नोकरी अधिकारी तलाठी

तलाठी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

तलाठी म्हणजे काय?

2
गाव कामगार तलाठी हा महाराष्ट्र जमीन महसूल व्यवस्थेतील एक कर्मचारी आहे. जमिनीसंबंधीची रेकॉर्डे सतत अद्ययावत रहावीत म्हणून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार अनेक प्रकारच्या नोंदवह्या विहित करण्यांत आल्या आहेत. गावात काम करणारा तलाठी या गाव-पातळीवरील नोंदवह्यांचे दप्तर एकूण १ ते २१ क्रमांकाच्या गाव नमुन्यांमध्ये ठेवतो.

भारतामध्ये सर्वप्रथम १९१८ साली कोल्हापूर संस्थानिकांमध्ये राजश्री शाहू महाराजांनी कुलकर्णी वतने रद्द करून तलाठी हे पद निर्माण केले. तलाठी यांच्या कार्यालयास सज्जा असेही म्हणतात.

 तलाठी यांचे अधिकार व कार्य :

१) जिल्हाधिकाऱ्याने वेळोवेळी ठरवून दिलेली नोंदणी पुस्तके, हिशोब व अभलेखे सांभाळणे.
२) शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे विविध दाखले व उतारे देणे. ( उत्पन्न, रहिवासी, ८-अ  ची नक्कल )
३) गावातील जमीन व्यवहाराच्या नोंदी ठेवणे.
४) कोतवालाच्या कार्यावर देखरेख व नियंत्रण ठेवणे.
५) तहसीलदार, महसूल अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावाच्या कामकाजासंबंधी कागदपत्रे तयार करणे.
६) निवडणुकीच्या काळात निवडणूक विषयक कामे पार पाडणे.
७) जमिनीची आणेवारी ठरविणे, त्यांचा अहवाल वरिष्ठाना पाठविणे.
८) गावातील विविध साथीच्या रोगासंबंधीची माहिती तहसीलदार याना कळविणे.
९) गावातील आपतग्रस्त व निराधार कुटुंबाचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणे.
१०) जमिनीचा सातबारा (७/१२) उतारा व ८-अ ची नक्कल देणे.
११) महसूल गोळा करणे व कर्ज वसुली करणे.
१२) गावातील कुटुंब नियोजन कार्यक्रमांतर्गत जबाबदाऱ्या पार पाडणे.
१३) गावातील कायदा व स्व्यवस्थेसंबंधी नोंदी ठेवणे.
१४) वारसा हक्काचा दाखल करणे.
१५) कोतवालदार देखरेख व नियंत्रण ठेवणे.
उत्तर लिहिले · 22/5/2020
कर्म · 55350
0

तलाठी हे महाराष्ट्र शासनातील एक महत्त्वाचे पद आहे. तलाठी हा महसूल विभागातील अधिकारी असतो आणि त्याचे काम गावातील जमिनीच्या नोंदी ठेवणे, शेतसारा वसूल करणे, निवडणुकीच्या कामात मदत करणे आणि गावाला आवश्यक असणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देणे असते.

तलाठ्याची कार्ये:

  • जमिनीच्या नोंदी अद्ययावत ठेवणे.
  • शेतसारा व इतर शासकीय कर वसूल करणे.
  • गावातील जमिनीच्या वादांचे निवारण करणे.
  • नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पंचनामे करणे.
  • शासकीय योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे.

तलाठी हा गावपातळीवर सरकारचा प्रतिनिधी असतो आणि त्याचे काम गावाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असते.

अधिक माहितीसाठी, आपण महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: https://mahabhumi.gov.in/

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1040

Related Questions

माझे वय ३५ आहे, मला सरकारी नोकरी करता येईल का?
सरकारी नोकरी किती वयापर्यंत लागू शकते?
पोलीस भरतीसाठी लागणारी ग्रामपंचायत विषयी माहिती काय?
पोलीस भरती प्रश्नसंच?
करिअर/ नोकरी बदलण्यासाठी योग्य वेळ कोणती?
B.com झाल्यावर कोणती नोकरी करता येते?
धावजी पाटील यांच्याबद्दल माहिती?