लेखापाल अर्थशास्त्र

लेखापालाचे (accountant) काम काय आहे? आणि त्याचे मासिक वेतन किती असते?

2 उत्तरे
2 answers

लेखापालाचे (accountant) काम काय आहे? आणि त्याचे मासिक वेतन किती असते?

5
सनदी लेखापाल अर्थात C A बददल माहीती

व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांना स्वत:च्या आर्थिक व्यवहारांचा चोख हिशेब ठेवणे आवश्यक असते. त्यांच्या आर्थिक आरोग्यासाठी हे गरजेचं असतं. यासाठीच मदत भासू लागली ती सनदी लेखापालाची म्हणजे अकाउंटंटची. अतिशय प्रतिष्ठित आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न असे हे करिअर आहे.

Chartered Accountants logoचार्टर्ड अकाउंटंट हा हिशोब किंवा लेखापाल विभागातील तज्ज्ञ असतो. सर्व प्रकारच्या अकाउंटिंगचं त्याला ज्ञान असतं. त्यामुळे किचकट हिशोब ठेवण्याचं काम त्याला जमतं. तसंच तो करविषयक तज्ज्ञ असतो. आपल्या देशात प्रत्येक क्षेत्रात लागू असणा-या करांचं एक मोठं जाळं आहे. त्यात व्यक्तिगत उत्पन्न कर हा सर्वाच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु, त्याचबरोबर सेवा कर, मूल्यवर्धित कर, उत्पादन कर असे अनेक व्यवसायांशी संबंधित अनेक कर लागू होतात. या सर्व करांचे नियम इतके क्लिष्ट आहेत की, त्यासाठी एका तज्ज्ञाची गरज लागतेच. त्यामुळे साधारणत: उद्योजक हे काम स्वत:च्या अंगावर न घेता सनदी लेखापालाची मदत घेणे इष्ट समजतो.

माणूस जसा जसा उत्पन्नाच्या पातळीने वर चढत जातो तशी तशी त्याची आर्थिक घडी किचकट होते. त्यामुळे अशा वेळेस सनदी लेखापालाचे काम अधिक निकडीचे होते. या कामाचे आपण खालीलप्रमाणे विभाजन करू शकतो –

सनदी लेखापाल काय काम करतो?

पैशाचा जमा-खर्च, पावत्या, बिलं, यांचं निरीक्षण करतो. योग्य त्या पैशांच्या व्यवहाराची नोंद केली जाते किंवा नाही, यावर लक्ष ठेवतो. संस्था आपले कर, परवाने किंवा परवाने याविषयी भरावे लागणारे पैसे योग्य वेळी भरले जातात किंवा नाही, याची काळजी घेतो. वार्षिक आर्थिक व्यवहाराचा आराखडा तयार करून तो योग्य त्या अधिका-यास त्याच्या माहितीसाठी सादर करतो. अंतिम आर्थिक परिपत्रक तयार करून त्यात जमा व खर्च याविषयी नोंदी करतो. याद्या, रोकड रक्कम, मूळ कागदपत्र यांचे ताळेबंद तपासून पाहून त्याविषयीचा अहवाल योग्य त्या अधिका-याला सादर करतो. दिलेल्या सूचना पाळल्या जातात की, नाही घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण केले आहे किंवा नाही हे तो पाहतो.

लेखे ठेवणे

अनेक कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी सनदी लेखापालांना उपलब्ध असतात. कंपनीच्या लेख्यांची संपूर्ण जबाबदारी सनदी लेखापालावर असते. स्वयंरोजगार कारणा-यांनासुद्धा हे काम मिळते.

लेखापरीक्षण

सनदी लेखापालाचे मुख्य काम लेखापरीक्षण (ऑडिट) हे असते. स्वयंरोजगार करणारी व्यक्तीदेखील ऑडिटचं काम करतात. कंपनी कायद्याप्रमाणे ऑडिटर नेमणे कंपनीला बंधनकारक असतं. यात सर्व प्रकारच्या आणि आकाराच्या कंपन्यांना सनदी लेखापाल नेमणे गरजेचे असते. त्याने एकदा हे परीक्षण केले की, त्या संस्थेचा त्या वर्षाचा आर्थिक व्यवहार मान्य केला जातो.

कर

अगोदर उल्लेखल्याप्रमाणे करविषयक सल्ला फार महत्त्वाचा भाग आहे. काही सनदी लेखापाल फक्त याच विषयात तज्ज्ञ असतात. भारतात अनेक प्रकारचे कर आणि त्याचे कायदे आहेत. त्यामुळे लेखापालांना उत्तम व्यवसाय तसेच नोकरीतही उत्तम संधी उपलब्ध होतात. यात उत्तम अनुभव घेतल्यानंतर करविषयक कायदेशीर केसेस सनदी लेखापाल हाती घेऊ शकतो. यात उत्तम पैसा आहे.

विदेशी चलन

विदेशी चलनाच्या बाबतीत भारतातील कायदा (फेमा) अतिशय कडक आहे. त्यामुळे त्याचे काटेकोर पालन केले गेले नाही तर फार मोठी शिक्षा होऊ शकते. त्यामुळे सनदी लेखापालांनाही फार चांगली संधी उपलब्ध आहे. केवळ याच विषयात व्यवसाय करणा-यांची संख्या फार मोठी आहे.

शिक्षण

संधीप्रमाणे या विषयातील शिक्षणही कठीण आहे. भारतातील कठीण परीक्षांमधील एक परीक्षा म्हणून या परीक्षेचा समावेश होतो. सीएससारखेच बारावीनंतर आणि पदवीनंतर असे दोन प्रकार यात आहेत.

बारावीनंतर सीपीटी ही प्रवेश परीक्षा द्यावी लागते. सीएच्या नवीन अभ्यासक्रमानुसार विद्यार्थी दहावीत असतानाच सीपीटी या प्राथमिक परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन करू शकतो. बारावीनंतर सीपीटी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट (आयपीसीसी) ही पुढील परीक्षा द्यावी लागते. यात साडेतीन वर्षाची आर्टिकलशिप असते. म्हणजे प्रॅक्टिसिंग चार्टर्ड अकाउंटंटकडे तीन वर्षाचे व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावे लागते. सीपीटी ही परीक्षा वर्षातून दोन वेळा तर इंटरमिजिएट (आयपीसीसी) हीसुद्धा दर सहा महिन्यांनी घेतली जाते. ही उत्तीर्ण झाल्यानंतर फायनल परीक्षा द्यावी लागते. फायनलमध्ये यशस्वी झाल्यावर मेंबरशिप मिळते. दरम्यान, विद्यार्थ्यांना इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीविषयक आयटीटी ही ट्रेनिंग परीक्षा पास व्हावी लागते. साधारणत: सीए हा अभ्यासक्रम साडेचार वर्षात पूर्ण होतो.

इंटरमिजिएट (आयपीसीसी)

ग्रुप १

१. अकाउंट्स
२. व्यावसायिक कायदा, एथिक्स आणि कम्युनिकेशन
३. कॉस्ट अकाउंट आणि आर्थिक व्यवस्थापन
४. कर

ग्रुप २

५. प्रगत अकाउंट्स
६. ऑडिट
७. माहिती तंत्रज्ञान आणि स्ट्रॅटेजिक व्यवस्थापन

फायनल

ग्रुप १
१. फिनान्शिअल रिपोर्टिग
२. स्ट्रॅटेजिक आर्थिक व्यवस्थापन
३. प्रगत ऑडिटिंग आणि व्यावसायिक एथिक्स
४. व्यावसायिक व इतर कायदे

ग्रुप २
५. प्रगत व्यवस्थापकीय अकाउंटिंग
६. इन्फॉम्रेशन सिस्टम कंट्रोल आणि ऑडिट
७. डायरेक्ट कर कायदा
८. इनडायरेक्ट कर कायदा

अभ्यासक्रम संस्था

इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया, कुलाबा
मुकुंद कॉलेज ऑफ कॉमर्स, मुलुंड(प.)
एसआयईएस कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड मॅनेजमेंट, सायन
नरसी मोनजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, विलेपार्ले(प.)
चेतन हजारीमल कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स, वांद्रे(पू.)
वझे कॉलेज ऑफ आर्ट्र्स, सायन्स अँड कॉमर्स , मुलुंड(पू.)
संधी

भारतातील बदलते अर्थकारण, क्लिष्ट होत जाणारे आर्थिक कायदे आणि कर व्यवस्था, गुंतवणुकीसाठी परदेशी कंपन्यांचा वाढणारा ओढा आणि एकंदरीत भारतातील वाढते उद्योजकीय वातावरण, यामुळे चार्टर्ड अकाउंटंटच्या व्यवसायाला मरण नाही, हे नक्की. उलट एखाद्या विशिष्ट विषयात तज्ज्ञ होऊन आपण भरभराटीचे दरवाजे अजून उघडू शकतो. तेव्हा सीएच्या तयारीला लागा!
उत्तर लिहिले · 23/7/2020
कर्म · 11370
0

लेखापालाचे (accountant) मुख्य कामे आणि त्याचे अंदाजे मासिक वेतन खालीलप्रमाणे:

लेखापालाची कामे:
  • आर्थिक नोंदी ठेवणे: कंपनीच्या किंवा संस्थेच्या जमाखर्चाचा हिशोब ठेवणे, ledger मध्ये नोंद करणे.
  • आर्थिक विवरणपत्रे तयार करणे: ताळेबंद (Balance Sheet), नफा-तोटा पत्रक (Profit and Loss Statement) आणि रोख प्रवाह विवरण (Cash Flow Statement) तयार करणे.
  • कर भरणा: कर (Tax) संबंधीची कामे करणे, जसे की कर विवरणपत्रे भरणे आणि कर नियोजन करणे.
  • लेखा परीक्षण (Auditing): अंतर्गत आणि बाह्य लेखा परीक्षणा (internal and external audits) मध्ये मदत करणे.
  • अर्थसंकल्प तयार करणे: कंपनीसाठी अर्थसंकल्प (Budget) तयार करणे आणि त्याचे व्यवस्थापन करणे.
  • खर्च नियंत्रण: अनावश्यक खर्च टाळण्यासाठी उपाययोजना करणे.
  • आर्थिक सल्ला: व्यवस्थापनाला आर्थिक निर्णय घेण्यासाठी सल्ला देणे.
मासिक वेतन:

लेखापालाचे मासिक वेतन अनेक घटकांवर अवलंबून असते, जसे की शिक्षण, अनुभव, कौशल्ये आणि कंपनीचा आकार. तरीही, एक अंदाजे वेतन खालीलप्रमाणे:

  • freshers (entry-level accountant): ₹15,000 ते ₹25,000 प्रति महिना.
  • मध्यम-अनुभवी (mid-level accountant): ₹25,000 ते ₹40,000 प्रति महिना.
  • वरिष्ठ लेखापाल (senior accountant): ₹40,000 ते ₹70,000 किंवा त्याहून अधिक प्रति महिना.

हे आकडे केवळ अंदाजे आहेत आणि ते बदलू शकतात.

अधिक माहितीसाठी, आपण नोकरी शोधणाऱ्या वेबसाइट्स जसे Naukri.com किंवा LinkedIn वर Accountant jobs search करू शकता.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1080

Related Questions

भूमिहीन लोकांसाठी कोणती बँक कर्ज देऊ शकते आणि त्याची प्रक्रिया काय आहे?
1969 मध्ये किती बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले?
नियोजन आयोगाची स्थापना कधी करण्यात आली?
भांडवलशाहीचे पाच फायदे लिहा?
वाणिज्य सिद्धांता विषयी माहिती लिहा?
शेतीच्या व्यापारीकरणामुळे हिंदुस्थानवर झालेले परिणाम स्पष्ट करा?
भारतीय भांडवलदारीच्या उदयाचे परिणाम विशद करा?