3 उत्तरे
3
answers
आफ्रिका खंडाच्या उत्तरेस कोणता समुद्र आहे?
1
Answer link
आफ्रिका खंड हा क्षेत्रफळाने आशियाच्या खालोखाल जगातील दुसऱ्या क्रमांकाचे खंड.

* बेटांसह क्षेत्रफळ ३,०२,७७,१३५ चौ. किमी.
* उत्तरेस केप ब्लँक (३७०२१’उ.)
* ते दक्षिणेस केप अगुल्हास (३४०५१’ द.)
* दक्षिणोत्तर लांबी सु. ८,००० किमी.
* पश्चिमेस केप व्हर्द (१७०३२’ प.)
* पूर्वेस केप गार्डाफुई (५१०२५’).
* पूर्वपश्चिम विस्तार सु. ७,४०० किमी.
किनारा सु. ३६,८८८ किमी.
या खंडातून विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त ही तीनही वृत्ते जातात.
विषुववृत्त हे जवळजवळ मध्यातून जात असले, तरी या खंडाचा सु. दोन तृतीयांश भाग त्याच्या उत्तरेस आहे व सु. पाच षष्ठांश भाग उष्णकटिबंधात आहे.
उत्तरेस जिब्राल्टरच्या चिंचोळ्या सामुद्रधुनीने ते यूरोप खंडापासून अलग झालेले असून ईशान्येस सिनाईच्या द्वीपकल्पाने ते आशियाशी जोडले गेले आहे.
* अफ्रिका खंडाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र आहे.
* पश्चिमेस अटलांटिक महासागर आहे.
* पूर्वेस तांबडा समुद्र व अरबी समुद्र यांसह हिंदी महासागर आहे.
* दक्षिणेस २०० पू. रेखावृत्त ही अटलांटिक व हिंदी महासागर यांमधील सीमा मानली जाते.

0
Answer link
आफ्रिका खंडाच्या उत्तरेस भूमध्य समुद्र (Mediterranean Sea) आहे.
हा समुद्र आफ्रिका खंडाला युरोप खंडापासून वेगळा करतो.
भूमध्य समुद्र हा जगातील सर्वात मोठ्या समुद्रांपैकी एक आहे.