वनस्पतीशास्त्र
झाडे
बागकाम
फुलझाडे
माझ्याकडे जास्वंदाचे झाड आहे, बरेच दिवस झाले त्याला फुले येत नाही, काय करायचे?
2 उत्तरे
2
answers
माझ्याकडे जास्वंदाचे झाड आहे, बरेच दिवस झाले त्याला फुले येत नाही, काय करायचे?
4
Answer link
जास्वंदी ही बहुवर्षीय झुडुपवजा झाड आहे.जास्वंद ही अनेक रंगाची सुंदर फुले देणारी वनस्पती आहे. जास्वंदीच्या फुलांना सुगंध नसतो, तरीही हे झाड बरेच लोकप्रिय आहे. हे फुलझाड सहजपणे अनेक घरांच्या सभोवताली दिसून येते.गणपती अथर्वशीर्षांत वर्णन केलेले फुलाचे वर्णन जास्वंदाशी तंतोतंत जुळते. म्हणूनच कदाचित हे फूल गणपतीला वाहत असतील. जास्वंदाचे फुल गणपतीला अतिशय प्रिय आहे म्हणून भारतात ह्या फुलाला खास स्थान आहे.भारतात हजारो वर्षांपासून जास्वंदाचा अनेक पूजा विधींमध्ये, आयुर्वेद, रंगकाम अशा अनेक गोष्टींमध्ये वापर करण्यात येतो. जास्वंदाला इंग्रजीत shoe flower, chinese rose असे म्हणतात. तर संस्कृतात त्याला ‘जपा’ असे नाव आहे.
जास्वंद हे मलेशियाचे राष्ट्रीय फुल आहे ज्याची घोषणा १९६०मध्ये झाली. तसेच जास्वंद साउथ
कोरिया आणि हैटी य देशांचे सुद्धा राष्ट्रीय फुल आहे.
काही प्रजातीच्या जास्वंदाचा उपयोग नैसर्गिक रंग स्त्रोत म्हणून होतो. जास्वंदीची फुले नजरेत
भरणाऱ्या अनेक रंगामध्ये उपलब्ध आहेत. सफेद, लाल, पिवळा, केशरी,नारिंगी, गुलाबी किंवा
हायब्रीड जांभळी तसेच मिश्र फुले सर्वत्र दिसतात. फुलाचे बाह्यस्वरूप आकर्षक असते. परंतु हे
फूल फार काळ टिकु शकत नाही. सकाळी उमलणारे हे फूल संध्याकाळी मलूल होऊन जाते.
उपयोग:
जास्वंदीच्या फुलांचा उपयोग केस सौन्दर्य वाढवण्यासाठी होतो. जास्वंदीचे रस घातलेले केशतेल
जपाकुसुम म्हणून प्रसिद्ध आहे. शाम्पूमध्ये एक घटक म्हणून जास्वंदीच्या पाना-फुलांच्या
अर्काचा समावेश होतो.जास्वंदाचे फुल, पाने, मुळे सर्वच औषधी आहेत.जास्वंदाच्या फुलांपासून
तयार केलेले तेल केसांच्या वाढीसाठी व केसगळती थांबविण्यासाठी उपयोगी आहे. तसेच या
तेलामुळे डोके थंड होते आणि उत्तम झोप येते.
जास्वंदाचा चहा म्हणून उपयोग केला जातो ज्यामध्ये विटामिन क अधिक प्रमाणात असते.
तसेच ब्लडप्रेशर आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होते.
जास्वंदीच्या फुलांची व पानांची पेस्ट शाम्पू म्हणून वापरली जाते. पानांची पेस्ट गरम करून
फोडांवर किंवा जखमेवर लावली जाते.
इजिप्तमध्ये ते लघवी साफ होण्यासाठी डाययुरेटिक (मूत्रल) म्हणून वापरतात. इराणमधील वैद्य
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी एक घटक म्हणून त्याचा वापर करतात. ही वनस्पती एक सौम्य
रेचक म्हणूनही उपयोगात येते. नायजेरियात पोट साफ करण्यासाठी, तर काही देशांमध्ये चक्क
भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग करतात. अनेक महिला फुलांमधील नानाविध रंग सरबतांसाठी
किंवा जाम-जेलीसारख्या खाद्यपदार्थांमध्येही वापरतात. काही फुलांचा रंग उकळत्या पाण्यात
बाहेर पडतो. मेक्सिकोमध्ये तर जास्वंदीच्या वाळलेल्या फुलांपासून एक चविष्ट खाद्यपदार्थ तयार
केला जातो.
जास्वंदाचा समावेश असलेल्या चहाच्या डिप-डिप पुड्या हा एक फार मोठी जागतिक बाजारपेठ
लाभलेला व्यवसाय आहे. चहाला लालसर किंवा पिवळसर रंग प्राप्त व्हावा म्हणून वेगवेगळ्या
रंगांच्या फुलांचा वापर केला जातो. याचे रंगीत पेय हे शीत किंवा गरम पेय म्हणून वापरता येतं.
या गरम पेयामार्फत सूक्ष्म प्रमाणात लोह, ताम्र, जस्त (झिंक), ब-१, ब-२ आणि क ही जीवनसत्त्त्वे
शरीराला मिळू शकतात. या पेयाच्या सेवनामुळे अपायकारक लो डेन्सिटी कोलेस्टेरॉल कमी होते
आणि हितकारक हाय डेन्सिटी कोलेस्टेरॉल वाढते. तसेच रक्तशर्करा, रक्तदाब नियंत्रणात
राहण्यासाठी मदत होते. हे पेय पाचक आहे. ज्याला तीव्र उदासीनतेची बाधा झाली आहे,
त्यांच्यासाठी जास्वंदयुक्त चहा गुणकारी असल्याचे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत. जास्वंदीच्या
फुलांचे असे काही गुणधर्म आधीपासूनच माहिती झालेले असले, तरी त्यासंबंधीचे सखोल
संशोधन चालूच असते. जास्वंदीमुळे चहाला लाल किंवा पिवळसर रंग येण्याचे कारण म्हणजे
फुलात असलेली फ्ल्याओनाईड, डेल्फिनिडिन, सायनिडिन, अन्थोसायनिंस ही सेंद्रिय द्रव्ये..
शरीरातच तयार होणारी फ्री-रॅडिकलवर्गीय रसायने निष्प्रभ करणे गरजेचे असते. त्याकरिता
हिबिस्कसच्या चहात जे प्रोटोकॅटेचुइक आम्ल असते, ते अॅन्टि-ऑक्सिडन्ट म्हणून उत्तम कार्य
करते.जास्वंदीचे फूल एखाद्या कागदाच्या कपट्यावर चिरडले की लिटमस पेपरचा गुणधर्म
असलेला निळा पेपर तयार होतो. आम्लधर्मी पदार्थात बुडवला की तो लाल होतो.
जास्वंद हे फुल विविध रंगात आणि आकारात आढळते. ह्या झाडाला वर्षभर फुले येत असतात.
जास्वंदीच्या फुलाला बहुधा पाच पाने असतात आणि त्याचा व्यास सुमारे १० सेमी असतो. काही
प्रकारच्या जास्वंदीमध्ये पाकळ्या दुप्पट आणि एकावर एक असतात.
जास्वंदाच्या फुलाचा औषधात वापर केला जातो. केस गळणे बंद व्हावे यासाठी हे फूल अत्यंत गुणकारी असून, अनेक प्रकारच्या तेलांमध्ये याचा वापर केला जातो. जास्वंदाच्या पाकळ्या मांसल असतात. काही भागात सलाड म्हणून त्या खाल्ल्या जातात. या पाकळ्यांचा चहादेखील केला जातो. जास्वंदाचा चहा अत्यंत गुणकारी आहे. त्वचा रोग, केसांचे आरोग्य, तारुण्य टिकवण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी, श्वसनाचे विकार या सगळ्यांत जास्वंदाचे फूल औषध म्हणून वापरले जाते. जास्वंदाच्या पाकळ्या सावलीत वाळवून त्यावरून नैसर्गिक निळा रंग तयार केला जातो. हजारो वर्षांपूर्वी अजिंठा, वेरूळ येथील लेण्यांमध्ये काढलेली चित्रे रंगवण्यासाठी याच जास्वंदाच्या फुलांपासून बनविलेला रंग वापरला गेलाय, तो अजूनही तितकाच ताजा वाटतो. अनेक पुरातन मंदिरे, महाल, राजवाडे यांमधील कलाकुसरीत जास्वंदाच्या फुलाचा रंग वापरला गेला आहे. याच फुलांचा रस काढून त्यात साधा सफेद कागदाचा तुकडा बुडवून वाळवला की झाला आपला ढऌ पेपर तयार! तो तुम्ही आम्लातीत बुडवला तर हिरवा आणि आम्लात बुडवला तर गडद गुलाबी होतो. याच्या गडद रंगामुळे आणि सुंदर रचनेमुळे या झाडांची मंदिरात, शाळा परिसर, उद्यानात शोभेची वनस्पती म्हणून लागवड होते. जास्वंदाला वर्षभर फुले येतात. या फुलांना सुगंध नसतो.
जास्वंदाची पाने गडद हिरव्या रंगाची असून पसरट असतात. पानांचा आकार वेगवेगळा असतो. पानांची कडा दातेरी असते. ही पानेदेखील औषधी असतात. केस मजबूत आणि घनदाट होण्यासाठी वापरली जातात. तसेच पानांचा रस आणि काढा हा अनेक व्याधींवर गुणकारी मानला जातो.
जास्वंदाच्या झाडाची साल आणि मुळेदेखील औषधात वापरली जातात. मधुमेह नियंत्रणात जास्वंदाच्या फुलांच्या वापरावर संशोधन चालू असून त्याचे निकाल सकारात्मक आहेत.
जास्वंदाच्या झाडाला फळे येत नाहीत. फळे नाही त्यामुळे बिया नाहीत. फांद्यांपासून नवीन रोपे तयार करता येतात. जास्वंद अगदी कमी पाण्यात वाढते. गावाकडे घराभोवती तसेच शेताला कुंपण करण्यासाठी याचा वापर केला जातो. अतिशय औषधी असणारी, गणपतीला प्रिय असणारी जास्वंद वनस्पती आपल्या हरित धनात नसेल तर आपल्यासारखे दुर्भागी आपणच. आपण कुंडीमध्येदेखील याची लागवड करू शकतो.
केसगळतीवर गुणकारी जास्वंद
जाणून घ्या केसगळतीवर किफायतशीर असलेल्या जास्वंदाचे , कसे बनवाल घरच्या घरी हेअर पॅक्स....
जर तुम्ही केसगळतीने त्रस्त आहात आणि तुम्हाला नैसर्गिक उपचार पद्धतीने त्यावर मात करायची आहे तर मग ‘जास्वंद’ नक्कीच किफायतशीर आहे.फॉसफरस , कॅल्शियम व व्हिटामिन सी ने समृद्ध जास्वंदाचे फुल तर कॅरोटीन जास्वंदाच्या पानात असल्याने केस गळती , अकाली केस पांढरे होणे , केसातील कोंडा यापासून मुक्ती मिळण्यास मदत होते. रोज जास्वंदाचा वापर केल्यास अधिक लवकर आराम मिळतो.
केसगळतीवर परिणामकारी जास्वंद –
– जास्वंदाची पाने व फुले केसगळतीच्या समस्येवर नैसर्गिकरीत्या परिणामी आहेत.
– जास्वंद केसांची वाढ करतात व टाळूचा रक्तपुरवठा वाढवतात
– जास्वंदातील कॅल्शियम व व्हिटामिन सी मुळे केसांची घट्ट होतात
घरीच बनवा जास्वंदाचा हेअर पॅक
जास्वंद आणि खोबरेल तेल
काही जास्वंदाची फुले कुटून तीळ अथवा खोबऱ्याच्या तेलात घालून मिश्रण एकत्र करा. हे मिश्रण काही तासांसाठी केसांना लावून ठेवा
थंड पाणी व सौम्य शाम्पूने केस धुवा .
जास्वंद आणि ऑलिव तेल
जास्वंदाचा वापर तुम्ही रोज शाम्पू म्हणून करू शकता. जास्वंद, पाणी आणि ऑलिव तेल एकत्र करा तुमचा शाम्पू तयार ! खलबत्यात २-३ जास्वंदाची फुले व पाने घ्या त्यात थोडं ऑलिव तेल व पाणी घालून कुटून घ्या हे मिश्रण १५-२० मिनिट मुळांपासून टोकापर्यंत लावा व नंतर कोमट पाण्याने केस धुऊन टाका.
जास्वंद आणि आवळा
जास्वंद आणि आवळा केसगळती थांबवण्यासाठी अतिशय गुणकारी आहे.कुटलेली जास्वंदाची फुलं आणि आवळा पावडर पाणी घालून एकत्र करा. हे मिश्रण केसांना मूळापासून लावा व पूर्णपणे सुकल्यानंतर ते धुऊन टाका . ही उपचार पद्धती केस गळती पूर्णपणे थांबवून केसांच्या वाढीस मदत होईल.

0
Answer link
जास्वंदाच्या झाडाला फुले येत नसल्यास खालील उपाय करा:
जास्वंदाच्या झाडाला दिवसातील किमान ६ तास सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे ते योग्य ठिकाणी लावा.
जास्वंदाला नियमित खत आणि पाणी द्या.
पाणी देताना माती पूर्णपणे ओले होईल याची काळजी घ्या.
जास्वंदाला फुल येण्यासाठी तुम्ही रासायनिक खतांचा (Chemical fertilizer) वापर करू शकता. 19:19:19 हे खत 15 दिवसातून एकदा झाडाला द्या.
कृषी सेवा
झाडाची नियमित छाटणी करा. छाटणी केल्याने नवीन फांद्या फुटतात आणि त्यावर फुले येतात.
झाडाला कीड लागल्यास त्यावर योग्य कीटकनाशक फवारा.
शक्य असल्यास माती परीक्षण करा आणि मातीमध्ये कोणत्या पोषक तत्वांची कमतरता आहे ते तपासा. त्यानुसार खत टाका.
1. योग्य ठिकाणी लावा:
2. खत आणि पाणी:
3. छाटणी:
4. कीड नियंत्रण:
5. माती परीक्षण: