2 उत्तरे
2
answers
पंचांग म्हणजे काय?
1
Answer link
कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती ज्यात असते ते पंचांग. भारतीय कालगणने साठी ज्योतिर्गणित हे पृथ्वी हे स्थिर केन्द्रबिंदू मानून केलेलेे आहे.
त्यामुळे सूर्य हा तारा असूनही त्याला ग्रहाचे स्थान देउन तो चल झालेला आहे. चंद्र व सूर्य यांच्यामध्ये बारा अंशांचे कोनात्मक अंतर पडण्यासाठी जो अवधी लागतो त्याला तिथी म्हणतात.
नक्षत्र म्हणजे अवकाशातील विशिष्ट पटटयातील ठळक तारका समूह. अवकाश गोलात ३६० अंशाचे बारा भाग पाडून जशा राशी झाल्या तसे २७ भाग पाडले तर २७ नक्षत्र होतात. म्हणजे एक भाग हा १३ अंश २० कलांचा झाला.
वार हे अंग उशीरा प्रचारात आले. वार हे मूळ भारतीयांचे नव्हेतच. ते खाल्डियन कदाचित इजिप्शियन वा ग्रीक संस्कृतीतून आपल्याकडे आले असावेत. कारण महाभारतात वारांचा उल्लेख नाही असे भारतीय ज्योतिषाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास कर्ते शं. बा. दिक्षीत सांगतात.
योग व करण हे व्यवहारो पयोगी नसल्याने आता व्यवहारात योग व करण ही अंगे प्रचारात नाहीत. पंचांगात मात्र ती दिलेली असतात.
या व्यातिरिक्त पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक माहिती दिलेली असते. विवाह मुंज मुहूर्त वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी, ज्योतिषांना लागणारी पहाटे ५.३० रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहीती, धार्मिक कृत्याविषयीचे निर्णय वगैरे वगैरे. औषधाची जशी प्रथमोचाराची पेटी असते तसे हे धार्मिक प्रथमोचाराचे अंग म्हणून घरात टांगलेले असते.♏

0
Answer link
पंचांग म्हणजे काय?
पंचांग हे एक हिंदू ज्योतिषशास्त्र आधारित कॅलेंडर आहे. हे भारतीय उपखंडात विशेषतः वापरले जाते. पंचांगam पाच मुख्य घटकांनी बनलेले असते:
- तिथी: চান্দ্র দিনের হিন্দু ক্যালেন্ডার।
- वार: आठवड्यातील दिवस.
- नक्षत्र: चंद्राचे आकाशातील स्थान.
- योग: सूर्य आणि चंद्र यांच्यातील विशिष्ट गणितीय संबंध.
- करण: तिथीचा अर्धा भाग.
पंचांग हे धार्मिक उत्सव, उपवास, विवाह आणि अन्य शुभ कार्यांसाठी शुभ मुहूर्त (वेळ) ठरवण्यासाठी वापरले जाते.
पंचांगाचे फायदे:
- शुभ आणि अशुभ वेळा दर्शवते.
- ग्रह आणि नक्षत्रांची माहिती देते.
- धार्मिक कार्यांसाठी योग्य मुहूर्त निवडण्यास मदत करते.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: