2 उत्तरे
2
answers
बनगरवाडी ही प्रादेशिक कादंबरी का आहे?
2
Answer link
बनगरवाडी तून व्यंकटेश माडगूळकरांची प्रयोगशीलता प्रत्ययास येते. रुढ अर्थाने ह्या कादंबरीला कथानक नाही. बनगरवाडी नावाच्या ह्या लहानशा गावातील सामूहिक जीवनाचे विविधांगी चित्रण तीत केलेले आहे. तेथील उजाड व निष्पर्ण सृष्टी, तेथील कंगालपणा, दुष्काळ, तेथील सण, उत्सव, रूढी, परंपरा, श्रद्धा, संकेत, तेथील रहिवाशांच्या जीवनांतील चढउतार ह्यांना जिवंत शब्दरूप लाभले आहे. येथे कोणी विशिष्ट व्यक्ती नायक वा नयिका नाही. बनगरवाडी ह्या गावालाच नायकत्व देण्यात आलेले आहे.बनगरवाडीच्या परीसरात पडणारा दुष्काळच या कादंबरीतला नायक आहे. कारण या दुष्काळाभोवतीच बनगरवाडीचे कथानक फिरताना दिसते.
कुठल्याही नायकाला किंवा नायिकेला नायकत्त्व न देता व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या गाव प्रदेशालाच नायकत्व दिले आहे म्हणून ही प्रादेशिक कादंबरी आहे.
कुठल्याही नायकाला किंवा नायिकेला नायकत्त्व न देता व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या गाव प्रदेशालाच नायकत्व दिले आहे म्हणून ही प्रादेशिक कादंबरी आहे.
0
Answer link
'बनगरवाडी' ही प्रादेशिक कादंबरी आहे, कारण:
- ठराविक प्रदेशाचे चित्रण: या कादंबरीत बनगरवाडी नावाच्या एका विशिष्ट pastoral गावाची कथा आहे. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी तेथील लोकांचे जीवन, त्यांची संस्कृती आणि त्यांची निसर्गाशी असलेली जवळीक यांबद्दल लिहिले आहे.
- ग्रामीण जीवनशैली: कादंबरीत ग्रामीण भागातील लोकांचे साधे जीवन, त्यांची शेती, त्यांचे कष्ट आणि त्यांच्या श्रद्धा यांवर प्रकाश टाकला आहे.
- स्थानिक भाषा आणि बोली: लेखकाने पात्रांच्या तोंडी विशिष्ट प्रादेशिक भाषेचा आणि बोलीभाषेचा उपयोग केला आहे, ज्यामुळे कथा अधिक वास्तववादी वाटते.
- सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती: बनगरवाडीत लोकांची गरिबी, त्यांचे सामाजिक संबंध आणि त्यांच्या समस्यांचे चित्रण आहे.
या कारणांमुळे 'बनगरवाडी' ही एक प्रादेशिक कादंबरी आहे, जी एका विशिष्ट प्रदेशातील जीवनाचे आणि संस्कृतीचे दर्शन घडवते.