2 उत्तरे
2 answers

धोडप किल्ल्याची माहिती द्या?

2
नाशिक -धोड़प किल्ला ♏
__________________________
धोडप उर्फ धारपवणिक हा किल्ला त्यावरील टकी व खोदीव गुहा पाहाता पूरातन किल्ला आहे. याचा उल्लेख मात्र प्रथम १६ व्या शतकात धरब या नावाने येतो, तेंव्हा हा किल्ला नगरच्या निजामशहाकडे होता.

निजामशाही नष्ट करण्यासाठी आलेल्या मुघलांच्या सरदार अलावर्दीखानाने निजामच्या किल्लेदाराला १ लाख रुपयाच्या मनसबीची लालूच दाखवून १९ जून १६२६ मध्ये किल्ला ताब्यात घेतला. इ.स. १६७०-७१ मध्ये शिवाजी महाराजांच्या सैन्याने धोडप किल्ल्याला वेढा घातला, पण त्यांना किल्ला घेता आला नाही.
नानासाहेब पेशवे व हैद्राबादचा निजाम यांच्यात झालेल्या भालकीच्या तहाप्रमाणे धोडप किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यानंतर त्याचा वापर मुख्यत: तुरुंग म्हणून झाला. इ.स. १६७८ मध्ये माधवराव पेशव्यां विरुध्द बंड केलेल्या राघोबांनी (रघुनाथराव पेशवे) धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी आश्रय घेतल्याचे कळल्यावर माधवराव पेशव्यांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यावेळी राघोबांच्या सैन्याने किल्ल्यावर पळ काढला व मोठी लुट माधवराव पेशव्यांना मिळाली. इ.स. १८१८ मध्ये धोडप किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.

0

धोडप किल्ला:

धोडप किल्ला हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात অবস্থিত आहे. हा किल्ला नाशिक शहरापासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर आहे.

किल्ल्याची माहिती:

  • धोडप किल्ला हा सह्याद्री पर्वतरांगेत असून त्याची उंची सुमारे 3,400 फूट आहे.
  • हा किल्ला historicalતિહાસિકदृष्ट्या महत्त्वाचा असून तो मराठा साम्राज्याचा एक भाग होता.
  • किल्ल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत आणि काही ठिकाणी चढाई पण करावी लागते.
  • किल्ल्यावरून आसपासच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते.

जवळपासची ठिकाणे:

  • सप्तशृंगी गड: हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र धोडप किल्ल्याच्या जवळ आहे.
  • चांदवड: येथे Renukaदेवीचे मंदिर आहे, जे धोडपच्या जवळच आहे.

कसे पोहोचावे:

नाशिकपासून चांदवडमार्गे धोडप गावात पोहोचता येते.private vehicles आणि state transport च्या buses उपलब्ध आहेत.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1480

Related Questions

शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
पट्टा किल्ल्याबद्दल माहिती द्यावी?
मुंबईच्या किल्ल्यांची माहिती द्या?
दातेगडाबद्दल माहिती द्या?
महाराष्ट्र मध्ये किती किल्ले आहेत?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात किती किल्ले आहेत?
रायगडावरील एक टोक?