2 उत्तरे
2
answers
गुगल मॅप बद्दल माहिती द्या?
4
Answer link
*⭕ भारतातील पत्ते शोधणे होणार सोपे; गुगल मॅपमध्ये खास बदल ⭕*
विशेष कोडव्दारे सापडणार नेमका पत्ता_
❏ आपल्याला कोणताही पत्ता शोधायचा असेल की हल्ली कोणाला विचारायची वेळ येत नाही. कारण गुगलने ही गोष्ट अतिशय सोपी केली आहे. गुगल मॅप्सवर आपल्याला पोहोचायचे असलेले ठिकाणी टाकले की तो आपल्याला योग्य पद्धतीने त्याठिकाणी नेऊन पोहचवतो. इतकेच नाही तर शॉर्टकट, तसेच कुठे वळावे लागेल, किती वेळाने वळावे लागेल याची इत्यंभूत माहिती देतो. असे असूनही अनेकदा गल्लीबोळातील रस्ते शोधताना आपली तारांबळ उडते. पण याचाच विचार करुन गुगलने भारतीयांसाठी गुगल मॅप या आपल्या सुविधेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.
यासाठी प्लस कोडस नावाचे एक नवीन फिचर लाँच करण्यात आले आहे. खास भारतीयांसाठी तयार करण्यात आलेल्या या फिचरमुळे भारतीयांचे रस्ते शोधण्याचे काम आणखी सोपे होणार आहे. यामध्ये प्रत्येक लोकेशनसाठी एक युनिक कोड देण्यात येणार आहे, ज्यामुळे विशिष्ट ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने रस्ता शोधत असाल तर तुम्हाला मॅप्सवर काही गोष्टींची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेमका पत्ता सहज सापडू शकेल. यासाठी गुगल मॅपवर त्या कोडबरोबरच त्याशहराचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर आपल्याला हवी असलेली जागा मिळेल.

0
Answer link
गुगल मॅप (Google Maps) हे गुगलने (Google) तयार केलेले एक वेब मॅपिंग प्लॅटफॉर्म (web mapping platform)आणि ग्राहक ॲप्लिकेशन आहे. हे जगभरातील उपग्रह प्रतिमा, हवाई छायाचित्रे, रस्त्यांचे नकाशे, 360° पॅनोरामिक दृश्ये (Street View), रिअल-टाइम ट्रॅफिक स्थिती (real-time traffic conditions) आणि पायी, कारने, सायकलने, सार्वजनिक वाहतूक वापरून आणि विमान मार्गाने प्रवास करण्यासाठी मार्ग योजना देते.
गुगल मॅपची काही वैशिष्ट्ये:
- नॅव्हिगेशन (Navigation): गुगल मॅप तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी मार्गदर्शन करते.
- जवळपासची ठिकाणे शोधा: रेस्टॉरंट (restaurants), पेट्रोल पंप (petrol pumps), हॉटेल्स (hotels) आणि इतर आवश्यक ठिकाणे तुम्ही शोधू शकता.
- offline वापर: तुम्ही नकाशा डाउनलोड (download) करून तो ऑफलाइन (offline) देखील वापरू शकता.
- Street View: या फीचरमुळे (feature) तुम्ही ठिकाणांचे 360-degree दृश्य पाहू शकता.
- लाईव्ह्ह ट्रॅफिक अपडेट्स (live traffic updates): गुगल मॅप तुम्हाला लाईव्ह्ह ट्रॅफिकची माहिती देते, ज्यामुळे तुम्ही तुमचा मार्ग बदलू शकता.
गुगल मॅप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) यांसारख्या विविध प्लॅटफॉर्मवर (platform) उपलब्ध आहे आणि ते वेब ब्राउझरद्वारे (web browser) देखील वापरले जाऊ शकते.
अधिक माहितीसाठी, आपण गुगल मॅपच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता: गुगल मॅप