शब्दाचा अर्थ अर्थ साहित्य

हा सूर्य आणि हा जयद्रथ या उक्तीचा अर्थ काय होतो?

2 उत्तरे
2 answers

हा सूर्य आणि हा जयद्रथ या उक्तीचा अर्थ काय होतो?

5
कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते. अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला; परंतु तेवढ्याच सहजतेने तो बाहेर मात्र पडू शकला नाही. शेवटी त्यातच त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर कौरव सैन्यातील द्वेषाने पछाडलेल्या जयद्रथाने अभिमन्यूच्या मस्तकावर लाथ मारली.

अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याहीपेक्षा त्याला संताप आला, तो जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा! अर्जुनाने तात्काळ प्रतिज्ञा केली, ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन!’ हे ऐकताच कौरवसेना आणि जयद्रथ फारच घाबरले. जयद्रथाला वाचवण्यासाठी कौरवांनी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळत आली, सूर्यास्ताला फारसा अवधी उरला नाही आणि जयद्रथाचा तर कुठे पत्ता नव्हता.

इकडे श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या साहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. अर्जुन अग्नीभक्षण करण्याच्या सिद्धतेला लागला. त्याने लाकडे जमा केली. चिता पेटवली. त्यामुळे कौरवगण त्याची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुनाने धनुष्य-बाण उचलले. नमस्कार केला आणि चितेत उडी घेणार, तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. त्यामुळे सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. ते पाहून कौरव सैन्याचा गोंधळ उडाला. जयद्रथ तर पुरता भांबावून गेला. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ”अर्जुना, पहातोस काय, लाव बाण तुझ्या धनुष्याला! हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ!” कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला.
उत्तर लिहिले · 27/4/2020
कर्म · 55350
0

"हा सूर्य आणि हा जयद्रथ" या उक्तीचा अर्थ खालीलप्रमाणे आहे:

अर्थ:

  • जेव्हा एखादी व्यक्ती मोठ्या आत्मविश्वासाने एखादी गोष्ट करण्याची प्रतिज्ञा करते, विशेषत: एखादे कठीण किंवा अशक्य वाटणारे कार्य पूर्ण करण्याची शपथ घेते, तेव्हा या उक्तीचा उपयोग केला जातो.
  • याचा अर्थ 'मी जे बोलतो ते करून दाखवणारच' असा ठाम निर्धार व्यक्त करणे असा होतो.

स्पष्टीकरण:

  • महाभारताच्या युद्धात अर्जुनाने जयद्रथाला मारण्याची प्रतिज्ञा केली होती आणि तो दिवस मावळण्यापूर्वी जयद्रथाला मारणार, असे आव्हान दिले होते.
  • जर तो मारण्यात अयशस्वी झाला तर स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करेल असे त्याने म्हटले होते.
  • त्यावेळेस, "हा सूर्य आणि हा जयद्रथ" म्हणजे "सूर्य मावळण्यापूर्वी मी जयद्रथाला मारणारच" अशा अर्थाने अर्जुन बोलला होता.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 3260

Related Questions

SWP साठी सर्वात चांगले फंड कोणते?
मी एचडीएफसीचा कर्जदार होतो, शेतीवर कर्ज घेतले होते पण मी ते सेटलमेंट केले. तर मला दुसरी बँक कर्ज देत नाही, काही पर्याय?
बजाज फायनान्स तीन लाख रुपये लोन देत आहे आणि त्याचे हप्ते हजार रुपये आणि ईएमआय मध्ये कपात अशी जाहिरात आहे, हे खरे आहे का?
सिप कोणत्या कोणत्या बँकेत सुविधा असते?
प्रॉपर्टीवर वार्षिक हप्ता लोन कोणती बँक देते?
एसआयपी मध्ये दरवर्षी पैसे ॲड करता येतात का?
मी एका खाजगी कंपनीत नोकरी करतो, मला 20000/- रुपये पगार मिळतो. माझ्याकडे 90 गुंठे शेतजमीन आहे, त्यावर मला बँकेचे कर्ज घ्यायचे आहे. मला जास्तीत जास्त किती कर्ज मिळू शकेल? कृपया मार्गदर्शन करावे.