2 उत्तरे
2
answers
राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना कोणी केली?
0
Answer link
राष्ट्रकूट हा शब्द राष्ट्रिक उर्फ रठ्ठ यांचा कूट म्हणजे संघ या अथानें उत्पन्न झाला असावा. कारण महाराष्ट्रांत या रठ्ठांची लहान लहान राज्यें पूर्वीपासून होतीं, तींच पुढें एकत्र होऊन एक मोठें राज्य झालें असावें. यांच्याबद्दल पुष्कळशी माहिती फ्लीट यानें प्रसिद्ध केली आहे. डॉ. बजेंस, डॉ. बुल्हर, डॉ. भांडारकर व रा. शं. पा पंडित यांनीहि या घराण्याबद्दल बरीच माहिती प्रसिद्ध केली आहे. राष्ट्रकूट हे प्रथम उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरेकडून आले व त्यांनी सातव्या शतकाच्या उत्तरार्धांत मुंबई इलाख्यांतील हल्लींच्या कानडा जिल्ह्यावर त्यावेळी राज्य करीत असलेल्या प्राचीन चालुक्य घराण्याचा पराभव करून आपली सत्ता स्थापन केली. तिकडे जाण्यापूर्वी वर्हाडवर यांची सत्ता स. २३६-५५० पर्यंत असावी असा स्मिथचा तर्क आहे.
या घराण्याचा मूळपुरूष दंतिवर्मा पहिला हा होय. त्याचा पुत्र पहिला इंद्र व त्याचा पुत्र गोविंद पहिला (सुमारें स.६६०) होय; हा पराक्रमी होता. त्याचा पुत्र कर्क किंवा कक्क पहिला हा वैदिक धर्माचा विशेष अभिमानी होता (६८५), त्यामुळें त्याच्या कारकीर्दीत ब्राह्मणांनी यज्ञयाग वगैरे पुष्कळ केले. त्याचा पुत्र इंद्र दुसरा (७१०) यानें चालुक्य राजकन्येशीं लग्न केलें. दंतिदुर्ग वीरमेघ (दंतवर्मा दुसरा) हा फार शूर होता. यानेंच त्या वेळेचा पश्चिम चालुक्यराज कीर्तिवर्मा यास जिंकून चालुक्य साम्राज्य शेवटास नेलें (७५०) व सर्व महाराष्ट्र आपल्या अमलाखाली आणलें. पल्लव व चालुक्य यांच्या नेहमी लढाया होत, त्यामुळें ते दोघेहि हतबल झाले होते; त्याचा फायदा दंतिदुर्गानें घेऊन चालुक्यांप्रमाणेंच पल्लवांवरहि स्वारी करून व त्यांचे राज्य मोडून कांची शहर हस्तगत केले (७५४) बदामी ही (चालुक्यांची) राजधानी पल्लवांच्या सरहद्दीजवळ असल्यामुळें त्यांच्या तिच्यावर नेहमीं स्वार्या होत म्हणून दंतिदुर्गानें ती मोडून तिच्याऐवजी नाशिककडे मयूरखंडी ही राजधानी केली. पुढें शर्व उर्फ अमोघवर्ष पहिला यानें मयूरखंडीबद्दल मान्यखेट (हल्लींचे निजाम राज्यांतील मलखेड) ही नवीन राजधानी स्थापिली. दंतिदुर्गानें गंगाराजांनां जिंकून आपले मांडलिक बनविले आणि पाण्डय राजांनांहि थोपवून धरलें; त्यामुळें चोलांचा व त्याचा संबंध आला आणि त्यांच्यामध्यें लढाया सुरू झाल्या, त्या तिसर्या कृष्णराजापर्यंत चालू होत्या. त्यानें मात्र चोलांचा सपशेल पराभव केला. या लढाया १२ वर्षांत १०८ झाल्या असें एके ठिकाणी म्हटलें आहे. याप्रमाणें दंतिदुर्गानें महाराष्ट्र व त्याचा दक्षिण आणि आग्नेय प्रदेश आपल्या ताब्यांत आणला. या भागांत बलिष्ठ राज्यें नव्हतीं व जी मध्यम दर्जाची होतीं तीं आपसांत भांडत होतीं, त्याचा फायदा दंतिदुर्गानें घेतला.
दंतिदुर्गाच्या मागें त्याचा चुलता कृष्ण पहिला हा अकालवर्ष वल्लभ शुभतुंग हें बिरूद धारण करून गादीवर बसला (७५६). यानें आपल्या पुतण्याचें उरलेलें काम पुरें पाडलें. यानें चालुक्यांनां अगदी नामशेष केलें. वेरूळ येथील कैलास नांवाचे अप्रतिम लेणें यानेंच कोरविलें; असलें सुंदर व प्रचंड काम पृथ्वीवर अन्यत्र नाही. त्याच्या पश्चात त्याचा थोरला मुलगा गोविंद दुसरा यानें ७६५ पर्यंत राज्य केलें. त्यावेळीं त्याला त्याचा धाकटा भाऊ ध्रुव (धोंर) यानें पदच्युत करून व स्वत:स धारावर्ष, निरूपम, कलिवल्लभ हीं बिरूदें धारण करून गादी बळकावली. हा विशेष पराक्रमी होता; त्यानें दक्षिण व उत्तरेकडे स्वार्या करून पल्लव, चोल वगैरे बर्याच लहान सहान राजांना जिंकून आपले राज्य वाढविलें (७७०). याचा पुत्र गोविंद तिसरा हा या राष्ट्रकूटवंशांत सर्वांत शूर व प्रख्यात राजा झाला (८०३). यानें उत्तरेंत व दक्षिणेंत अनेक स्वार्या करून आणि बारा राजांनां जिंकून आपलें साम्राज्य पुष्कळच वाढविले; माळव्यापासून कांचीपर्यंत तें पसरलें होतें. त्यानें आपणास प्रभूतवर्ष, जगत्तुंग व वल्लभनरेंद्र हीं सम्राटदर्शक बिरूदें लाविली होती. यानें गुजराथच्या राष्ट्रकूट घराण्याकडून गुजराथ घेऊन वल्लभी राजांच्या गोध्रा प्रांतापर्यंत आपली हद्द सरकविली व पुढें थोडयाच वर्षांनीं वल्लभी घराणें नष्ट झाल्यावर साबरमतीपर्यंतचा प्रदेश आपल्या राज्यात जोडला. कांही अरबी प्रवाश्यांच्या लेखांवरून सिंधच्या हद्दीपर्यंत याचें राज्य होते असें दिसतें. पण पुढें ही सत्ता टिकली नाहीं. विंध्याच्या पलीकडील मारावशर्वराजाहि त्याचा मांडलिक होता. पल्लवांनां त्यानें नामशेष केलें होतें. त्याचा धाकटा भाऊ इंद्र तिसरा यानें अनहिलवाडच्या चावडांपासून लाट देश जिंकून तेथें राष्ट्रकूट घराण्याची एक स्वतंत्र शाखा स्थापन केली (८१०). लाट म्हणजे मही व तापी-दुआब होय. गोविंदाचा पुत्र शर्व उर्फ नृपत्तुंग महाराज राजेश्वर अमोघवर्ष पहिला यानें कान्हेरी येथील लेणी कोरविलीं, त्यांत त्याचें नांव आहे. त्याची भक्ति जैनधर्माच्या दिगंबर-पंथावर होती व त्याचा गुरूहि जिनसेन नांवाचा जैन होता. जिनेसनाच्या गुणभद्र नांवाच्या शिष्यानें रचलेल्या उत्तरपुराणांत अमोघवर्षोचा उल्लेख आहे (८७८). याची कारकीर्द पुष्कळ मोठी (६२ वर्ष) झाली. अंग, वंग, मगध, मालव, वेंगी, विंगवेल्ली येथील राजांनी याचें मित्रत्व जोडलें. याचा पुत्र कृष्ण दुसरा उर्फ अकालवर्ष शुभतुंग हा राजा असतां, धारवाड व सौंदत्ती वगैरे भागांत जैनांनीं मंदिरें बांधली (९११). त्यानें मद्रासजवळील चिंगलपट, तंजावर, कांची वगैरे स्थळें घेतल्याचें आढळतें. कलिंग व मगध आणि गुर्जर, लाट व गौड राजे यांनां यानें जिकलें. त्रिपूरच्या कळूचुरी कोक्कल राजाची मुलगी महादेवी ही याची राणी होती. गुणभद्राचें उत्तरपुराण याच्या कारकीर्दीत संपले (८९८).
यापुढील कांही पुरूषांची माहिती फारशी आढळत नाही. अकालवर्षाचा पुत्र जगत्तुंग दुसरा यानें आपल्या लक्ष्मी नावांच्या (कोक्कलची नात) मामेबहिणीशी लग्न केलें. त्याला लक्ष्मी व गोविंदांबा या राण्यांपासून इंद्र चवथा आणि कृष्ण तिसरा व अमोघवर्ष दुसरा अशीं तीन मुलें झाली. बापाच्यानंतर प्रथम इंद्र हा नित्यवर्ष ही पदवी घेऊन गादीवर बसला. याची राणीहि कोक्कलच्या घराण्यांतीलच विजयांबा नांवाची होती. तिच्यापासून झालेला गोविंद चवथा हा पुत्र इंद्राच्या मागून गादीवर आला; याला नृपत्तुंग सुवर्णवर्ष व वल्लभनरेंद्र अशा पदव्या होत्या (९३३). हा वाईट मार्गांला लागून लवकर मेल्यानें याच्या पश्चात याचा दुसरा चुलता कृष्ण तिसरा हा राजा झाला. याच्या व अनहिलवाडच्या चालुक्य घराण्याचा संस्थापक मूळराज यांच्या नेहमीं लढाया चालत यावेळी राष्ट्रकूटांची हद्द महीपर्यंत मागें हटली असावी. त्याच्या मागून त्याचा धाकटा भाऊ अमोघवर्ष दुसरा ऊर्फ वद्दिग हा राजा झाला. यानेंहि त्रिपूरच्या कोक्कल कलचूरी घराण्यांतीलच कुंदक देवीबरोबर लग्न केलें. याचा मुलगा खोट्टीग उर्फ नित्यवर्ष दुसरा हा पुढें गादीवर आला आणि त्याच्यानंतर त्याचा धाकटा भाऊ कृष्ण चवथा उर्फ कन्नर, निरुपम अकालवर्ष हा राजा झाला (९४५). याचा मुलगा नृपत्तुंग कक्क तिसरा उर्फ कक्कल, अमोघवर्ष वल्लभनरेंद्र हा या घराण्यांतील विसावा व शेवटचा राजा होय. याची मुलगी जोव्रब्ब उर्फ जाकला देवी ही पश्चिम चालुक्यराज तैल दुसरा यास दिली होती. याच तैलपानें सासर्यावर स्वारी करून त्याचें राज्य बुडविलें (९७३). माळव्याचा हर्ष परमार व मुंज परमार यांनी राष्ट्रकूट राजे दुर्बल झाल्यामुळे त्यांच्या राज्यावर स्वार्या केल्या त्यामुळें जास्तच अव्यवस्था माजली. दक्षिणेंत चोल व गंग यांनींहि बंडे उभारली. याचा फायदा घेऊन व पूर्वींचें वंशवैर आठवून तैलपानें कक्कल राष्ट्रकूटांचें साम्राज्य खालसा करून आपलें चालुक्य-साम्राज्य स्थापन केलें. याप्रमाणे राष्ट्रकूटांचे राज्य महाराष्ट्रावर सव्वा दोनशें वर्षे (७५०-९७३) चाललें होतें. यानंतरहि नागपूरकडे १०८७ पर्यंत चालुक्यांचें मांडलिक म्हणून राष्ट्रकूटांचे एक राज्य होतें असें सीताबडीच्या शिलालेखावरून दिसतें. तेथें याच सुमारास धाडीभंडक उर्फ धाडीअदेव हा राजा होता.
राष्ट्रकूट राजे फार प्रबळ व श्रीमंत आणि भाग्यशाली होते. त्यांच्या वेळीं कोरल्या गेलेल्या वेरूळच्या लेण्यारून याची उत्तम साक्ष पटेल. बौद्ध भिक्षूंसाठी लेणी कोरण्याची रीत मागें पडून यांच्या कारकीर्दीत हिंदु देवतांची मंदिरे व लेणी कोरण्यांत येऊं लागली. तेव्हांपासून शंकर, विष्णू यांचे महत्त्व सुरू होऊन ते उत्तरोत्तर वाढून त्यामुळें अनेक पंथ उद्भवले. आद्य शेकराचार्यांचा जन्म यांच्याच राजवटींत झाला. त्यानी बौद्धधर्माचा पाडाव केला; तरी पण जैनांचें संपूर्ण महत्त्व नाहीसें झालें नाहीं. राष्ट्रकूटांच्या साम्राज्यांत कित्येक मांडलिक आणि कांही वैश्य गृहस्थ दिगंबर जैन होते. राष्ट्रकूटांच्या आश्रयाखाली अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले गेले. मात्र या वेळेचें संस्कृत वाङ्मय कृत्रिम, विचित्र व बोजड दिसतें. हलायुधाचें कविरहस्य, त्रिविक्रमभट्टाचें नलचंपू व मदालसाचंपू वगैरे ग्रंथ या वेळचेच आहेत. राष्ट्रकूटांचे एक राजचिन्ह गंगायमुना या नद्यांचें चित्र होतें तें प्रथम गुप्तांचें होतें, मग चालुक्यांचें आणि नंतर राष्ट्रकूटांचे झालें असे फ्लीट म्हणतो. यांच्या कांही ताम्रपटांवरून हे सोमवंशी यदुकुलोत्पन्न (यादव) होते असें दिसतें. बर्नेलच्या मतें हे द्रविड असावे तर फ्लीट व भांडारकर हे यांनां आर्य म्हणतात व त्याच्या संपादनार्थ राष्ट्रकूट शब्दाच्या अनेक व्युत्पत्त्या देतात.
मूलताईकडील राष्ट्रकूट. - या भागांत दुर्गराज, गोविंदराज, स्वामीकराज व नंदराज युद्धासुर (७०९) या राजांची नांवें आढळतात. यांचा संबंध मान्यखेटच्या मूळ घराण्याशीं कितपत होता तें समजत नाही.
लाटचे राष्ट्रकूट. - लाट देशांत तिसर्या इंद्र्रानें राज्य स्थापिलें. त्याला कर्क दुसरा उर्फ सुवर्णवर्ष (८१२) आणि गोविंद चौथा उर्फ प्रभूतवर्ष दुसरा (८२७) हीं दोन मुलें होतीं. त्यांनी त्याच्या मागें अनुक्रमानें राज्य केलें.
गुजराथचे राष्ट्रकूट. -यांत कक्कराज पहिला, त्याचा पुत्र ध्रुवराजदेव, त्याचा गोविंदराज व त्याचा कक्कराज २ रा (७५७) असे राजे झाले. मान्यखेटच्या तिसर्या गोविंदराजानें हें राज्य बुडविलें.
हस्तिकुंडीचे राष्ट्रकूट. - इ.स. ९७३ च्या एका अंकित लेखावरून हस्तिकुंडी येथें एक लहानसें राष्ट्रकूट घराणें होतें, व त्यांत हरिवर्मन, विदग्ध (९१६), मम्मट (९३९), दावल (९९७) व बालप्रसाद हे राजे झाले असें आढळतें. यांत दावल हा पराक्रमी होता; त्यानें मालवराज मुंजापासून मेवाडच्या राज्याचें व अनहिलवाडच्या मूलराजापासून धरणीवराह राजाचें रक्षण केलें होतें.
याखेरीज राजपुतान्यांत जी राठोडवंशीय राजघराणी आहेत; त्यांपैकी पुष्कळ घराणीं या महाराष्ट्रांतील राष्ट्रकूट वंशापैकी होत असे म्हणतात. चालुक्यांनी मान्यखेटचें साम्राज्य बुडविल्यावर त्या राजघरण्यांतील पुरूषांनी राजपुतान्यांत लहान लहान राज्यें स्थापिली. (इंडि. अँटि. १. २०५; बाँबे आर्किआलॉजिकल रिपोर्ट १८७८; आयंगार-एन्शन्ट इंडिया; स्मिथ-अर्लि हिस्टरी ऑफ इंडिया; माबेल डफ; बाँबे ग्याझे. भा. १ पु. २; नागपूर डिट्रिक्ट ग्याझे.)

राष्ट्रकूट साम्राज्याची स्थापना दंतिदुर्ग (इ.स. ७३५ - इ.स. ७५६) यांनी केली.
दंतिदुर्ग हे राष्ट्रकूट वंशाचे संस्थापक होते. त्यांनी चालुक्य राजा दुसरा कीर्तिवर्मन याला पराजित करून राष्ट्रकूट राज्याची स्थापना केली.
अधिक माहितीसाठी हे पान वाचा: राष्ट्रकूट साम्राज्य