प्रवास सागरी इतिहास इतिहास

टायटॉनिक जहाजाबद्दल माहिती मिळेल का ?

2 उत्तरे
2 answers

टायटॉनिक जहाजाबद्दल माहिती मिळेल का ?

5
टायटानिक जहाज म्हणजे आजही जगासाठी कुतुहलाचा विषय आहे. टायटानिक जहाजाबद्दल अनेक अभ्यासक आजही कित्येक वर्षानंतर अभ्यास करत आहे, ते कसे बुडाले यावर ते अजूनही एकमत होत नाहीये, असो आज आम्ही देखील तुम्हाला टायटानिक जहाजाबद्दल अश्याच काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या आजही कित्येकांसाठी अज्ञातच आहेत.





१. टायटानिक त्याच्या काळातील सर्वात महागडे आणि भव्य जहाज होते. हे जहाज इंग्लंडच्या साउथंप्टन पासून न्यूयॉर्क पर्यंत प्रवासाला निघाला होता. टायटानिक खूप मजबूत होते आणि त्यामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने खूप उपाय केले होते,असे असून सुद्धा ते आपल्या पहिल्याच यात्रेत एका बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागून बुडाले.



२. हा अपघात १४ एप्रिल १९१२ च्या रात्री ११:४० वाजता झाली होता आणि २:२० वाजता पूर्ण जजहाजाला जलसमाधी मिळाली.



३. समुद्री इतिहासातील सर्वात दु:खद घटना टायटानिकच्या या अपघातात १५१७ लोक मारले गेले होते.



४. बर्फाचा तुकड्याला ज्या क्षणी टायटानिक धडकले , त्या आधी फक्त ३० सेकंद पूर्वी तो बर्फाचा तुकडा दिसला असता तर जहाजाची दिशा बदलली जाऊ शकली असती आणि हा भीषण अपघात टाळता आला असता.



५. टायटानिक जहाजात धूर बाहेर जाण्यासाठी ४ स्मोकस्टेक्स लागले होते. हे टायटानिकच्या फोटोंचा अविभाज्य भाग राहिले आहेत. परंतु त्यातील एक केवळ डेकोरेटीव पीस होता, तो काम करत नसे. त्याला फक्त सजावटीसाठी लावण्यात आले होते.




६. त्या भयानक रात्री अटलांटिक महासागरात कॅलिफोर्नीयम नावाचे अजून एक जहाज होते, ते टायटानिक पासून जास्त दूर पण नव्हते, परंतु त्याला सूचना मिळायला वेळ लागला, त्यामुळे त्याला तिथे पोहचायला उशीर झाला आणि ते टायटानिक मधील जास्त प्रवाशांना वाचवू शकले नाही.



७. टायटानिकचा अपघात होण्याच्या एक दिवस आधी लाइफबोट ड्रिलचा सराव होणार होता, पण शेवटच्या क्षणाला हा सराव रद्द करण्यात आला. जर ही ड्रिल झाली असती, तर अपघाताच्या वेळी लाइफबोट्सचे व्यवस्थापन चांगल्याप्रकारे करण्यात आले असते.



८. टायटानिक चित्रपटात दाखवलेल्या सर्वात भावूक भागामध्ये जहाजाची जेव्हा बर्फाच्या तुकड्याला टक्कर लागल्यानंतरही म्युझिक बँडचे सदस्य गातच असतात. खऱ्या अपघातावेळी ही असेच झाले होते.



९. अपघातानंतर खूप प्रवासी लाइफबोटच्या सहाय्याने आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले, पण अजूनही लोकांचे जीव वाचले असते कारण लाइफबोट मध्ये त्याच्या क्षमतेपेक्षा कमी माणसे बसली होती.



१०. हे तर खूप मनोरंजक सत्य आहे की, खऱ्या टायटानिकला बनवण्यासाठी जेवढा खर्च झाला होता त्यापेक्षा जास्त खर्च कॅमरूनचा ‘टायटानिक’ चित्रपट बनवण्यात झाला.





११. टायटानिकला संपवणारा बर्फाचा तुकडा अपघात होण्यापूर्वी २९०० वर्षापासून त्या ठिकाणी  होता.



१२. जगाच्या इतिहासातील बर्फाच्या तुकड्याला धक्का लागून जलसमाधी मिळालेले टायटानिक हे एकमात्र मोठे जहाज आहे.



१३. टायटानिक मध्ये अशी १३ जोडपी होती जी आपला हनीमून साजरा करण्यासाठी आली होती.



१४. टायटानिक जहाजाला रोज ८०० टन कोळशाचे इंधन लागत होते.



१५. टायटानिक मध्ये लावलेल्या शिट्टीचा आवाज ११ मैलांपर्यंत जायचा.



​१६. टायटानिक जहाजाचे कॅप्टन स्मिथ ह्या यात्रेनंतर निवृत्ती घेण्याच्या तयारीत होते, परंतु दुर्दैवाने हा प्रवास त्यांच्या जीवनातील शेवटचा प्रवास ठरला.



१७. टायटानिक जहाजात ९०० टन वजनाच्या बॅगा आणि बाकी माल ठेवला होता.



१८. टायटानिक जहाजावर दैनंदिन १४००० गॅलन पाणी वापरले जात असे.



१९. जहाजातील १६ लाइफबोट वापरण्यासाठी जवळपास ८० मिनिट लागले. पहिल्या लाइफबोटमध्ये फक्त २८ लोक बसले होते कारण बाकी लोकांना वाटलेच नाही की टायटानिक बुडेल.



२०. टायटानिक जेव्हा बुडाले तेव्हा ते आपल्या प्रवासाच्या चौथ्या दिवसात होते आणि जमिनीपासून जवळपास ६०० किलोमीटर लांब होते. टायटानिकला त्या बर्फाच्या तुकड्याचा धक्का लागण्याअपूर्वी सहा वेळा सावधानीच इशारा देण्यात आला होता.






कसं बुडालं टायटॅनिक?

ती रात्र.. त्या रात्री आपल्या समोर काय वाढून ठेवलंय याची काळालाच नाही, तर त्या अथांग महासागरालाही कल्पना नव्हती... 14 एप्रिलला रात्री 11 वाजून 40 मिनिटांनी टायटॅनिकच्या कॅप्टन्सनी हिमनगाची धडक चुकवली खरी, पण त्यांना जहाजाला वाचवता आलं नाही.... चार दिवसांच्या प्रवासात टायटॅनिकला सातत्यानं हिमनगाबाबत इशारे मिळत होते. मात्र त्याचं गांभीर्यच जहाजावरील अधिका-यांच्या लक्षात आलं नाही. अधिका-यांच्या या चुकीमुळेच टायटॅनिक नावाचा काळा इतिहास निर्माण झाला....



न्यूयॉर्कचा किनारा 400 मैल दूर असताना टेहळणी पथकाला जहाजाच्या सरळ रेषेतच हिमनग आढळल्यानंतर ड्युटी ऑफिसरनं टायटॅनिक तत्काळ डावीकडे वळवण्याचे आदेश दिले....बरेच प्रयत्न करून जहाजाची दिशाही बदलली आणि जहाजाची हिमनगाशी सरळ धडक टाळण्यात यश मिळालं. मात्र टायटॅनिकच्या उजव्या बाजूचा, पाण्याखाली 20 फूट खोलीवर असणारा भाग हिमनगावर घासला गेलाच. आणि या भागात झालेल्या भेगांमधून वेगानं पाणी आत शिरू लागलं.



आणि इथूनच सुरू झाला समुद्रातला थरार... टायटॅनिकचे तळमजले हळूहळू पाण्यानं भरत होते तसतसा जहाजावर गोंधळ, भीती आणि आक्रोश वाढत होता.... काही वेळातच टायटॅनिकच्या कॅप्टन्सना जहाज वाचू शकणार नसल्याची संपूर्ण कल्पना आली होती. त्यामुळे प्रवाशांना लाइफ बोटींच्या सहाय्यानं बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले..... पण जहाजात होते त्यापैकी निम्मेच प्रवासी सामावून घेता येतील, इतक्याच लाईफ बोटी त्यावेळी उपलब्ध होत्या. आणि त्यातही टायटॅनिकच्या कर्मचारी वर्गानं प्रथम दर्जाच्या लोकांना आणि प्रामुख्यानं स्त्रिया आणि मुलांना प्राधान्य देण्याची भूमिका घेतल्यानं, सुरूवातीच्या काही लाईफ बोटी पूर्णपणे न भरताच सोडण्यात आल्या..... अशा बेजबाबदार आणि दुजाभावाच्या वागणुकीमुळे केवळ 706 प्रवाशांचे प्राण वाचवता आले. इतर प्रवासी जीव वाचवण्यासाठी धडपडत होते. जहाजावर प्रचंड गोंधळ माजला होता. त्याचवेळी टायटॅनिकचे दोन तुकडे झाले आणि प्रचंड हाहा:कार उडाला. काही प्रवाशांनी भीतीनं अटलांटिक महासागरातच उड्या घेतल्या.... महासागराचं तापमान त्यावेळी उणे दोन अंश सेल्सिअस इतकं होतं. त्यामुळे साधारण पंधरा मिनिटांतच पाण्यात उड्या घेतलेल्या प्रवाशांचाही गारठून मृत्यू झाला.... केवळ अडीच-तीन तासात होत्याचं नव्हतं झांलं..... उरल्या होत्या फक्त वेदना आणि कटू आठवणी..... आणि मनात सलत राहिला तो एकच प्रश्न, का झाला हा अपघात  ?


15 एप्रिल 1912 ची ती घटना.. आज वर्षामागून वर्षे लोटली जातायत.. पण शतकापूर्वीची ती घटना आजही विसरता येत नाही..ती केवळ एका जहाजाची दुर्घटना नव्हती, ती होती कधीही न विसरल्या जाणा-या महाविध्वंसाची आठवण... आजही त्या घटनेनं काळजाचा थरकाप उडतो.... अटलांटिक महासागरामध्ये हजारो प्रवाशांना त्या काळरात्री जलसमाधी मिळाली.... अनेकांची स्वप्नं, इच्छा-आकांक्षाही महासागरात निद्रिस्त झाल्या... टायटॅनिक या सर्वात महाकाय आणि अत्यंत देखण्या जहाजाला शंभर वर्षांपूर्वी जलसमाधी मिळाली. या आलिशान जहाजावर तीन दिवस सागरी सफरीचा मनमुराद आनंद लुटणा-या दीड हजार प्रवाशांवर काळानं झडप घातली. आणि त्यासोबत एक सुंदर स्वप्नही पाण्याखाली गेलं. ते स्वप्न होतं कधीही न बुडणा-या जहाजाचं...



इंग्लंडमधील साऊथहॅप्टनमधून हे जहाज आपल्या पहिल्याच सफरीवर न्यूयॉर्कला निघालं होतं. मजल दरमजल करत डौलांनं हे जहाज आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यासाठी पाणी कापत निघालं होतं... सगळं काही आलबेल आहे असं वाटत असतानाच, 14 एप्रिलच्या त्या दुर्दैवी रात्री न्यूयॉर्कला पोहोचण्याआधीच काळच हिमनगाच्या रुपानं आडवा आला आणि तो महाभयंकर अपघात झाला. कधीही न बुडणारं जहाज असा दावा ज्याच्याबाबतीत केला जात होता, त्या टायटॅनिकच्या पहिल्याच प्रवासात ठिक-या ठिक-या झाल्या... जहाजाला जलसमाधी मिळून आता शंभर वर्षे पूर्ण झाली असली, तरीही टायटॅनिकनं आपल्या अस्तित्वाचं कुतूहल मात्र कायम राखलंय. ते गूढ अजूनही संपत नाही... काळाच्या लाटा वर्तमानाला पुढे लोटत
उत्तर लिहिले · 16/4/2020
कर्म · 55350
0

टायटॅनिक जहाज: एक संक्षिप्त माहिती

टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते, जे 1912 मध्ये अटलांटिक महासागरात बुडाले.

इतिहास:

  • टायटॅनिक हे व्हाईट स्टार लाईन कंपनीने बांधले होते.
  • 10 एप्रिल 1912 रोजी साउथॅम्प्टन ( Southampton ) मधून न्यूयॉर्क शहराकडे ( New York City ) प्रवासाला निघाले.
  • 14 एप्रिल 1912 रोजी रात्री 11:40 वाजता एका हिमखंडाला ( iceberg ) धडकले.
  • दोन तासांपेक्षा कमी वेळात, 15 एप्रिल रोजी 2:20 वाजता जहाज पूर्णपणे बुडाले.

आकड्यांमधील माहिती:

  • जहाजाची लांबी: 882.5 फूट (269 मीटर)
  • रुंदी: 92.5 फूट (28 मीटर)
  • वजन: 46,328 टन
  • प्रवाशांची क्षमता: 2,435
  • खलाशी दल: 892

बुडण्याचे कारण:

  • जहाजाची जास्त गती.
  • समुद्रातील बर्फाचा वेळेत अंदाज न येणे.
  • पुरेशी सुरक्षा उपकरणे (lifeboats) उपलब्ध नसणे.

टायटॅनिकच्या दुर्घटनेत 1,500 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला. ही घटना जगातील सर्वात मोठ्या सागरी दुर्घटनांपैकी एक मानली जाते.

अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

टायटॅनिक जहाजाबद्दल माहिती मिळेल का?
टायटॅनिक जहाज कोणी बनवले?