भारतीय सेना लष्करी इतिहास इतिहास

सेनाप्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठाखाली का असतो?

2 उत्तरे
2 answers

सेनाप्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठाखाली का असतो?

3
थोडे बारकाईने पाहिले असले तर असे दिसते की आपल्या सेनाप्रमुखांच्या गणवेशातील हॅटचा पट्टा नेहमीप्रमाणे हनुवटीखाली नाही तर खालच्या ओठाच्या खाली बांधलेला दिसतो. असे का असा प्रश्न कधी मनात आला आहे? आला असेल तर त्याचे उत्तर येथे मिळेल.♍
भारतीय सेनेचा प्रत्येक जवान पूर्ण सेनेच्या तोडीचा असल्याची भावना भारतवासियांत बळावते आहे. हिमालयाएवढे मनोबल व सिंहासारखा पराक्रम गाजविणार्या भारतीय सेनेत अनेक रेजिमेंट असल्या तरी सर्वांचे ध्येय एकच आहे व ते म्हणजे देश व देशवासियांचे रक्षण. या रेजिमेंटमधील एक आहे गुरखा रेजिमेंट. वेगवान, कुशल व घातक हल्यांसाठी ही रेजिमेंट जगात प्रसिद्ध आहे. या रेजिमेंटमध्ये हॅटचा पट्टा खालच्या ओठाखाली बांधला जातो व आपले सेनाप्रमुख दलबीरसिंग सुहाग हे १९७० मध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतील प्रशिक्षण संपवून १९७४ मध्ये प्रथम ४/५ गुरखा रायफल्स रेजिमेंटमध्ये कमिशण्ड झाले आहेत.
हॅटचा पट्टा असा बांधण्यामागे अनेक कारणे सांगितली जातात त्यातील कांही मजेदार आहेत. असे सांगतात गुरखा रेजिमेंट मध्ये प्रामुख्याने पहाडी लोकांचा भरणा आहे व हे लोक वंशपरंपरेने उंचीने कमी असतात. अन्य सैनिकांच्या तुलनेत त्यांची उंची जास्त कमी भासते. अशावेळी अन्य जवानांबरोबरच उंच दिसावे म्हणून हा पट्टा हनुवटीऐवजी ओठाखाली बांधण्याची प्रथा सुरू झाली व ही प्रथा त्यांना ब्रिटीशांकडून विरासतीत मिळाली.
https://bit.ly/3nq4sYW
एक मजेदार कारण असे सांगितले जाते की जोशात येऊन दुश्मनावर हल्ला करताना या रेजिमेंटचे जवान जोरजोरात ओरडा करतात त्यामुळे शत्रू सावध होण्याची भीती असते. ओठाखाली हॅटचा पट्टा आल्याने त्यांचे तोंड बंद राहते. असेही म्हणतात की मागच्या बाजूने शत्रूने सैनिकावर हल्ला केला तर अनेकदा ते हॅटचा पट्टा ओढून सैनिकाचा गळा घोटू शकतात हा पट्टा छोटाच असल्याने शत्रूला गळा घोटायची संधी मिळत नाही. असेही सांगतात की कांही वेळा शत्रू सैनिकांची टोपी मागून खेचून त्यांना पाठीवर पाडतात पण येथे हा पट्टा छोटा असल्याने टोपी मागे खेचली गेली तर टोपी पडते पण सैनिक पाठीवर पडत नाहीत.♍
अर्थात गुरखा रेजिमेंट शरीरयष्टीने छोटी असली तरी दुश्मनाशी दोन हात करताना शौर्यात ते अजिबात कमी नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे.♍   ╔══════════════════╗
║       *माहिती सेवा गृप पेठवड़गाव*         ║
╚══════════════════╝

0

सैन्य प्रमुखांच्या हॅटचा पट्टा ओठाखाली असण्याचे कारण ऐतिहासिक आणि पारंपरिक आहे. या पट्ट्याला 'चिन स्ट्रॅप' (Chin Strap) म्हणतात. याचे मुख्य उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

  1. टोपी सुरक्षित ठेवणे: सैनिकांच्या हालचालीदरम्यान टोपी जागेवर स्थिर राहावी, वाऱ्याने उडून जाऊ नये, यासाठी हा पट्टा हनुवटीच्या खाली बांधला जातो.
  2. शिस्त आणि ओळख: हा पट्टा सैनिकी गणवेशाचा एक भाग आहे. त्यामुळे सैनिकांमध्ये एक प्रकारची शिस्त आणि ओळख निर्माण होते.
  3. ऐतिहासिक कारण: पूर्वी घोडदळात लढताना किंवा इतर युद्धजन्य परिस्थितीत टोपी डोक्यावर व्यवस्थित ठेवण्यासाठी या पट्ट्याचा उपयोग केला जात असे. कालांतराने ते एक प्रतीक बनले.

या पट्ट्यामुळे टोपी डोक्यावर व्यवस्थित राहते आणि सैनिक आपले काम अधिक प्रभावीपणे करू शकतात.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

1648 मध्ये स्वराज्यासाठी केलेली पहिली लढाई कोणती?
अँटवर्पवर कुठल्या सैनिकांनी हल्ला केला?
भारतीय सैनिकांचा इंग्रजी सैनिकांपुढे निभाव का लागला नाही?
छत्रपती शिवाजी राजांचे घोडदळ म्हणजे काय?
घोडदळातील सर्वोच्च अधिकारी कोण होता?
शिवाजी महाराज यांनी वयाच्या 17 व्या वर्षी कोणता किल्ला जिंकला?
नेपोलियनला जिवंत पकडण्याचे फर्मान?