2 उत्तरे
2
answers
जिवंत काडतुसे म्हणजे काय?
4
Answer link
बंदुकीची गोळी बंदुकीत भरल्यानंतर पूर्णपणे पेटून बाहेर पडेपर्यंत गोळीच्या प्रत्येक भागाचे मिळून जे एकत्रित रूप असते त्याला काडतुसे म्हणतात.
बंदुकीच्या गोळीचे टोक, ते पेटवण्यासाठी लागणारी दारू, गोळीचे टोक व दारू एकत्रित ठेवण्यासाठी आवरण या सर्वांचे मिळून काडतुस बनते. जे काडतुसे वापरून गोळीबार यशस्वी होतो त्याला जिवंत काडतुसे म्हणतात.
सध्याच्या बंदुकीत हे काडतुसे फार अद्ययावत झाले आहेत त्यामुळे गोळी आणि काडतुसे यातला फरक जाणवत नाही. जुन्या काळात या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या स्वरूपात यायच्या, ज्यात काडतुसातून पाहिले आवरण दाताने फाडून दारू वेगळी करावी लागायची, नंतर गोळी बंदुकीच्या नळीत टाकून दारू वरून ठासावी लागायची व नंतर गोळी डागली जात असे.
खालच्या चित्रफितीत हे सविस्तर वर्णन आहे, ते पहा, म्हणजे काडतुसे आणि इतिहास यांचा संबंध देखील लक्षात येईल.
0
Answer link
जिवंत काडतुसे म्हणजे दारुगोळा (ammunition) ज्यात खालील घटक असतात:
- projectile (क्षेपणास्त्र): बुलेट (bullet) किंवा गोळी.
- propellant (प्रणोदक): स्फोटक पदार्थ, जो गोळीला पुढे ढकलतो.
- primer (प्राइम): स्फोटक टोपी, जी प्रणोदकाला प्रज्वलित करते.
- cartridge case (काडतूस केस): हे सर्व घटक एकत्र ठेवते.
साध्या भाषेत: जिवंत काडतूस म्हणजे बंदुकीमध्ये वापरला जाणारा दारुगोळा, जो निशाण्यावर मारण्यासाठी तयार असतो.