2 उत्तरे
2
answers
दाभाडे घराण्याबद्दल माहिती मिळेल का?
1
Answer link
*⚔️ कटयारीचा मान मिळालेले -दाभाडे घराणे*

————————————————
★माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव कोल्हापूर★
————————————————
मराठी अंमलात या घराण्यातील पुरूषांनी पराक्रम दाखवून सन्माननीय पदे मिळविली. या घराण्याचा मूळ पुरूष बजाजी हा पुण्याजवळील तळेगावचा पाटील होते.
कट्यारीचा मान मिळालेले श्रीमंत दाभाडे घराणे आज एकविसाव्या शतकात देखील काळाबरोबर धावताना,पारंपारिक रूढी,परंपरा जपताना दिसतात. https://bit.ly/42BbO1a स्वराज्याचे शिलेदार सरसेनापती दाभाडे घराण्याचे वारसदार शिवकालीन शस्त्राचा अनमोल खजिना जतन करीत आहेत.

दाभाडे घराण्याचे मूळ शस्त्र कट्यार,धोप तलवार,भाले,चंद्रकोर तलवारीचा समावेश आहे.तळेगाव येथील अनेक वास्तू आणि वस्तू दाभाडे दाम्पत्याच्या पराक्रमाची साक्ष देत आजही उभ्या आहेत.तसेच,त्यांनी वापरलेली शस्त्रेसुद्धा आहेत.शस्त्र जेवढे जुने,तेवढा मोठा त्याचा इतिहास.दाभाडे घराण्याचा मान असणार्या कट्यारीचा इतिहाससुद्धा तेवढाच कर्तृत्वाचा आणि पराक्रमाचा.. छ.शिवराय हे एकदा मावळात असताना शिकारीवर गेले.त्यात खंडेराव यांचे वडील,तथा तळेगाव चे पाटील येसाजीराव बजाजीराव दाभाडे हे महाराजांसोबत होते.शिकार करताना महाराजांचे लक्ष विचलित झाले आणि तेवढ्यात एक रानडुक्कर महाराजांकडे झेपावताना येसाजीरावांना दिसले.क्षणाचाही विलंब न करता त्यांनी जवळ असलेल्या कट्यारीने डुकराच्या मानेवर वार करून त्याला ठार केले.हे धाडस पाहून महाराजांनी येसाजीरावांना आपल्या अंगरक्षक तुकडीमध्ये स्थान दिले.त्याचवेळेस,कट्यार हे दाभाडे घराण्याचे मूळ शस्त्र म्हणून राजमान्यता मिळाली.𝔐𝔞𝔥𝔦𝔱𝔦 𝔰𝔢𝔳𝔞 𝔤𝔯𝔬𝔲𝔭 𝔭𝔢𝔱𝔥𝔳𝔞𝔡𝔤𝔞𝔬𝔫त्याचबरोबर,महाराज सिद्दी जोहर च्या वेढ्यातून विशाळगडकडे जाताना मोजक्या मावळ्यांच्या तुकडीमध्ये सुद्धा येसाजीराव दाभाडे यांचा समावेश होता. दाभाडे घराण्याकडे इ.स. १६९० पासून आलेली एकमेव मराठेशाही धोप तलवार आजही पाहायला मिळते.छ.शिवरायांनी रचना केलेली अस्सल मराठा तलवार आणि सध्या लंडन येथे असणारी शिवरायांची तलवार या दोहोंच्याही पात्याचे निर्मिती केंद्र हे स्पेनमधील टोलेडो हेच होय.तसे ठसेसुद्धा त्या तलवारीवर आहेत.अठरा धातूंची,५० इंच लांब,दुधारी तलवार मराठेशाही शस्त्ररचनेचा अप्रतिम नमुनाच म्हणावा लागेल.याच तलवारीच्या जोरावर उमाबाई दाभाडे यांनी इ.स.१७३२ च्या जोरावर खान सोबत अहमदाबाद येथे झालेल्या लढाईत विजय मिळवला. तसेच,शिवकालीन भाले,गजवदनाची मुठ असलेली गुप्ती याप्रकारची अनेक शस्त्रे त्यांच्या पुण्यातील घरी पाहायला मिळतात.खंडेनवमीच्या मुहूर्तावर या शस्त्रांचे यथासांग पूजन केले जाते. पराक्रमाच्या अखंड परंपरेस मानाचा मुजराhttps://whatsapp.com/channel/0029VaPJhXL84Om4z32l8I24
0
Answer link
दाभाडे घराणे: इतिहास आणि माहिती
दाभाडे हे मराठा साम्राज्यातील एक महत्त्वाचे घराणे होते. त्यांनी मराठा साम्राज्यात सेनापती म्हणून मोठी कामगिरी केली.
- सुरुवात: दाभाडे घराण्याची सुरुवात तळगाव दाभाडे (पुणे जिल्हा) येथे झाली. हे घराणे मूळतः देशमुख होते.
- महत्त्वाचे सदस्य:
- सरदार यशवंतराव दाभाडे: हे दाभाडे घराण्याचे पहिले प्रसिद्ध व्यक्ती होते. त्यांनी मराठा सैन्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
- सेनापती त्रिंबकराव दाभाडे: ते यशवंतराव दाभाडे यांचे पुत्र होते आणि त्यांनी देखील मराठा साम्राज्यात मोठी सेवा केली.
- योगदान: दाभाडे घराण्याने मराठा साम्राज्याच्या विस्तारात आणि संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांनी अनेक लढायांमध्ये भाग घेतला आणि यश मिळवले.
- राज्य आणि जहागिरी: दाभाडे घराण्याला गुजरातमध्ये जहागिरी मिळाली होती, ज्यामुळे त्यांचे महत्त्व आणखी वाढले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: