2 उत्तरे
2
answers
आपण वयाच्या किती वर्षांपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतो?
4
Answer link
शिक्षणासाठी कुठल्याही वयाची अट नाही, जोपर्यंत तुम्हाला शिकायची इच्छा आहे तोपर्यंत तुम्ही शिकू शकता. तुम्ही महाविद्यालयांमध्ये शिक्षण घ्यायचे आहे असे म्हणता, तर तुम्ही तुमचे बारावीचे गुणपत्रक व शाळा सोडल्याचा दाखला घेऊन महाविद्यालयात गेलात, तर तुम्हाला तिथे प्रवेश मिळेल. कुणीही वयाची अट शिक्षणासाठी घालत नाही.
मी स्वतः एकदा परीक्षा देताना माझ्या परीक्षा कक्षामध्ये एक ५० ते ५५ वयाच्या व्यक्तीला पेपर लिहितांना पाहिले आहे, त्यामुळे तुम्ही बिनधास्त तयारी करा.
पुढील शिक्षणासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 💐
0
Answer link
आपण वयाच्या कोणत्याही वर्षांपर्यंत महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकतो.
उच्च शिक्षण घेण्यासाठी वयाची अट नाही. जर तुमच्याकडे आवश्यक पात्रता असेल, तर तुम्ही कोणत्याही वयात महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकता.
अधिक माहितीसाठी, आपण आपल्या शिक्षण संस्थेशी संपर्क साधू शकता.