2 उत्तरे
2
answers
छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांना कोणता किताब (पदवी) दिली?
0
Answer link
छत्रपती संभाजी महाराज यांनी कवीराज कलश यांना छंदोगामात्य किताब(पदवी)दिली
्छत्रपतीजी महाराज यांनी कवीराज कलश यांना छंदोगामात्य किताब(पदवी)दिली
होमछ.संभाजी महाराजछंदोगामात्य कवी कलश काव्य-“रक्तरंजित महाकाव्य!”
छंदोगामात्य कवी कलश काव्य-“रक्तरंजित महाकाव्य!”
छ.संभाजी महाराज
आपण सर्वांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात कवी कलश यांचे योगदान स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पहिलेलेच आहे.
एक मित्र व सेवक म्हणून त्यांनी आपले सम्पूर्ण आयुष्य शंभुराजे यांच्या ठायीं घातले होते.
किती भाग्यवन्त होते कवी कलश की ज्यांना स्वराज्याच्या धाकल्या धन्यासोबत बलिदान देता आले.
आपल्या धन्यासाठी काव्यरचना करणाऱ्या छंदोगामात्य कवी कलश यांच्यासाठी ओंकार गवळी यांनी खालील काव्य लिहले आहे ते आपणास नक्की आवडेल.
“रक्तरंजित महाकाव्य!”
‘कवीराज कवी कलश’ सर्व प्रर्थम वंदन तुमच्या चरणी!!
माझ्या सारख्या मातीच्या कणाने एका राजमना बद्दल काय लिहावे ? पण आपल्या परिने प्रयत्न करेन कवीराज!
“जैसे प्रभू रामचंद्रासी हनुमंत, तैसेच रूद्र शंभू च्या ठाई तुम्ही निष्टावंत.”
“नियतीच्या आणि स्वकियांच्या रणसंग्रामातून पोळून निघालेल्या, राजमनाला वृक्षवल्ली ची सावली दिली तुमच्या शब्दरुपी कवनांनी!”
“तुमच्याच संगतीने घडलेला ‘कवीभुषण’ रायगडाच्या पायवाटांनी आणि सह्याद्री च्या घाटांनी पाहीला.” “तुम्ही ज्वलनज्वलनतेजस्वी शंभो-शिवछत्रपतीना जिवाभावाच्या सवंगड्या प्रमाणे साथ दिलीत,
अगदी मृत्यूच्या दारापर्यंत आणि मृत्युंजय अशा बलिदानपर्यंत!
” ज्यावेळी स्वकीयांची वावटळ शंभूराजांच्या मागे लागली त्यावेळी तुम्ही कवीमनाने लेखणी सोडून भवानी धारण करुन साथ दिली साक्षात रूद्रशंभूला!”
“तुम्ही खरच काव्यग्रंथात दडलेला, पंडित रणधूमाळीतला वीर शोभलात.”
“मथुरेपासुन वडु-तुळापूर पर्यंत तुमचा आणि शिवबाच्या छावाचा मैत्रीचा प्रवास हा महाभारता इतकाच भव्य,दिव्य,कपट, लालसा,इर्षे ने भरलेला होता.”
“या आप्तस्वकियांच्या गचंगगळ्यातून तुमच्या मैत्री ने नेहमीच सिंहाच्या “कवीमनाला” सांभाळल पण देसाई वाड्यातल्या त्या दुर्दैवी प्रसंगाने घात केला.”
“जगदीश्वराच्या पिंडीपासुन बहादुर गडाच्या धिंडी पर्यंतच्या तुमच्या जिवनयात्रेला कसा न्याय देऊ कवीराज ?
कस सांगू या जगाला की कृष्ण-सुदामा च्या मैत्री चे दाखले देणाऱ्या, या जगाने तुमच्या आणि शंभूराजांच्या नितळ निरागस मैत्रीची क्षणोक्षणी अवहेलना केली.”
“शंभूराजांवरची अगदी औरंग्याच्या डेर्यात तुमची शंभू स्तुतीसुमनांनी भरलेली जिभ त्या औरंग्याने कापली.पण आम्ही तथाकथित सुसंस्कृत ,इतिहासप्रेमी,गडसंवर्धक निष्ठूर लोकांनी तुम्हाला आणि तुमच्या कार्याला इतिहासातून आणि “शंभू विचारातून”च कापून टाकले.”
खुप खुप धन्यवाद कविराज, मृत्युच्या छायेत असताना तुमच्या काव्यामुळे, आमच्या शम्भूदेवाला दोन सुख देणारे दोन क्षण नक्कीच मिळाले..
छंदोगामात्य,नमन तुमच्या शिवतेजाला, शिवपराक्रमाला..!
।। कवी कलश यांनी श्रीधर्मवीरगडावर (बहादूरगड) येथे
औरंगजेबा समोर १५ फेब्रुवारी १६८९ रोजी म्हटलेले काव्य ।।
यावन रावन की सभा संभू बंन्ध्यो बजरंग ।
लहू लसत सिंदूर सम खूब खेल्यो रनरंग ।।
ज्यो रबि छबि लखतही नथीत होत बदरंग ।
त्यो तव तेज निहारके तखत त्यजो अवरंग ।।
छंदोगामात्य कवी कलश
अर्थ:
यवनरुपी रावणाच्या (औरंगजेब) सभेत बजरंगाप्रमाणेच संभाजीराजांनाही
बंधनात आणण्यात आले आहे. रणरंग खेळल्यामुळे रक्ताळलेले संभाजीचे अंग
शेंदूर फासलेल्या हनुमंताप्रमाणेच दिसत आहे. आकाशात सूर्योदय झाल्यावर
ज्याप्रमाणे काजवे निस्तेज होतात तदत हे शंभुराजा-
तुझ्या तेजामुळे औरंगजेबाने आपल्या तरस्ताचा त्याग केला आहे.
0
Answer link
छत्रपती संभाजी महाराज यांनी कवी कलश यांना 'कवीश्वर' ही पदवी दिली. कवी कलश हे संभाजी महाराजांचे जवळचे मित्र आणि सल्लागार होते. त्यांना संस्कृत, हिंदी आणि फारसी भाषांचे उत्तम ज्ञान होते.
संदर्भ: