राजकारण महाराष्ट्रातील राजकारण राजकारणी पात्रता

नगरसेवक आणि आमदार या पदासाठी पात्रता काय लागते?

2 उत्तरे
2 answers

नगरसेवक आणि आमदार या पदासाठी पात्रता काय लागते?

6
आमदार म्हणजे विधानसभा/विधानपरिषद सदस्य-
उमेदवारांची पात्रता :
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


महानगरपालिका/ नगरपालिकेचा सदस्य/नगरसेवक-
१) तो व्यक्ती संबंधित शहराचा  रहिवाशी असावा.
२) वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावीत.
३) १२ सप्टेंबर २००१ नंतर ३ रे अपत्य नसावे.
४) तो व्यक्ती शासकीय सेवेमध्ये नसावा.
५) नगरपालिकेचा थकबाकीदार नसावा.

* सदस्यांची अपात्रता :
१)  १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्ये असल्यास
२)  न्यायालयाने वेडा म्हणून घोषित केलेला व्यक्ती
३)  सरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थचा कर्मचारी असल्यास
४)  नागरपालिकाचा ठेकेदार असल्यास
५)  नगरपालिकेच्या बिलाचा थाबाकीदार असल्यास
६)  वयाची २१ वर्ष पूर्ण नसलेला व्यक्ती
उत्तर लिहिले · 25/7/2020
कर्म · 16430
0

नगरसेवक आणि आमदार या पदांसाठी पात्रता खालीलप्रमाणे आहे:

नगरसेवक पदासाठी पात्रता:
  • तो भारताचा नागरिक असावा.
  • वय २१ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • त्याचे नाव स्थानिक मतदार यादीत समाविष्ट असावे.
  • तो कोणत्याही शासकीय लाभाच्या पदावर नसावा.
  • तो दिवाळखोर किंवा गुन्हेगार नसावा.
आमदार (विधानसभा सदस्य) पदासाठी पात्रता:
  • तो भारताचा नागरिक असावा.
  • वय २५ वर्षांपेक्षा कमी नसावे.
  • त्याचे नाव कोणत्याही राज्यातील मतदार यादीत समाविष्ट असावे.
  • तो कोणत्याही शासकीय लाभाच्या पदावर नसावा.
  • तो दिवाळखोर किंवा गुन्हेगार नसावा.

अधिक माहितीसाठी, आपण निवडणूक आयोगाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: भारतीय निवडणूक आयोग

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

मी 10वी नंतर डिप्लोमा केला आहे आणि डिग्री पूर्ण केली तर मी तलाठी पदासाठी पात्र आहे का? की 12वी मुळे अडचण येऊ शकते?
माझी पत्नी ९वी पास असून ती १२वी कला शाखेची परीक्षा ह्या वर्षी देऊ शकते काय?
खासदार होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
मुक्त विद्यापीठातून दहावी न करता डायरेक्ट बी. ए. केलेले आहे, तर मला MPSC परीक्षेला बसता येईल काय?
मला MPSC करायची आहे, पण मित्र म्हणतात उंची लागते, तर उंची किती लागते कोणी सांगाल का?
तलाठी भरती २०२२ साठी मुक्त विद्यापीठाची पदवी चालते का?
माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकाची शैक्षणिक पात्रता काय असावी लागते?