2 उत्तरे
2
answers
मुलांची पहिली शाळा कोणती?
3
Answer link
शिक्षण शिकवण्याचे एक पवित्र स्थान म्हणजे शाळा होय.
भारतात वैदिक काळाच्या पूर्वीपासून शिक्षण घेतले जाते.
यावेळी लेखनकला अवगत नसल्याने गुरुकुलामध्ये जाऊन मौखिक पद्धतीने शिक्षण घेतले जाई.
पूर्वी गुरुकुलात जाऊन शिक्षण घेतले जाई. काळानुरूप शिक्षण व्यवस्थेत बदल होत गेला आणि आज शाळा, कॉलेज उपलब्ध आहेत.
उत्तर वैदिक काळापासून स्त्रियांना शिक्षण देणे बंद झाले होते.
महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली.
मुलींना शिक्षण दिले जात नसल्याने मुलींसाठी शाळा काढवी लागली.
शिक्षणाचा शोध लागला तेंव्हापासून मुलांना शिक्षण दिल जात आहे.
मुलांची पहिली शाळा कोणती हे सांगता येणार नाही.
0
Answer link
मुलांची पहिली शाळा म्हणजे त्यांचे घर.
घरातूनच मुले जगाला समजून घेण्यास सुरुवात करतात. कुटुंबातील सदस्य, विशेषत: आई-वडील आणि घरातील इतर सदस्य त्यांना मूलभूत गोष्टी शिकवतात.
औपचारिक शिक्षणाची सुरुवात शाळेत होते, पण अनौपचारिक शिक्षण घरातूनच सुरू होते.