2 उत्तरे
2
answers
पहिल्यांदा मुलीसोबत संबंध ठेवताना घ्यावयाची जबाबदारी सांगा?
1
Answer link
तुम्ही ज्या मुलीसोबत सबंध ठेवाल तीला काही लैगीक आजार आहे की नाही याची खात्री करा कारण तुमची एक चुक तुमचे आयुष्य खराब करू शकते आजार नसेल तर संबध ठेवतांना
condom(संभोगाच्या वेळी पुरूषाने लींगावर घालायचे एक लवचिक आवरण)चा वापर करा
कंडोम वापरताना 'या' विचित्र चुका करु नका
शारीरिक संबंधाचा विषय निघाला की, कंडोमचा विषय निघतोच. . पण याचा वापर करताना जर काही चुका केल्या तर नको असलेली गर्भधारणाही राहते आणि लैंगिक समस्याही होण्याचा धोका होतो. त्यामुळे कंडोमचा वापर करताना काही चुका टाळणं फार गरजेचं आहे. चला जाणून घेऊ कंडोम वापरताना केल्या जाणाऱ्या अशाच काही कॉमन चुका...
दात किंवा नखांनी कंडोमचं पॅकेट उघडणे
जर तुम्ही कंडोमचं पॅकेट उघडण्यासाठी आपल्या दातांचा किंवा धारदार नखांचा वापर करत असाल तर कंडोम डॅमेज होण्याचा धोका अधिक राहतो. त्यासोबतच कोणतीही धारदार वस्तू कंडोमचं पॅकेट उघडण्यासाठी वापरू नका. कारण यानेही कंडोम फाटण्याची भिती राहते.
डॅमेज चेक न करता कंडोम वापरणे
पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवण्याच्या घाईत जास्तीत जास्त पुरूष कंडोम पॅकेटमधून काढून चेक न करताच वापरतात. ही सुद्धा एक मोठी चूक ठरू शकते. कंडोमला एखादं छिद्र किंवा कंडोम फाटण्याची शक्यता असू शकते.
कंडोम अॅक्ट सुरू झाल्यावर वापरणे
अनेक पुरूष ही कॉमन चूक शारीरिक संबंधावेळी पुन्हा पुन्हा करतात. नेहमीच पुरूष इंटरकोर्स सुरू केल्यावर काही वेळाने कंडोमचा वापर करतात. असं अजिबात करू नका. कारण असं करून तुम्हाला लैंगिक आजारांचा किंवा इन्फेक्शनचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नेहमी इंटरकोर्स सुरू करण्याआधीच कंडोमचा वापर करा.
वापरलेला कंडोम पुन्हा वापरणे
हे तुम्हाला जरा विचित्र वाटतं, पण अनेक पुरूष असा विचार करतात की, पहिल्यांदा शारीरिक संबंधावेळी त्यांनी कंडोममध्ये इजॅक्यूलेट केलं नाही आणि त्यामुळे त्यात काही नसेल तर त्याचाच पुन्हा वापर करतात. अशी चूक अजिबात करू नये. एकदा वापरलेला कंडोम त्यात स्पर्म असो वा नसो फेकून द्या. प्रत्येकवेळी नवीन कंडोमचा वापर करा.
एक्स्पायरी डेट चेक न करणे
कदाचित तुम्हाला हे माहीत नसेल इतर गोष्टींप्रमाणे कंडोमची देखील एक्स्पायरी डेट असते. असं अजिबात करता येत नाही की, तुम्ही एकदा कंडोम विकत घेतले आणि अनेक महिन्यांनी किंवा वर्षांनी तुम्ही वापरू शकाल. कंडोम वापरण्याआधी त्यावर लिहिलेली एक्स्पायरी डेट डेट नक्की वाचा. कारण एक्सपायर्ड झालेल्या कंडोमचा वापर केल्याने तुम्हाला इन्फेक्शनचा धोका होण्याची जास्त शक्यता असते.
0
Answer link
मुलीसोबत पहिल्यांदा संबंध ठेवताना घ्यावयाची जबाबदारी खालीलप्रमाणे:
- संमती (Consent): सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघांची पूर्ण संमती असणे आवश्यक आहे. कोणतीही जबरदस्ती नसावी. दोघांनाही संबंधासाठी होकार असणे गरजेचे आहे.
- सुरक्षितता (Safety): शारीरिक संबंध सुरक्षित असावेत. यासाठी कंडोमचा वापर करणे आवश्यक आहे. यामुळे लैंगिक संक्रमित रोग (Sexually Transmitted Infections - STIs) टाळता येतात.
- समजूतदारपणा (Understanding): दोघांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करणे आवश्यक आहे. कोणताही दबाव नसावा.
- जबाबदारी (Responsibility): जर गर्भधारणा झाली, तर दोघांनी मिळून त्याची जबाबदारी घ्यायला हवी. यासाठी तयार असणे आवश्यक आहे.
- संवाद (Communication): एकमेकांशी बोलून सर्व गोष्टी स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. मनात कोणतीही शंका न ठेवता संवाद साधावा.