2 उत्तरे
2
answers
श्रवण कौशल्याचे महत्त्व काय आहे?
0
Answer link
शिक्षण प्रक्रियेत श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषा, समाजशास्त्र यांसारखे विषय आपण बव्हंशी श्रवणाद्वारे शिकतो. श्रवणाला दृक् माध्यमाची जोड असेल तर आकलन सोपे होते. खास करून गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांना ही गोष्ट लागू होते.
श्रवण कौशल्यांचा विकास
श्रवण कौशल्यांचा विकास
कानावर सहज पडणारे ध्वनी म्हणजे ऐकणे तर विशिष्ट हेतूने लक्ष देऊन ऐकणे म्हणजे श्रवण
कानावर सहज पडणारे ध्वनी म्हणजे ऐकणे तर विशिष्ट हेतूने लक्ष देऊन ऐकणे म्हणजे श्रवण. कान उघडे, पण विचार, मन दुसरीकडे असेल तर कानात काही शिरत नाही, म्हणजेच जे ऐकतो त्याचे आकलन होत नाही. एकाच वेळी अनेक ठिकाणी अनेक आवाज होत असतात, त्यातून आपणास हवे तेवढेच आवाज आपण ऐकतो, लक्षात ठेवतो.
शिक्षण प्रक्रियेत श्रवणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाषा, समाजशास्त्र यांसारखे विषय आपण बव्हंशी श्रवणाद्वारे शिकतो. श्रवणाला दृक् माध्यमाची जोड असेल तर आकलन सोपे होते. खास करून गणित, विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांना ही गोष्ट लागू होते.
आंधळी कोशिंबीरसारखा खेळ ज्यात स्पर्शाने अथवा आवाजाने वस्तू, व्यक्ती ओळखल्या जातात, शाळा भरताना बाळगलेले मौन, यांतून श्रवण शक्ती विकसित होत असतात. आपल्या शिक्षणपद्धतीत जशी इयत्ता वाढते तसतसा व्याख्यान पद्धतीचा वापर वाढत जातो.
अध्ययनात श्रवणकौशल्यांचा उपयोग करताना काही गोष्टी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. त्या पुढे नमूद केल्या आहेत-
’जे ऐकले ते सारे लक्षात राहील असा आग्रह धरू नका.
’ नवा विषय, नवी माहिती, अवघड पाठ एकदा ऐकून लगेच समजेल असे नाही, हे ध्यानात घ्यावे.
’ पाठ ऐकायला सुरुवात करण्यासाठी आधी मनाची पूर्वतयारी करा. ताठ बसा, थकला असाल, मनात गोंधळ असेल तर लक्ष लागणार नाही. म्हणून व्याख्यान ऐकण्यापूर्वी शांत राहा.
’जो पाठ शिक्षक-प्राध्यापक शिकवणार आहेत, त्याची पूर्वतयारी करून जा.
’अभ्यासक्रमाबरोबर इतर व्याख्याने, चर्चासत्रे, कथा, कीर्तन, रेडियोवरील कार्यक्रम जरूर ऐका, जेणेकरून लक्षपूर्वक ऐकण्याची सवय जडेल तसेच तुमची ज्ञानकक्षाही रुंदावेल.
’आपण जे ऐकतो ते आपण आपल्या कळत-नकळत आपला गतानुभव, ज्ञान, माहितीशी जोडतो. त्यामुळे व श्रवण-वाचनाने समृद्ध होण्याचा प्रयत्न करा.
जे ऐकले त्याला लय किंवा ठेका असेल किंवा विषय तुमच्या आवडीचा, परिचयाचा असेल तर तो पटकन समजतो.
’शिकण्यादरम्यान तुम्ही जे ऐकत आहात, त्या संदर्भातील तुमचे पूर्वज्ञान, त्यांच्यातील साम्य-फरक शोधा, जे ऐकले त्याचे सार तुम्ही तुमच्या शब्दांत लिहून काढा. यामुळे त्या गोष्टी दीर्घकाळ लक्षात राहतील.
’जे ऐकले ते क्रमवार लक्षात राहण्यासाठी ऐकत असतानाच नोंदी करा. शब्दरूपाने अथवा सांकेतिक भाषेत, आकृतीच्या रूपात अथवा मोबाइलमध्ये रेकॉर्ड करता येईल.
’जे ऐकले ते सतत आठवत राहा. ते इतरांशी शेअर करा. त्यांच्याशी याबाबत चर्चा करा, म्हणजे ही ‘तात्पुरती जमा माहिती’ आपोआपच कायमस्वरूपी स्मरणशक्तीत रूपांतरित होईल.
’ऐकताना बोलणाऱ्याशी समरस व्हा. अनेकदा ऐकताना खास करून दमला असलात तर तुम्हाला झोप येऊ शकते. म्हणूनच वक्त्याकडे पाहा. श्रोत्याची सकारात्मक देहबोली, चेहऱ्यावरचे भाव, डोळ्यांद्वारे साधला जाणारा संवाद वक्तयाला प्रोत्साहित करत असतात.
’एखादा मुद्दा पटला नाही, समजला नाही, तर त्याची नोंद करा. प्रथम स्वत: त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, अन्यथा वक्त्याला नम्रपणे विचारा.
’सतत हेडफोन लावून ऐकणे अथवा सतत मोठमोठय़ा आवाजाच्या ठिकाणी वावरणे यामुळे केवळ तुमच्या श्रवणशक्तीवरच विपरीत परिणाम करतात असे नाही, तर त्यातून तुमच्या कानाच्या पडद्याला इजा होते, डोकेदुखी जडते, स्मरणशक्ती कमी होते, नैराश्य येते.
’जितके दर्जेदार, वेगवेगळ्या धाटणीचे, विपुल ऐकाल तेवढे छान प्रकट वाचन करणारे व्हाल, उत्तम संवाद साधू शकाल.
0
Answer link
श्रवण कौशल्य (Listening skills) महत्वाचे का आहे, याची काही कारणे खालीलप्रमाणे:
- परिणामकारक संवाद: श्रवण कौशल्ये आपल्याला इतरांशी अधिक प्रभावीपणे संवाद साधण्यास मदत करतात. जेव्हा आपण लक्षपूर्वक ऐकतो, तेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला योग्य प्रतिसाद देऊ शकतो आणि गैरसमज टाळू शकतो.
- संबंध सुधारणे: चांगले श्रोते बनून आपण आपले संबंध सुधारू शकतो. लोक त्यांच्या समस्या आणि विचार ऐकणाऱ्या लोकांकडे आकर्षित होतात.
- शिकणे आणि आकलन: व्याख्याने, चर्चा आणि सादरीकरणे यांसारख्या शैक्षणिक वातावरणात श्रवण कौशल्ये महत्त्वाची आहेत. लक्षपूर्वक ऐकल्याने आपल्याला माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजते.
- समस्या निराकरण: जेव्हा आपण एखाद्या समस्येबद्दल बोलत असलेल्या व्यक्तीला लक्ष देऊन ऐकतो, तेव्हा आपल्याला समस्येचे मूळ कारण समजून घेण्यास आणि प्रभावी उपाय शोधण्यास मदत होते.
- नोकरी आणि करिअरमध्ये प्रगती: कामाच्या ठिकाणी, सूचना आणि अभिप्राय (feedback) ऐकणे महत्त्वाचे आहे. चांगले श्रवण कौशल्य आपल्याला कार्यक्षम बनवते आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्यास मदत करते.
- नेतृत्व क्षमता: एक चांगला नेता होण्यासाठी, आपल्या टीममधील सदस्यांचे विचार आणि समस्या ऐकून घेणे आवश्यक आहे. यामुळे टीममध्ये विश्वास निर्माण होतो.
- संवेदनशीलता आणि सहानुभूती: श्रवण कौशल्ये आपल्याला इतरांप्रती अधिक संवेदनशील आणि सहानुभूती दर्शवण्यास मदत करतात.
थोडक्यात, श्रवण कौशल्ये आपल्या सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.