रेशन कार्ड उत्पन्न अर्थ सरकारी योजना.

रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्न किती पाहिजे?

4 उत्तरे
4 answers

रेशन कार्ड काढण्यासाठी उत्पन्न किती पाहिजे?

1
रेशनकार्ड उत्पन्नाच्या आधारेच देतात. त्यात २१००० पर्यंत उत्पन्न असेल तर BPL (पिवळे) २१००० ते १००००० उत्पन्न असल्यास APL(केशरी) १००००० च्या पुढील उत्पन्न असल्यास - (शुभ्र) अशा प्रकारे रेशनकार्ड भेटते.
उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 11785
1
रेशनकार्ड काढण्यासाठी उत्पन्न 

प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक
पांढरे रेशनकार्ड – १ लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेले व्यक्ती
प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांमध्ये दारिद्र्य रेषेखालील १०० टक्के लोकांचा सहभाग असतो. तर ४४ हजार रुपयांच्या आत उत्पन्न असलेल्या गावातील एकूण लोकसंख्येच्या ७६ टक्के लोकांना याचा लाभ मिळतो. ग्रामीण भागातील प्रमाण हे ७६ टक्के आहे तर शहरी भागातील प्रमाण ४५ टक्के आहे.
प्राधान्य गटातील रेशनकार्डधारकांना २ रुपये किलो दराने गहू देण्यात येतो. तर ३ रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. त्याबरोबरच १५ रुपये ८१ पैसे दराने रॉकेल दिले जाते. पांढरे कार्ड व दोन गॅस असलेल्या

रेशनकार्डधारकांना रॉकेल दिले जात नाही तर एक गॅस असलेल्या रेशनकार्डधारकाला उपलब्धतेनुसार रॉकेल दिले जाते.
ग्रामीण भागात ७६ टक्के लोकांना योजनेचा फायदा द्यायचा असल्याने त्याचे लाभार्थी कोण असतील हे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभेला आहे. ग्रामसभा जे सांगेल त्याच व्यक्ती सरकार यादीत असतील.
रेशनकार्डचे प्रकार
अंत्योदय रेशनकार्ड – अंत्योदय योजनेतील लाभधारक
प्राधान्य गट रेशनकार्ड – वार्षिक ४४ हजारांच्या आतील उत्पन्न असलेले
केशरी रेशनकार्ड – १ लाखाच्या आता आणि ४४ हजारांपेक्षा अधिक


उत्तर लिहिले · 24/8/2022
कर्म · 53710
0
उत्पन्न निकष राज्य सरकारद्वारे ठरवले जातात आणि ते वेळोवेळी बदलू शकतात. Ration card काढण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा खालीलप्रमाणे असू शकते:

Gramin (ग्रामीण) भागासाठी:

  • वार्षिक उत्पन्न: ₹ 44,000 पेक्षा कमी असावे.

Shahari (शहरी) भागासाठी:

  • वार्षिक उत्पन्न: ₹ 59,000 पेक्षा कमी असावे.

Ration card काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे:

  • आधार कार्ड
  • ओळखपत्र
  • पत्त्याचा पुरावा
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साइज फोटो

अधिक माहितीसाठी, तुम्ही तुमच्या राज्यातील अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.

उदाहरणार्थ, महाराष्ट्र राज्याच्या ration card संदर्भात माहिती मिळवण्यासाठी खालील संकेतस्थळाला भेट द्या:

mahafood.gov.in
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

प्रधानमंत्री घरकुल योजनेत सध्या चालू असलेले घरकुल अनुदान वाढीचा GR वगैरे आला आहे का?
50000 रुपये वार्षिक हप्ता दराने डीसीसी बँकेत किती कर्ज मिळेल?
क्रेडिट बी मधून ऑनलाईन लोन घेतलेले नाही, माझ्या नातेवाईकांनी घेतले आहे, परंतु त्यांचे आणि माझे जमत नाही. तरीही क्रेडिट बी वाले दर महिन्याला फोन करून त्रास देत आहेत, मी काय करावे?
ड्यूटीवर असताना मृत्यू झाल्यास काय मिळते?
मला 2.5 लाख रूपयांची गरज आहे. मला वाटतं भिशी लावावी, पण भिशी विषयी मला काही माहिती नाही.
भारताचे आयकर संदर्भात नवीन धोरण काय आहे?
मला गुंतवणूक करायची आहे, तर कशामध्ये गुंतवणूक करू?