2 उत्तरे
2
answers
मध कसा तयार होतो?
2
Answer link
मध तयार करतात मधमाश्या. फेब्रुवारी महिना उजाडला की दिल्लीमध्ये उंच इमारतींमधल्या खिडक्यात मधमाश्यांची मोठमोठी पोळी लटकताना दिसतात, कारण त्या सुमाराला तिथला हिवाळा संपून वसंत ऋतूचा आरंभ होत असतो. त्यामुळेच जिकडे तिकडे फुलांना बहर यायला लागतो. या फुलांमध्ये असलेल्या केसरापासून व मधुपर्कापासून मधमाश्या मध तयार करतात. मधमाश्यांच्या जीभा लांबलचक नळीसारख्या असतात, आपण बाटलीतला रस किंवा द्रवपदार्थ जसा स्ट्राॅचा म्हणजे नळीचा वापर करून शोषून घेतो तशाच प्रकारे मधमाश्या फुलांमधला मधुपर्क शोषून घेतात. त्यांच्या पोटात तो साठवला जातो. तिथ असलेल्या प्रथिनांशी आणि विकराशी त्यांची विक्रिया झाली की त्या मधुपर्काचं मधात रूपांतर होतं. मधमाश्यांच्या पोळ्यामध्ये मेणानं बनवलेले षटकोनी आकाराचे अनेक कोष असतात. आपल्या पोटातला मध मग त्या मधमाश्या त्यापैकी एका कोषात ओकतात. त्या मधातलं पाण्याचं प्रमाण जास्त असतं. साधारण ८० टक्क्यांपर्यंत ते असतं ते १५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यासाठी मग त्यावर आपले पंख फडफडावून पाण्याचं बाष्पीभवन केलं जातं. अशा तर्हेनं दाट झालेल्या मधाने तो कोष भरला की मेणानं तो सीलबंद केला जातो आणि दुसरा कोष भरून टाकण्याच्या कामाला त्या मधमाश्या लागतात. सारं पोळं अशा प्रकारे मधानं भरेपर्यंत हे काम चालूच राहतं. तेव्हा मधमाश्या जरी मध तयार करत असल्या तरी त्यासाठी लागणारा कच्चा माल फुलं धारण करणाऱ्या वनस्पतीच पुरवतात. थोडक्यात, मध म्हणजे प्रक्रिया करून मूल्यवृद्धी केलेला वनस्पतीजन्य पदार्थच आहे..
0
Answer link
मधमाश्या मध कसा तयार करतात याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:
- फुलांतील मध गोळा करणे: मधमाश्या फुलांवर बसून त्यांच्यातील मध (nectar) शोषून घेतात.
- रूपांतरण: मधमाश्या आपल्या पोळ्यामध्ये गोळा केलेला मध जमा करतात. त्यामध्ये invertase नावाचे enzyme मिसळतात. या enzyme मुळे साखरेचं विभाजन होऊन glucose आणि fructose तयार होते.
- पाणी कमी करणे: मधमाश्या पंखांच्या साहाय्याने मधामधील जास्तीचे पाणी उडवून लावतात, ज्यामुळे मध घट्ट होतो.
- साठवण: घट्ट झालेला मध पोळ्यातील पेश्यांमध्ये साठवला जातो आणि पेश्या मेणाने सील केल्या जातात.
या प्रक्रियेतून मध तयार होतो, जो मधमाश्या आणि मानव दोघांसाठीही पौष्टिक असतो.
अधिक माहितीसाठी: