुले मोबाईलवर गेम खेळण्यात वेळ वाया घालवतात. यामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो.
प्रति मोबाईल वापराने बुद्धी कमजोर आणि एकाग्रता कमी होते.
मोबाईल हॅकिंग मुळे गोपनीय माहिती चोरी जाण्याची शक्यता असते.
वाईट बुद्धीचे लोक मोबाईल कॅमेराचा चुकीचा उपयोग करू शकतात. 
मोबाईल तुटला तर त्यातील सर्व माहिती नष्ट होण्याचा धोका असतो.
मोबाईल मध्ये हेडफोन लावून मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने कानाच्या समस्या होऊ शकतात.
 नवनवीन मोबाईल मॉडेल खरेदी करण्याचा क्रेझ वाढत आहे, ज्यामुळे पैश्याची बरबादी पण होत आहे.
वाहन चालवताना मोबाईल वापरल्याने किंवा मोबाईलवर बातचीत केल्याने अपघात होण्याची शक्यता असते.
चार्जिंगला मोबाईल लावून गप्पागोष्टी केल्याने मोबाईल फुटण्याची शक्यता असते.
मोबाईलच्या अतिवापराने कुटुंबातील लोकांचा एकमेकांमधील संवाद संपलेला आहे, प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो.


तर मित्रहो हे होते मोबाईल चे फायदे व तोटे.
उत्तर लिहिले · 8/8/2021
कर्म · 34255
0

मोबाईलचे फायदे आणि तोटे खालीलप्रमाणे:

मोबाईलचे फायदे:
  • संपर्क: मोबाईलमुळे कोणाशीही आणि जगात कुठेही संपर्क साधता येतो.
  • मनोरंजन: मोबाईलवर गाणी ऐकणे, चित्रपट पाहणे, खेळ खेळणे शक्य होते.
  • माहिती: इंटरनेटच्या साहाय्याने कोणतीही माहिती झटपट मिळवता येते.
  • शिक्षण: विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण घेऊ शकतात आणि शैक्षणिक साहित्य वाचू शकतात.
  • व्यवसाय: व्यवसायासाठी मोबाईल खूप महत्त्वाचा आहे. ईमेल, मीटिंग्स आणि इतर कामांसाठी उपयोग होतो.
  • नेव्हिगेशन: नकाशाच्या साहाय्याने অচूक पत्ता शोधता येतो.
  • Bank Transaction : मोबाईलमुळे आपण घरबसल्या बँकेचे व्यवहार करू शकतो.
मोबाईलचे तोटे:
  • वेळेचा अपव्यय: अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ वाया जातो.
  • एकाग्रता कमी होणे: सतत नोटिफिकेशनमुळे अभ्यासात लक्ष लागत नाही.
  • आरोग्यावर परिणाम: जास्त वेळ मोबाईल वापरल्याने डोळ्यांवर आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
  • सुरक्षेचा धोका: मोबाईलमध्ये असलेली माहिती चोरीला जाऊ शकते.
  • सामाजिक संबंधांवर परिणाम: लोक प्रत्यक्ष संवाद कमी करतात आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात.
  • Addiction : काही लोकांना मोबाईलची खूप जास्त सवय लागते, ज्यामुळे ते इतर कामांकडे दुर्लक्ष करतात.

मोबाईलचा वापर गरजेनुसार आणि योग्य प्रकारे केल्यास त्याचे फायदे मिळू शकतात. अतिवापर टाळल्यास त्याचे दुष्परिणाम टाळता येतील.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1080

Related Questions

चीनमध्ये तयार होणाऱ्या कोणत्या उत्पादनांना भारतात मोठी मागणी होती?
मोबाईल मध्ये एअरप्लेन मोड का असतो?
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सर्वात स्वस्त नवीन मोबाईल कोठे मिळतो?
एखाद्याचे मोबाईल नंबरचे लोकेशन शोधता येते का?
Do you like to use mobile phone? Why?
20 हजार रुपये किमतीचा मोबाइल पाण्यात पडल्यानंतर खराब होईल का?
मला Realme Narzo 30 मोबाईल घ्यायचा आहे, पण कोणी सांगा हा मोबाईल कसा आहे, घ्यायला योग्य आहे का?