सरपटणारे प्राणी प्राणी पाळीव प्राणी

पाच प्राण कोणते? सविस्तर माहिती द्या.

2 उत्तरे
2 answers

पाच प्राण कोणते? सविस्तर माहिती द्या.

2
प्राण, अपान, व्यान, उदान, समान
१. प्राण :- हा वायू हृदयात राहतो व श्वासोच्छ्वास करतो.
२ अपान :- हा वायू मोठय़ा आतडय़ात राहतो व मलमूत्राचे विसर्जन करतो.
३. व्यान :- हा सर्व शरीर व्यापून राहतो.
४. उदान :- हा कंठात राहतो व अन्नरसाचे विभाजन करतो.
५. समान :- हा नाभी कमलात राहतो व सर्व नाडयांना अन्नरस पुरवतो.

पाच उपप्राण आहेत..

नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय

१. नाग :- हा वायू ढेकर निर्माण करतो व शरीरातील अशुद्ध तत्त्वे बाहेर टाकतो.
२. कूर्म :- हा वायू पापण्यांची उघडझाप करतो.
३. कृकल :- हा वायू िशक व खोकला निर्माण करतो.
४. देवदत्त :- हा वायू जांभई निर्माण करतो.
५. धनंजय :- हा वायू मृत्यूनंतर आपल्या शरीरात राहतो व वातावरणातील पिशाच्चे शरीरात शिरणार नाहीत याची काळजी घेतो. यावरून एक गोष्ट लक्षात येईल की, प्रेत जाळणे ही गोष्ट शास्त्रीयदृष्टय़ा अतिशय चांगले आहे. कारण प्रेत जाळल्याने धनंजय वायू शरीरात अडकून राहात नाही व जीवात्म्याचीही मायेतून त्वरित सुटका होते.

सिद्धपुरुषांचे देह चिन्मय असतात. त्यांचे देह पुरावेत व त्यावर समाधी बांधावी व त्या समाधीची पूजा करावी. अर्थात तेही सिद्धपुरुषाच्या इच्छेनुसार करावे. प्राणायाम ध्यान-धारणा, ईश्वरभक्ती, इत्यादी साधनांनी आपल्या देहात असणारी ‘कुंडलिनी’ व ‘षड्चक्रे’ जागृत होतात व ध्यानामध्ये अतिशय दिव्य अनुभव येऊ लागतात.

षड्चक्रे

मूलाधारचक्र :-

मूलाधारचक्र जागृत झाल्यावर साधकाला मूलाधारचक्रामध्ये ऐरावताचे दर्शन होते. अथवा ॐ काराचे दर्शन होते. हे चक्र जागृत झाल्यावर साधक विद्वान बनतो. कवी बनतो, गद्य-पद्याची रचना त्याच्याकडून होतात. ‘गणपती’ ही या चक्राची देवता आहे.

स्वाधिष्ठान चक्र :-

स्वाधिष्ठान चक्र जागृत झाल्यावर ध्यानामध्ये एक मोठा देवमासा समुद्रात विहार करत आहे असे दिसते. स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मदेव असून, येथे साधकांना ब्रह्मदेवाचे दर्शन घडते.

मणिपूर चक्र :-

मणिपूर चक्र जागृत झाल्यानंतर एक मेंढा अंगावर चाल करून येत आहे असे दिसते, मणिपूर चक्राची देवता विष्णू असून, येथे साधकांना भगवान विष्णूंचे दर्शन घडते.

अनाहत चक्र :-

अनाहत चक्र जागृत झाल्यानंतर दशविध नाद ऐकू येतात. या नादावरच नंतर अनुसंधान ठेवायचे असते. या चक्राची देवता रुद्र (शंकर) ही असून, येथे साधकास साक्षात शंकराचे दर्शन घडते.

विशुद्ध चक्र :-

विशुद्ध चक्र जागृत झाल्यावर आपल्या म्हणजेच स्वस्वरूपाचे दर्शन होते. या चक्राची देवता जीवात्मा म्हणजे आपण स्वत:च येथे आपल्याला आरशात प्रतििबब पाहिल्याप्रमाणे आपलेच रूप दिसते, तसेच काही लोकांना येथे निळ्या रंगाचा हत्ती दिसतो, अथवा निळा प्रकाश दिसतो.

आज्ञाचक्र :-

आज्ञाचक्र जागृत झाल्यानंतर अर्धनारीश्वराचे दर्शन होते. काही साधकांना हंसाचे दर्शन होते. आकाशात हंस विहार करताना दिसतो. काही साधकांना येथे अनेक देव-देवतांचीही दर्शने होतात व महत्त्वाचे म्हणजे आपल्या सद्गुरूंचे दर्शन होते.

सहर्सर चक्र :-

सहर्सर चक्र जागृत झाल्यानंतर साधकाला सिद्धावस्था प्राप्त होते. साधक जीवनमुक्त सिद्धपुरुष बनतो. येथे साधकाला परमेश्वराचे दर्शन होते व तो परमेश्वराशी एकरूप (शिवरूप) होतो.

अष्टभाव

भक्त किती वष्रे मार्गामध्ये आहे. त्याच्या ज्येष्ठतेवरून त्याची भक्तिमार्गातील-प्रगती मोजमाप होत नसून तो कुठल्या स्थितीत आहे यावरून त्याच्यी आध्यात्मिक प्रगती ओळखली जाते..

प्रथम भाव-स्वेद :-

मंत्र, स्तोत्र, जप करताना, ग्रंथ पठण करताना शरीराला घाम येतो हा प्रथम भाव. असा अनुभव येत असेल तर त्याचा अर्थ त्याची सेवा पूर्वजन्मातील प्रारब्द शुद्ध करण्यात खर्च होते.

दुसरा भाव-कंप :-

या भावात पोहोचल्यावर भक्ताच्या शरीराला कंप सुटतो. शरीरात कंप जाणवते.

तिसरा भाव- रोमांच :-

स्वामींचा अगर इतर देवांचा जप करताना पोथी वाचताना अनुभव सांगताना शहारे आले तर सेवेचा तिसरा भाव समजावा.

चतुर्थ भाव- अश्रू :-

महाराजांचे आठवणीने हृदय भरून आले तर आनंदाश्रू येतात. हा भाव सेवेक-याच्या हृदयाची शुद्धी करतो. अशा सेवेक-याकडून स्वामी काव्यही निर्माण होते. खरे म्हणजे या भावात गेल्यावर सेवा काल वाढवायला हवा. निदान एकाच आसनावर बसून एका तासावर जप करायला हवा. अशी दीड वर्षे साधना केली तर भक्त पंचम भावात प्रवेश करतो.

पंचम भाव – सत्त्वापत्ती :-

या भावात प्रवेश केल्यावर अनुसंधान जास्त वेळ टिकते. अंतर्गत ईश्वरीय संकेत मिळतात. स्वामीमय होऊन जातो. पण सर्वसामान्य माणसे चवथ्या भावापर्यंत या जन्मात पोहोचतात व पुढच्या जन्मात पुढचा आध्यात्मिक प्रवास सुरू होतो.

षष्टभाव-समाप्ती :-

या भावात प्रवेश झाल्यावर हळूहळू सुख-दु:ख मान-अपमान, िनदा-स्तुती सर्वसमान वाटू लागतात. अभिमान, अहंकार नष्ट व्हायला सुरुवात होते. सत्गुण वाढू लागतात.

सप्तम भाव- असंसक्ती :-

सातव्या भावात प्रवेश केल्यास देवतांचे दर्शन-साक्षात्कार-संभाषण होतात. षट्चकरे जागरूक होतात-इतरांचे भूत-भविष्य समजते, बोललेले शब्द सत्य होतात. या भावात गुरू दुर्लक्ष करतात. साधकाला स्वबळावर आपली प्रगती करावी लागते व जन कल्याणाचे कार्य करावे.

अष्टमभाव-प्रलय :-

या भावात साधक ईश्वराशी एकरूप होतो. सिद्ध अवस्था प्राप्त होते. पुढील जन्मात पण ते सर्व विभागात काम करून जनकल्याणाचे कार्य करतात.
उत्तर लिहिले · 6/8/2020
कर्म · 7815
0

पाच प्राण आणि त्यांचे कार्य:

आयुर्वेदानुसार, मानवी शरीरात पाच मुख्य प्राण वायू (vital air) आहेत, जे खालीलप्रमाणे:

  1. प्राण (Prana):

    स्थान: छाती आणि श्वसन प्रणाली

    कार्य: श्वसन, हृदयाचे कार्य, आणि इंद्रियांचे नियंत्रण. हे आपल्याला ऊर्जा आणि उत्साह देतात.

  2. अपान (Apana):

    स्थान: ओटीपोट आणि उत्सर्जन प्रणाली

    कार्य: शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकणे, प्रजनन आणि मूत्राशय नियंत्रण.

  3. समान (Samana):

    स्थान: नाभी आणि पचन प्रणाली

    कार्य: अन्न पचन करणे, पोषक तत्वे शोषून घेणे आणि शरीराला ऊर्जा पुरवणे.

  4. उदान (Udana):

    स्थान: कंठ आणि डोके

    कार्य: बोलणे, दृष्टी, विचार आणि उच्च चेतना जागृत करणे.

  5. व्यान (Vyana):

    स्थान: संपूर्ण शरीर

    कार्य: रक्ताभिसरण, मज्जासंस्था (nervous system) आणि स्नायूंचे नियंत्रण करणे.

हे पाच प्राण शरीराच्या कार्यांसाठी अत्यंत आवश्यक आहेत आणि त्यांच्या संतुलनावर आपले आरोग्य अवलंबून असते.

अधिक माहितीसाठी काही उपयुक्त स्रोत:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 940

Related Questions

अहमदाबाद येथे कुत्र्यांच्या ट्रस्ट बद्दल माहिती द्या?
मस्त कडकनाथ कोंबडी विषयी माहिती मिळेल का?
कविता आकलनाच्या विविध पध्दतींची थोडक्यात माहिती लिहा?
दोन पाळीव प्राण्यांची नावे लिहून त्यांचे उपयोग कसे लिहाल?
दोन पाळीव प्राणी?
पुरुषांमध्ये सेक्स पावर जास्त असते की महिलांमध्ये सेक्स पावर जास्त असते?
जंगली प्राणी पाळीव प्राणी होऊ शकतात का?