पर्यटन भूगोल जिल्हा

मसूरी थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोठे आहे?

2 उत्तरे
2 answers

मसूरी थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात कोठे आहे?

3
मसूरी हे भारताच्या उत्तराखंड राज्याच्या डेहरादून जिल्ह्यात असलेले एक शहर आहे. डेहरादून शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार ३०,११८ होती.

हे शहर अनेक दशकांपासून थंड हवेचे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. पर्यटकांची पसंती असते तिथल्या डोंगररांगांमध्ये मनसोक्त भटकंती झाल्यानंतर केम्टी धबधबा,कंपनी गार्डन,मसुरी तलाव ही ठिकाणं बघायची मॉल रोडला खरेदी करायची असा कार्यक्रम पर्यटक आखत असतात. थंड हवेचे ठिकाण म्हणून मसुरीला विशेष महत्त्व आहे. उत्तराखंड ची राजधानी डेहराडून पासून 28 किलोमीटर अंतरावर उंच डोंगरांच्या रांगेत मसूरी हे थंड हवेचे सुंदर ठिकाण वसलेले आहे तेथे जाण्यासाठी रस्ते चांगले आहेत. एप्रिल ते जून हा काळ तिथला पर्यटन सीजन म्हणून ओळखला जातो. डिसेंबर ते फेब्रुवारी बर्फाच्छादित प्रदेश बऱ्यापैकी असतो. हॉटेल्स मसुरी पासून खाली सात-आठ किलोमीटर अंतरावर डोंगरउतारावर आहेत. या उतारावरील हॉटेल्समध्ये समोर पाहिले तर खाली डेहराडून शहर रात्रीच्या अंधारात चमचमत असते आणि वर पाहिले तर मसूरी गाव अंधारात चमचमत असते. तिथे फिरायला शिवाय दुसरा पर्याय नाही. थोड्या महाग आहेत आम्ही पहिल्या दिवशी कॅमिटी फॉल कंपनी गार्डन संतोषी माता मंदिर मसुरी तलाव, भट्टा फॉल हे पॉईंट पाहिले.
उत्तर लिहिले · 27/11/2020
कर्म · 2910
0

महाराष्ट्रामध्ये 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखले जाणारे थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. हे ठिकाण टेबल लँड पठारासाठी प्रसिद्ध आहे.

पाचगणी: हे महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक सुंदर डोंगरी शहर आहे. हे सह्याद्री पर्वतरांगेत असलेले एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.

ठिकाण: हे मुंबईपासून सुमारे 250 किलोमीटर आणि पुण्यापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे.

पाचगणी हे स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी देखील प्रसिद्ध आहे.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5220

Related Questions

भारताच्या शेजारील देश?
नंदूरबार जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
महाराष्ट्रातील गरम पाण्याचे झरे कुठे आहेत?
भारतका छोटा राज्या कौनसा है?
सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभला आहे?
महाराष्ट्राला किती लांब समुद्रकिनारा लाभला आहे?
भारतामध्ये किती किल्ले आहेत?