गडदुर्ग
शिवाजी महाराज
किल्ले
इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
किल्ले रायगडची संपूर्ण माहिती आणि इतिहास मिळेल का?
2 उत्तरे
2
answers
किल्ले रायगडची संपूर्ण माहिती आणि इतिहास मिळेल का?
6
Answer link
छत्रपती शिवरायांचा “रायगड किल्ला”
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अवघ्या महाराष्ट्राला ठाऊक आहे. महाराजांचे कर्तुत्व त्यांचा पराक्रम, त्यांची गौरवगाथा ऐकूनच या महाराष्ट्रात मुलं लहानाची मोठी होतांना आपण पहातो. महाराजांच्या किल्ल्यांची देखील माहिती आपल्याला असायला हवी, त्या किल्ल्याचा इतिहास, स्वराज्यात त्याचे असलेले महत्वं, किल्ल्याचे स्वरूप हे देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे. आज या लेखात महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्याविषयी आपण जाणून घेणार आहोत.
रायगड किल्ल्याची माहिती –
रायगड हा शिवरायांचा किल्ला समुद्रसपाटीपासून साधारण 820 मीटर म्हणजे अंदाजे 2700 फुट उंचीवर आहे. मित्रांनो या रायगडाचे पूर्वीचे नाव तुम्हाला ठाऊक आहे? रायगडाला पूर्वी ‘रायरी’ म्हणून ओळखले जायचे. या किल्ल्यावर पोहोचण्या साठी आपल्याला जवळ-जवळ 1400 ते 1450 पायऱ्या चढून जाव्या लागतात.
महाराजांची राजधानी ठरलेला किल्ला रायगड –
यशवंतराव मोरे हा जावळीचा प्रमुख पळून रायगडा वर जाऊन राहीला होता, त्यावेळी 6 एप्रिल 1656 ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाला वेढा घातला. पुढे साधारण मे महिन्यात रायगड शिवरायांच्या ताब्यात आला. मुल्ला अहमद या कल्याणच्या सुभेदाराकडून जो खजिना लुटण्यात आला होता त्याचा उपयोग रायगडाच्या बांधकामाकरता करण्यात आला. आणि याचे मुख्य वास्तुविशारद हिरोजी इंदुलकर होते.
शत्रूला हल्ला करण्याकरता रायगड ही तशी अवघड आणि अडचणीची जागा असल्याने आणि समुद्रातून दळणवळणाच्या दृष्टीकोनातून रायगड सोयीचा असल्याने शिवरायांनी राजधानी म्हणून रायगडाची निवड केली.
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील याच रायगडावर झाला. रायगडाने अनुभवलेला हा सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंच व्हावी अशी संस्मरणीय घटना होय.

रायगड किल्ल्याचे कौतुक करतांना महाराज त्यावेळी बोलले होते –
“दीड गाव उंच-देवगिरीच्याहून दशगुणी उंच जागा. पावसाळ्यात कड्यावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच, उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास देखील जागा नाही हे पाहून महाराज आनंदाने बोलले- तख्तास जागा हाच गड करावा.”
महाराजांचे निधन झाल्यावर पुढे साधारण सहा वर्ष रायगड हा स्वराज्याची राजधानी होता. महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक देखील 16 फेब्रुवारी 1681 ला या रायगडावर झाला. 12 फेब्रुवारी 1689 ला राजाराम महाराजांचा देखील राज्याभिषेक रायगडाने पाहीला. सूर्याजी पिसाळ या फितूर झालेल्या किल्लेदारामुळे 3 नोव्हेंबर 1689 ला हा गड मोगलांच्या ताब्यात गेला.
पुढे शाहू महाराजांच्या कारकिर्दीत 5 जून 1733 ला रायगड पुन्हा एकवेळ मराठ्यांच्या ताब्यात आला. मात्र त्यानंतर इंग्रजांनी पेशव्यांच्या ताब्यातून हा गड हिसकावून हा गड लुटला. किल्ल्याची प्रचंड नासधूस केली, आग लावली परिणामी आज हा रायगड पडझडीच्या अवस्थेत उभा आहे.
रायगडावर दोन मार्गांनी जातं येतं, खूबलढा बुरुज आणि दुसरा मार्ग म्हणजे नाना दरवाजा. रायगडाचा कठीण असा हिरकणी कडा उतरून जाणाऱ्या हिरकणीची कथा देखील आपल्याला ठाऊक आहेच. रायगडाच्या पश्चिमेला हिरकणीचा बुरुज असून उत्तरेकडे टकमक टोक आहे. श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी शिवछत्रपतींचा पुतळा हे इथलं सर्वात मुख्य आकर्षण.
रायगडाला आणखीन विविध नावांनी संबोधलं गेलं आहे…रायगड, रायरी, नंदादीप, तणस, इस्लामगड, जंबूद्वीप, राशिवटा, रायगिरी, भिवगड, शिवलंका, राहीर, पूर्वेकडील जिब्राल्टर, बदेनूर, राजगिरी, रेड्डी, शिवलंका.
रायगड बघण्याची इच्छा असणाऱ्यांकरता एक आनंदाची गोष्ट म्हणजे आता 1500 पायऱ्या चढून गडावर जाण्याची गरज उरली नाही. या गडावर आता “रोप वे” ची सुविधा उपलब्ध आहे.
रायगडावर पहावी अशी ठिकाणं –
पाचाड येथील जिजाबाईंचा वाडा
खूबलढा बुरुज
नाना दरवाजा
मदारमोर्चा किंवा मशीदमोर्चा
चोरदिंडी
हत्ती तलाव
महादरवाजा
स्तंभ
गंगासागर तलाव
राजभवन
मेणा दरवाजा
राजसभा
राजभवन
श्री शिरकाईदेवी मंदिर
नगारखाना
बाजारपेठ
जगदीश्वर मंदिर
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी
वाघदरवाजा
कुशावर्त तलाव
हिरकणी तलाव
टकमक टोक
वाघ्या कुत्र्याची समाधी
रायगडावर असलेली वाघबीळ किंवा नाचणटेपाची गुहा नक्की पहावी अशीच आहे. नवे ट्रेकर्स या गुहेला “गन्स ऑफ पाचाड” असे म्हणतात. ही गुहा इतर ठिकाणी आढळणाऱ्या गुहांपैकी वेगळी असून पाचाड खिंडीतून इथवर चढून आलो की गुहेचे तोंड दिसते, या तोंडातून आत शिरलं समोरचे दृश्य आश्चर्य वाटावे असे असते.
0
Answer link
किल्ले रायगडची संपूर्ण माहिती आणि इतिहास:
किल्ले रायगड, ज्याला पूर्वी रायरी म्हणून ओळखले जात होते, हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी बनवला.
इतिहास:
- रायगडाचा इतिहास अनेक शतके जुना आहे.
- या किल्ल्याचा उल्लेख इ.स. 1030 मध्ये आढळतो.
- शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये हा किल्ला जिंकला आणि त्याची डागडुजी केली.
- 1674 मध्ये, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला आणि त्यांनी या किल्ल्याला मराठा साम्राज्याची राजधानी बनवले.
- 1689 मध्ये मुघलांनी हा किल्ला जिंकला, पण मराठ्यांनी तो परत मिळवला.
- 1818 मध्ये ब्रिटीशांनी रायगड जिंकला आणि किल्ल्याची तोडफोड केली.
भौगोलिक स्थान:
- रायगड किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत असून तो समुद्रसपाटीपासून 820 मीटर (2,700 फूट) उंचीवर आहे.
- हा किल्ला तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेला आहे, ज्यामुळे तो एक मजबूत आणि सुरक्षित किल्ला बनला आहे.
किल्ल्याची रचना:
- रायगडावर पोहोचण्यासाठी सुमारे 1737 पायऱ्या चढाव्या लागतात.
- किल्ल्यावर अनेक इमारती आणि अवशेष आहेत, ज्यात राजवाडा, बाजारपेठ, आणिwatch towers यांचा समावेश आहे.
- येथे शिवाजी महाराजांची समाधी देखील आहे.
रायगडाचे महत्त्व:
- रायगड हा मराठा साम्राज्याची राजधानी होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील एक महत्त्वाचा साक्षीदार आहे.
- हा किल्ला मराठा साम्राज्याच्या शौर्याचे आणि सामर्थ्याचे प्रतीक आहे.
- आज रायगड एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे आणि दरवर्षी हजारो पर्यटक या किल्ल्याला भेट देतात.
भेटीची वेळ:
- रायगडाला भेट देण्यासाठी सर्वोत्तम वेळ हिवाळा (ऑक्टोबर ते मार्च) आहे.
- किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे (rope way) उपलब्ध आहे.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: