3 उत्तरे
3
answers
भारतात पोलाद कारखाना प्रथम कोणी निर्माण केला?
2
Answer link
भारतात पोलाद उद्योगाचा पाया जमशेदजी टाटा यांनी घातला. ... १९०७ साली टाटा आयर्न ॲंन्ड स्टील कंपनीचा पहिला कारखाना कार्यान्वित झाला
पोलाद (इंग्लिश: Steel, स्टील ;) हा लोह व कार्बन यांपासून बनवला जाणारा मिश्रधातू आहे. त्यात लोहाचे प्रमाण जास्त असते व कमी प्रमाणात कार्बन असतो. म्हणजेच लोह व कोळसा खाणींचे पोलाद उत्पादनात फार महत्त्व आहे. स्पाँज आयर्न हा घटक पोलादाच्या उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो.
स्टील ब्रिज
प्रकार संपादन करा
हलके पोलाद - ०.३ टक्केपर्यंत (तीन दशांश)पर्यंत कार्बन असलेल्या पोलादास हलके पोलाद म्हणतात.
मध्यम पोलाद ०.३ ते ०.६ टक्के कार्बन असेल तर मध्यम (mild steel) पोलाद संबोधले जाते.
उच्च पोलाद - ०.६ टक्क्यावर कार्बन असेल तर त्यास उच्च पोलाद म्हणतात.
पोलादाचा पुनर्वापर होतो. लोखंडी भंगारात पुन्हा नवे पोलाद ओतले जाते. ते असे पुन्हा पुन्हा ओतूनही त्याच्या गुणवत्तेत फरक पडत नाही. तेवढेच मजबूत राहते. जुनी जहाजे तोडूनही त्यातून असे भंगार पोलाद मिळवले जाते. भारतात उत्पादन होणाऱ्या पोलादामध्ये मध्यम पोलादाचे प्रमाण सर्वांत जास्त आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी विमाने धडकवून ते जमीनदोस्त केले होते. त्या पोलादाचे भंगार बहुतांशी चीनमध्ये गेले व काही भारतात आले.
मिश्रधातू संपादन करा
पोलादाच्या मिश्रधातूंचा फायदा असा असतो की मूळ धातूपेक्षा वेगळे व चांगले गुणधर्म त्यात असतात. मॅंगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाचा कणखरपणा वाढवला जातो. त्याच प्रक्रियेत शिसे हा धातूही वापरला जातो. लोखंडापेक्षा पोलाद अनेकपटीने मजबूत, कणखर असते. पोलादामध्ये आणखी एक घटक मिळवून त्यापासून विशेष पोलाद बनवले जाते. उदा: पोलादामध्ये क्रोमियम मिळवले तर त्यापासून स्टेनलेस स्टील बनते. स्टेन - लेस म्हणजे डाग न पडणारे. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच पोलादात निकेल, तांबे, शिसे, मॅंगेनीझ, सिलिकॉन इत्यादी घटक पदार्थही मिळवून विशेष प्रकारचे पोलाद बनवले जाते. पोलादावर जस्ताचा मुलामा देऊन त्यापासून ग्लॅल्व्हनाईझ्ड पोलाद तयार होते.
मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना जास्त तन्यतेच्या धारणेची tensile strength ची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी शिसे मिश्रित पोलाद वापरतात. कारण याद्वारे यंत्रावर एकदा हे कटिंग टूल लावले की त्या टूलची झीज व्हायच्या आत हजारो घटक बनविता येतात.
अशा प्रकारचे पोलादाचे एकूण ऐंशीवर धातू आज ज्ञात आहेत. याशिवाय अनेक मिश्र धातू आहेत. त्यात पोलादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
पोलादाची तार
आर्थिक महत्त्व संपादन करा
पोलादाचे उत्पादन व वापर किती आहे हे, त्या देशाच्या आर्थिक विकासाचे निर्देशक मानले जाते. कारण त्याचा वापर पायाभूत सुविधा क्षेत्रात होतो. पोलादाचा वापर बांधकाम क्षेत्रात होतो. घरे, पूल बांधताना ते वापरले जाते. वाहन उद्योगात क्षेत्रात, यंत्रे तसेच घरगुती उपकरणे, रेल्वे, वीज अशा क्षेत्रात पोलादाचा वापर होतो. होतो. संरक्षण खात्याच्या साधनसामग्रीत मोठ्या प्रमाणात पोलाद वापरात येते.
पोलाद ओतण्याची भट्टी
वीज वितरणात पोलाद वापरले जाते
घरगुती भांड्यांसाठी स्टेनलेस स्टील पोलादाचा वापर
भारताची स्थिती
सुधारणा
प्रमुख संस्था
आयात - निर्यात
टाटा स्टील
जमशेदजी टाटा
स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड
रेल चाक कारखाना
0
Answer link
भारतात पोलाद कारखाना प्रथम जमशेदजी टाटा यांनी निर्माण केला.
जमशेदजी टाटा:
- जमशेदजी टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे संस्थापक होते.
- त्यांनी 1907 मध्ये झारखंडमधील जमशेदपूर येथे 'टाटा स्टील' (Tata Steel) या नावाने भारतातील पहिल्या पोलाद कारखान्याची स्थापना केली.
- टाटा स्टील हे भारतातील सर्वात मोठे पोलाद उत्पादन करणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे.
संदर्भ: