भूगोल नदी नद्या

जगातील सर्वांत लांब नदी कोणती?

3 उत्तरे
3 answers

जगातील सर्वांत लांब नदी कोणती?

6
नाईल: ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.[१] पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्‍या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.

नाईलचे पाणलोट क्षेत्र सुमारे ३४ लाख वर्ग किमी एवढे असून ती इथियोपिया , इजिप्त ,सुदान ,युगांडा , टांझानिया ह्या ६ देशांमधून वाहते. उत्तर आफ्रिकेतील सुदान व इजिप्त देशांमध्ये नाईल जवळजवळ पूर्णपणे वाळवंटामधून वाहते. ऐतिहासिक काळापासून इजिप्तमधील जीवन संपूर्णपणे नाईलवर अवलंबून आहे. इजिप्तमधील शहरे व गावे प्रामुख्याने नाईलच्या काठावरच वसलेली आहे व इजिप्तच्या संस्कृतीमध्ये नाईलला अनन्यसाधारण महत्त्व आहे.


उत्तर लिहिले · 26/12/2020
कर्म · 34255
4
माझ्या माहितीनुसार नाईल नदी (आफ्रिका) ही जगातील लांब नदी आहे. गंगा ही भारतातील सर्वात मोठी नदी आहे हे आपल्याला माहितीच आहे, पण जगातल्या सर्वात मोठ्या 10 नद्यांमध्ये भारतातल्या गंगेचा समावेश नाही. पूर्व आफ्रिकेत वाहणारी नाईल नदी जगातील सर्वात लांब नदी आहे. या नदीची लांबी 6650 किलोमीटर म्हणजेच 4132 मैल आहे. या नदीच्या पाण्याचा मुख्य स्त्रोत इजिप्त आणि सूडानमध्ये आहे.
         **** धन्यवाद ****
उत्तर लिहिले · 12/3/2021
कर्म · 11700
0

जगातील सर्वात लांब नदी नाईल (Nile) आहे.

नाईल नदी:

  • लांबी: सुमारे 6,650 किलोमीटर (4,132 मैल)
  • उगम: पूर्वेकडील आफ्रिका
  • मुख: भूमध्य समुद्र
  • देश: इजिप्त, सुদান, इथिओपिया, युगांडा, टांझानिया, केनिया, रवांडा, बुरुंडी, इरिट्रिया आणि काँगो

नाईल नदी आफ्रिकेतील सर्वात मोठी नदी आहे. ही नदी इजिप्त आणि सुদানच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

ॲमेझॉन नदी:

ॲमेझॉन ही जगातील दुसरी सर्वात लांब नदी आहे.

  • लांबी: सुमारे 6,400 किलोमीटर (3,976 मैल)
  • उगम: पेरू
  • मुख: अटलांटिक महासागर
  • देश: ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, गयाना आणि सुरिनाम
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5280

Related Questions

ठोसेघर हा धबधबा कोणत्या नदीवर आहे?
कोणती नदी संपूर्ण देशातून वाहते?
भारताची सर्वात लांब नदी कोणती?
अनेक जलप्रवाह एकत्र येऊन काय तयार होते?
संबळ नदीची उपनदी कोणती?
उताऱ्यात आलेल्या नदीचे नाव?
ॲमेझॉन नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते?