सरकारी योजना.
अर्थशास्त्र
प्रधानमंत्री आवास योजना ही कशी मिळेल आणि काय करावे ?
मूळ प्रश्न: प्रधानमंत्री आवास योजना काय आहे आणि ती आपल्याला लागू होण्यासाठी काय प्रोसेस करावी लागते?
या योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेद्वारे दि. २० नोव्हेंबर २०१६ ला आग्रा , उत्तरप्रदेश येथे करण्यात आला.ही योजना म्हणजे सर्वांसाठी घरे या योजनेचाच एक भाग आहे. सर्वांसाठी घरे ही योजना प्रमुखत: दोन विभागांमध्ये विभाजित केल्या गेली आहे:प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) आणि प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण).
उद्दीष्ट्ये:-
या योजने-अंतर्गत २०१६-२०१७ या आर्थिक वर्षांपासून सुरु करुन २०१८-२०१९ या तीन वर्षात, भारताच्या ग्रामीण भागात, सुमारे १ कोटी घरकुलांचे बांधकाम करण्यात येणार आहे.यातील घरकुले २५ वर्ग मीटर इतक्या क्षेत्रफळाची टिकाऊ व आपत्तीरोधक असतील.या घरकुलात एक स्वयंपाकघर असेल.याव्यतिरिक्त, घरात शौचालयाचे बांधकामास १२,००० इतकी जास्तीची मदत देण्यात येणार आहे.या घरकुलांच्या बांधकामांकरीता पूर्वीची आर्थिक मदत वाढविण्यात आलेली आहे. समतल मैदानी क्षेत्रात पूर्वीची मदत ७०,००० ने वाढवून ती आता १.२० लाख इतकी करण्यात आलेली आहे. तसेच, टेकड्या/दुर्गम भागात, यासाठी असलेली पूर्वीची रक्कम वाढवून ती आता १.३० लाख इतकी करण्यात आलेली आहे.
लाभार्थी निवड व प्रदान:-
एसईसीसी च्या २०११ च्या डाटामधून ग्रामसभेद्वारे यातील लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.या योजनेमार्फत देण्यात येणारी रक्कम ही आवाससॉफ्ट व पीएफएमएस या संचेतनांचे माध्यमातून या योजनेच्या लाभार्थींचे बँक खात्यात सरळ देय होईल.निवड न झालेल्या पण घरकुल बांधकामासाठी इच्छुक लाभार्थ्यांना ७०,००० संस्थागत कर्ज प्राप्त करण्याची सुविधाही या योजनेत आहे.
इतर
या योजनेतील लाभार्थ्याला स्थानिकरित्या योग्य आणि त्याचेदृष्टीने उपयोगी असे डिझाईन निवडण्याचा पर्याय देण्याचा येणार आहे.तसेच या योजने-अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या घरकुलांची गुणवत्ता उत्तम राखण्यास व योग्य दक्षता घेण्यास कारागीरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers
प्रधानमंत्री आवास योजना ही कशी मिळेल आणि काय करावे ?
Related Questions
नवीन कायद्यानुसार प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना किती अनुदान मिळते?
1 उत्तर