2 उत्तरे
2
answers
मुलांना शारीरिक संबंध विषयावर कसे बोलायचे?
2
Answer link
लहान मुलांशी सेक्स एज्युकेशनबद्दल कसं बोलायचं?
'सेक्स'. हा शब्द चारचौघात उच्चारण्यास अनेकांना लाज वाटते. लहान मुलांसमोर चर्चा शक्यच नाही, अशी पालकांची पहिली प्रतिक्रिया असते.
इंटरनेटच्या या युगात, एका क्लिकवर माहिती उपलब्ध असताना. मुलांपर्यंत चुकीची माहिती पोहोचू नये, यासाठी सेक्स एज्युकेशन महत्त्वाचं आहे.
"सेक्स एज्युकेशन हा एक निरंतर प्रवास आहे. पालकांनी मुलांसोबत हा प्रवास केला पाहिजे. जन्मापासून मूल 18 वर्षांचं होईपर्यंत विविध टप्प्यात हा प्रवास केला पाहिजे."
मुलांना सेक्स एज्युकेशन कसं द्यायचं? कोणत्या वयोगटातील मुलांना किती आणि कोणती माहिती द्यायची? मुलांशी चर्चा कशी सुरू करायची? हे पुढे वाचा
लैंगिक शिक्षणाचं महत्त्व काय?
प्रत्येक मुलाला त्याच्या शरीरात होणाऱ्या बदलाबाबत आणि लैंगिकतेबद्दल जाणून घेण्याचा अधिकार आहे.
"मुलं सेक्सबद्दल प्रश्न विचारतात, शोधतात, प्रसंगी धोका पत्करतात. शारीरिक बदलांसोबत भावनिक, मानसिक आणि सामाजिक विकास होत असतो. म्हणून योग्यवेळी सेक्स एज्युकेशन अत्यंत महत्त्वाचं आहे."
किशोरवयात (Puberty) आणि बालपण-तारूण्यामधील काळात (adolescence) हॉर्मोनल बदल सतत होत असतो. शरीरात होणाऱ्या बदलांबद्दल मुलं जाणून घेण्याचा सतत प्रयत्न करतात.
"सर्वांसाठी लसीकरण, शिक्षण याप्रमाणेच प्रत्येक मुलासाठी आणि पालकांसाठी सेक्स एज्युकेशनची गरज आहे. जेणेकरून मुलांना योग्य माहिती मिळू शकेल."
मुलांना सेक्स एज्युकेशन केव्हा द्यावं ?
मुलांना हल्ली शाळेतच सेक्स एज्युकेशन दिलं जातं. मुला-मुलींना गुड-बॅड टचबद्दल माहिती दिली जाते. विविध माध्यमांतून मुलांपर्यंत याबाबत माहिती पोहोचवली जाते.
"मूल इतक्या वर्षांचं झाल्यानंतर सेक्स एज्युकेशन द्यावं, असे काहीच मापदंड नाहीत. लहानपणापासूनच मुलांना याबद्दल माहिती देण्यात आली पाहिजे. योग्य माहितीमुळे मुलं तरुण वयात चांगले नागरिक बनू शकतील."
पालकांनी मुलांसोबत सेक्सबद्दल कसं बोलावं?
पालकांनी मनातील भीती काढावी. इतर सामान्य गोष्टींसारखं मुलांशी सेक्सबाबत चर्चा करावी
मुलांना समजेल अशा भाषेत माहिती द्यावी
मुलांशी प्रामाणिकपणे बोललं पाहिजे. खोटं अजिबात बोलू नये.
मुलांशी मनमोकळी चर्चा करावी. त्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरं द्यावीत
लहानपणापासूनच याची सुरूवात करावी. मुलं किशोरवयीन होण्याची वाट पाहू नये.
मुलांना त्यांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल योग्य माहिती असायला हवी. त्यांना याची लाज वाटता कामा नये.
3-5 वर्षांच्या मुलांना कोणती माहिती द्यावी?
, 3 ते 5 वर्षाच्या मुलांना शरीराच्या चार जागांची माहिती पालकांनी दिलीच पाहिजे.
• ओठ, स्तन, लिंग आणि कुल्ला (पार्श्वभाग)
"शरीराचे हे भाग खासगी आहेत. पालक आणि डॉक्टर सोडून या जागांना, इतर कोणालाही स्पर्श करू द्यायचा नाही. हे मुलांना सांगितलं पाहिजे,"
मुलांना कळलं पाहिजे 'NO-GO-TELL'
पालकांनी मुलांना 'NO-GO-TELL' या तीन शब्दांची ओळख करून दिली पाहिजे.
NO - कोणी अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर नाही म्हणणं.
GO - तसं करायचा कोणी प्रयत्न केला तर पळून जाणं.
TELL - पालकांना जाऊन या घडलेल्या प्रकाराची माहिती देणं.
"मुलांसोबत अशी घटना घडली तर मुलांचं ऐकून घ्या. याचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होतो."
6 ते 9 वयोगटातील मुलांना काय सांगावं?
तज्ज्ञांच्या मते, या वयोगटातील मुलं शाळेत जातात. अनेकांकडे मोबाईल असतो. पालकांना 24 तास मुलांवर लक्ष ठेवणं शक्य नाही. त्यामुळे पालकांनी खालील गोष्टींवर लक्ष ठेवावं
मूल कोणाशी चुकीचं चॅटिंग करत नाही ना?
दुसऱ्या जेंडरशी कसं वागावं हे शिकवावं.
एकदा सांगून विसरून जाऊ नका. मुलांशी सतत बोलत रहा. त्यांना काय समजलं याबद्दल जाणून घ्या
"लहान मुलांचं सर्वात जास्त लैंगिक शोषण याच वयात होतंय. मुला-मुलींनी चुकीचं पाउल उचलल्याच्या अनेक केसेस पहायला मीळतात आहेत, जिथे मुलं न्यूड फोटोशूट करून सोशल साइट्सवर अपलोड करतात."
8 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांचं लैंगिक शिक्षण कसं करावं?
किशोरवयात आलेल्या मुलांना सेक्सबद्दल जाणून घेण्याची खूप उत्सुकता असते. त्यांचे अनेक प्रश्न असतात.
या वयात मुलांच्या शरीरात काय बदल होतात?
मुलींच्या स्तनांचा आकार वाढू लागतो. मुलगी 10-11 वर्षांची झाल्यानंतर पाळी येण्यास सुरूवात होते. त्यावेळी आईने मुलीला हे नैसर्गिक आहे. हे परिवर्तन चांगलं आहे असं सांगणं गरजेचं आहे.
मुलगा 10-11 वर्षाचा असताना किशोरवयात प्रवेश करतो. त्यावेळी चेहरा, लिंगाच्या भाग केस येणं सुरू होतं. लिंगात ताठरपणा जाणवू लागलो. यात घाबरण्यासारखं काहीच नाही हे मुलांना समजावून देणं महत्त्वाचं आहे.
12 ते15 वर्षाच्या मुलांना काय सांगावं?
तज्ज्ञांच्या मते, या वयात मुलं स्वातंत्र्य शोधत असतात. मित्र-मैत्रिणी शोधत असतात. यावेळी पालक आणि मूल यांच्यातील नातं बदललं पाहिजे.
"पालकांनी मुलांशी मैत्री केली पाहिजे. या वयात सेक्ससारख्या विषयांवर चर्चा केली पाहिजे. त्यांच्यावर याबाबत बोलू नका अशी जबरदस्ती करून चालणार नाही. मग मुलं त्या गोष्टी अधिक जास्त करतात."
सोशल मीडिया कसा हाताळायचा, काय करू नये हे सांगावं.
शरीरात होणारे बदल समजावून दिले पाहिजेत.
प्रायव्हेट पार्टची स्वच्छता कशी ठेवावी, ते सांगावं.
, मुलांना सुरक्षित सेक्स, गर्भधारणा, गर्भधारणा निरोधक औषधं, सेक्स केल्यामुळे होणारे आजार यांबाबत माहिती दिली पाहिजे. चांगलं नातं कोणतं आणि वाईट नातं काय यातील फरक त्यांना ओळखता आला पाहिजे."
टीव्हीवर एखादा सीन आला तर काय करावं?
अनेक वेळा चित्रपट किंवा सिरिअल पहाताना प्रेमसंबंधांचा एक सीन येतो. लहान मुलं सोबत असतील तर आपण चॅनल बदलतो. पण, तज्ज्ञांच्या मते, दोन लोकांमध्ये प्रेम नैसर्गिक आहे याची पालकांनी मुलांना याची माहिती दिली पाहिजे.
0
Answer link
मुलांशी शारीरिक संबंधांवर बोलणे महत्त्वाचे आहे, परंतु ते कठीण वाटू शकते. येथे काही टिप्स आहेत:
1. योग्य वेळ आणि जागा निवडा:
- शांत आणि आरामदायक वातावरणात बोला.
- टीव्ही किंवा इतर distractions टाळा.
2. वय-योग्य भाषा वापरा:
- लहान मुलांसाठी सोप्या भाषेत सांगा.
- मोठ्या मुलांसाठी अधिक माहितीपूर्ण आणि वैज्ञानिक भाषा वापरा.
3. प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करा:
- त्यांना प्रश्न विचारण्याची संधी द्या.
- त्यांच्या प्रश्नांची प्रामाणिकपणे उत्तरे द्या.
4. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा:
- शारीरिक संबंध एक नैसर्गिक आणि सामान्य भाग आहे हे सांगा.
- त्याबद्दल नकारात्मक किंवा भीतीदायक दृष्टिकोन टाळा.
5. सुरक्षिततेवर जोर द्या:
- सुरक्षित लैंगिक संबंधांबद्दल माहिती द्या.
- संमती (consent) आणि सीमा (boundaries) याबद्दल चर्चा करा.
6. सतत संवाद ठेवा:
- एक वेळ बोलून विषय संपवू नका.
- त्यांच्याशी वेळोवेळी या विषयावर बोलत राहा.
टीप: प्रत्येक मुलाची गरज वेगळी असते, त्यामुळे त्यांच्या गरजेनुसार बोला.