नोकरी पाटील सरकारी नोकरी

ग्रामीण डाक सेवक आणि ब्रांच पोस्ट मॅनेजर यांच्या जागा निघाल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल का? निलेश पाटील सर, याचे उत्तर द्या.

2 उत्तरे
2 answers

ग्रामीण डाक सेवक आणि ब्रांच पोस्ट मॅनेजर यांच्या जागा निघाल्या आहेत त्याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल का? निलेश पाटील सर, याचे उत्तर द्या.

1
महाराष्ट्र पोस्टल सर्कलमध्ये हजारो पदे भरली जाणार आहेत. ग्रामीण डाक सेवकाच्या तब्बल २,४२८ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या पदांसाठी दहावी उत्तीर्ण उमदेवार अर्ज करू शकतात. कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल. ज्या उमेदवारांना या पदासाठी अर्ज करावयाचे आहे त्यांनी अधिसूचना व्यवस्थित वाचल्यानंतर अर्ज करावा; कारण अर्जात काही त्रुटी आढळल्यास अर्ज फेटाळला जाईल.

महत्वाचे म्हणजे या भरती साठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड मेरिटच्या आधारे होणार आहे. दहावीच्या गुणांच्या आधारे मेटिर लिस्ट तयार होईल.


महाराष्ट्र पोस्टल सर्कल येथे ग्रामीण डाक सेवक (शाखा पोस्टमास्टर, सहाय्यक शाखा पोस्टस्टर, डाक सेवक) पदांच्या एकूण 2428 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 मे 2021 आहे.


या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत 

Maharashtra Postal Circle Recruitment 2021 Apply Online

विभागाचे नावमहाराष्ट्र पोस्टल सर्कल (Maharashtra Postal Circle)पदाचे नावग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak)पद संख्या2428 Vacanciesनोकरी ठिकाणमहाराष्ट्र (Maharashtra)वयोमर्यादा18 ते 40 वर्षे (18 to 40 Years)
किमान १८ वर्षे आणि कमाल ४० वर्षे वयोमर्यादा. वयाची गणना २७ एप्रिल २०२१ पासून होईल.अर्ज पद्धतीऑनलाईन (Online)फीस
रु. 100/- (Rs. 100/-)अधिकृत वेबसाईटappost.in

शैक्षणिक पात्रताSecondary School Examination pass certificate of 10th standard

महाराष्ट्र पोस्टल सर्कलने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार जीडीएसच्या पदांवर अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी (अनिवार्य किंवा पर्यायी विषय म्हणून अभ्यास केलेला) विषयात दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. यासह स्थानिक भाषेचे ज्ञान असले पाहिजे.

मान्यता प्राप्त शालेय शिक्षण मंडळातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीत गणित, स्थानिक भाषा आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक. दहावीपर्यंत स्थानिक भाषेचा अभ्यास केलेला असणे अनिवार्य.निवडीसाठी दहावीच्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार होणार आहे. मात्र दहावीपेक्षा अधिक शैक्षणिक योग्यता असली तरीही दहावीचेच गुण मेरिटसाठी ग्राह्य धरले जाणार.

तांत्रिक पात्रता
– मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून ६० दिवसांचे बेसिक कॉम्प्युटर ट्रेनिंग सर्टिफिकेट अनिवार्य.
– ज्या उमेदवारांनी दहावी किंवा बारावी किंवा उच्च शिक्षणात कॉम्प्युटर एका विषयाच्या रुपात अभ्यासला असेल, त्या उमेदवारांना कॉम्प्युटरच्या बेसिक माहितीच्या सर्टिफिकेट अनिवार्यतेतून सवलत मिळेल.

अर्ज सुरु होण्याची तारीख27 एप्रिल 2021अर्ज करण्याची शेवटची तारीख26 मे 2021

 

निवड प्रक्रिया
– उमेदवारांनी केलेल्या ऑनलाइन अर्जांच्या आधारे मेरिट यादी तयार करून निवड केली जाईल.
– उच्च शिक्षण योग्यता असेल तरी त्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे प्राधान्य मिळणार नाही. अंतिम निवड ही दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारेच होईल.
– जर उमेदवाराना पाच पेक्षा अधिक पदांसाठी अर्ज केला आहे आणि मेरिटच्या आधारे त्याची एकापेक्षा अधिक पदांवर निवड झाली तर त्याची एकाच पदावर निवड होईल.

मासिक वेतन
-बीपीएम पदासाठी १२ हजार ते १४,५०० रुपये
– जीडीएस/एबीपीएमसाठी १० हजार ते १२ हजार रुपये

महाराष्ट्र सर्कलसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अधिक माहितीसाठी ०२२-२२६२६२१४ या क्रमांकावर किंवा gdsrectt.mah@gmail.com या इमेलवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
https://bit.ly/3etPJscऑनलाईन अर्ज करा (Register)
https://appost.in/gdsonline/वेबसाईट लिंक

उत्तर लिहिले · 16/5/2021
कर्म · 3940
0
मी निलेश पाटील नाही, परंतु तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. ग्रामीण डाक सेवक (Gramin Dak Sevak - GDS) आणि ब्रांच पोस्ट मास्टर (Branch Post Master - BPM) या पदांविषयी माहिती खालीलप्रमाणे:

ग्रामीण डाक सेवक (GDS):

  • नोकरी स्वरूप: ग्रामीण डाक सेवक हा भारतीय पोस्ट ऑफिसमधील एक महत्त्वाचा कर्मचारी असतो. तो खेड्यांमध्ये पोस्टल सेवा पुरवतो.
  • जबाबदाऱ्या: यामध्ये पत्रे आणि पार्सल वाटणे, तिकिटे विकणे, पोस्ट ऑफिसमधील खात्यांचे व्यवस्थापन करणे आणि इतर संबंधित कामे करणे इत्यादी कामे असतात.
  • पात्रता: अर्जदाराचे वय १८ ते ४० वर्षांच्या दरम्यान असावे. तसेच, मान्यताप्राप्त बोर्डातून १०वी पास असणे आवश्यक आहे.
  • निवड प्रक्रिया: अर्जदारांची निवड त्यांच्या १०वीच्या गुणांवर आधारित असते.

ब्रांच पोस्ट मास्टर (BPM):

  • नोकरी स्वरूप: ब्रांच पोस्ट मास्टर हा उप-पोस्ट ऑफिसचा प्रमुख असतो.
  • जबाबदाऱ्या: पोस्ट ऑफिसच्या दैनंदिन व्यवहारांचे व्यवस्थापन करणे, खातेदारांशी संवाद साधणे, तसेच GDS च्या कामावर देखरेख ठेवणे इत्यादी कामे BPM करतो.
  • पात्रता: Branch Post Master पदासाठी शैक्षणिक पात्रता GDS प्रमाणेच असते.
  • निवड प्रक्रिया: BPM पदासाठी निवड प्रक्रिया GDS प्रमाणेच असते.

अर्ज कसा करावा:

  • भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: Indiapostgdsonline.gov.in
  • notifications काळजीपूर्वक वाचा आणि ऑनलाइन अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

महत्वाच्या लिंक्स:

  • भारतीय पोस्ट ऑफिस अधिकृत वेबसाईट: indiapost.gov.in
तुम्हाला या संदर्भात आणखी काही माहिती हवी असल्यास, तुम्ही विचारू शकता.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

पोलीस भरतीसाठी लागणारी ग्रामपंचायत विषयी माहिती काय?
पोलीस भरती प्रश्नसंच?
करिअर/ नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ कोणती?
B.com झाल्यावर कोणती नोकरी करता येते?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?
कामगाराच्या भूमिकेत निर्माण होणारे ताणतणाव थोडक्यात स्पष्ट करा?
मी थर्मल पॉवर हाऊस येथे कर्मचारी म्हणून आहे. माझा ड्यूटीवर मृत्यू झाला तर माझ्या कुटुंबाला काय मदत मिळेल?