भारतीय सेना शिवाजी महाराज मुस्लिम धर्म

शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुसलमान किती होते?

2 उत्तरे
2 answers

शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुसलमान किती होते?

8
Reference:
New History of Maratha: सरदेसाई
शिवाजी कोण होता: गोविंद पानसरे
शिवाजी महाराजांचे मुस्लिम शिलेदार: राम पुनियानी  
         
     
शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी सुफी संत शाह शरीफ यांच्या सन्मानाप्रित्यर्थ आपल्या मुलांची नावं शहाजी आणि शरीफजी अशी ठेवली होती. शिवाजी महाराज यांनी आपल्या आयुष्यात मुघल आणि आदिलशाही सरदारांविरुध्द अनेक लढे दिले. त्यातील बहुतेक सरदार हे हिंदु होते.

महत्वाचे म्हणजे औरंगजेबच्या सेनेचं नेतृत्व करत राजा जयसिंह एक राजपूत याने स्वराज्यावर आक्रमण करत छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेले किल्ले तहाखाली जप्त केले होते. राजा जयसिंग औरंगजेबच्या दरबारातील मुख्य सरदारांपैकी एक उच्च पदस्थ होता.

शिवाजी महाराजांनी आपल्या प्रशासनात मानवता हे एकमेव धोरण अवलंबले होते ज्यात धर्माला कोणतेही स्थान नव्हते. त्यांच्या सैन्यात समावेशासाठी कोणत्याही धर्माची अट नव्हती म्हणूनच शिवरायांच्या सैन्यातील बहुतांश अधिकारी आणि सैनिक हे मुस्लीम धर्मीय होते.

Father of Indian Navy भारतीय नौसेनेचे जन्मदाते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौसेनेची धुरा दर्यासारंग या मुस्लीम सरदाराच्या हाती होती. दर्यासारंग यांनी इंग्रज नौसेनेला अनेकवेळा पराभवाची चव दाखवत आपल्या शौर्याने स्वराज्य वाढीस हातभार लावला होता. शिवरायांच्या नौसेनेत बहुसंख्य प्रमाणात सिद्दी मुस्लीम आणि मच्छिमार लोक होते. ज्यांना समुद्राच्या आडवळणाचा अनुभव होता.

शिवाजी महाराज हे कायम आपले सैन्य प्रगतशील बनवण्यासाठी तत्पर होते त्यासाठी त्यांनी शस्त्रागाराची निर्मिती करत त्याची कमान इब्राहिम खान याच्या हातात दिली होती. महाराजांच्या शस्त्रागारातील बहुसंख्य सैनिक हे मुस्लीम धर्मातील होते.

शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कोण विसरेल, जेव्हा शिवाजी महाराज आग्र्यात नजरकैदेत होते, त्यांची सेवा करणाऱ्या मदारी मेहतर या मुस्लीम शिपायाने शिवरायांना तिथून पलायन करण्यास मदत केली होती हे कोण विसरेल. शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची ख्याती तर आपण सर्वजण जाणतोच. शिवरायांनी गुप्तहेर खात्याच्या मदतीवरच अनेक मोहिमांमध्ये यश संपादन केले होते. त्यात गुप्तहेर प्रकरणांचे सचिव हे मुस्लीम मौलाना हैदर अली हे होते. गुप्तहेर रुस्तमे जमाने यांनी शिवाजी महाराजांना अफजलखानाचा दगाबाजी करण्याचा मनसुबा असल्याचे आधीच कळवले होते. त्यावरूनच अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणे महाराजांना शक्य झाले. सुरत लुटीच्या अगोदर शिवरायांच्या गुप्तहेरांनी अगोदर तेथील धनवान, मस्तीखोर सरदार, जमीनदार, सावकार यांची नावे काढुन महाराजांना दिली होती. त्यातूनच सुरत तुटीतून एवढा ऐवज स्वराज्यात दाखल झाला होता.
होता जीवा म्हणून वाचला शिवा’ हे आपण अनेकवेळा ऐकले असेलच पण अफजलखान भेटीस जाताना शिवाजी महाराजांनी आपल्या तीन अंगरक्षकांना संरक्षणास ठेवले होते त्यात शिवाजी महाराज यांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहीम सुद्धा होते. त्यांच्या अंगरक्षकांमध्ये मुस्लीम धर्मीय लोक होते यावरूनच शिवाजी महाराज यांचा सर्वधर्मीयांवर असलेला विश्वास दिसुन येतो. यात एक भर म्हणजे अफजलखानाला मारल्यानंतर अफजलखानाचा वकील/सल्लागार कृष्णमुर्ती भास्कर कुलकर्णी याने महाराजांवर तलवार चालवली होती.

शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील मुस्लीम सरदार
सिद्दी हिलाल: घोड दलाचा सेनापती
दर्यासारंग: नौसेनेचा प्रमुख
दौलत खान: आरमार प्रमुख
इब्राहीम खान: शस्त्रगार प्रमुख
काझी हैदर: महाराजांचे वकील
सिद्दी इब्राहीम: महाराजांचा अंगरक्षक
सिद्दी वाहवह: घोडदलातील सरदार
नूरखान बेग: स्वराज्याचा पहिला सरनौबत
श्यामाद खान: आरमाराचा अधिकारी
हस्सन खान मियानी: लष्करातील अधिकारी
सुलतान खान: आरमाराचा अधिकारी
दाउद खान: आरमाराचा सुभेदार
मदारी मेहतर: विश्वासू सेवक

असे अनेक मुस्लीम धर्मीय लोक शिवरायांच्या सैन्यात स्वराज्य प्रस्थापित करण्यासाठी लढत होती.

सुरत लुटीवेळी शिवाजी महाराजांनी सुरत मधील मश्जीद, चर्च वर हल्ला न करण्याचे फर्मान काढले होते.

शिवाजी महाराजांनी राजधानी रायगडमध्ये पुजेसाठी जेव्हा जगदीश्वर मंदिराची उभारणी केली त्याचवेळी आपल्या महालाच्या समोर मुस्लीम बांधवांसाठी मशीद तयार केल्याची इतिहासात नोंद आहे.

आपण फक्त कल्याणच्या सुभेदारच्या सुनेला आदरातिथ्याने सन्मानाने वागवलेले ऐकले असेल परंतु शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याला कोणत्याही परिस्थितीत मुस्लीम महिला आणि लहान मुलांबरोबर गैरवर्तणूक व्हायला नको असे स्पष्ट आदेश दिले होते.
जर कुणाला कुराणाची प्रत मिळाली, तर त्याला पूर्ण सन्मान देत मुस्लिमांना ती परत करण्याचा आदेश शिवरायांनी आपल्या सैन्याला दिला होता.
ब्रिटिशांनी इतिहासलेखनाला जाणूनबुजून धार्मिक रंग दिला असल्याने लोकांनी त्यावरच विश्वास ठेवत महाराजांना धर्मावर आधारित लढणारा राजा म्हणून घोषित करून टाकले.
परंतु शिवरायांचा मुख्य उद्देश हा स्वराज्य प्रस्थापित करत प्रजाहितदक्ष राज्य तयार करणे हाच होता.


​मीर मोहम्मद यांनी १७ व्या दशकात रेखाटलेले शिवरायांबरोबर मुस्लीम सरदारांचे चित्र





https://punerispeaks.com/shivaji-maharaj-muslim-army/amp/#aoh=15823322033786&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&amp_tf=From%20%251%24s
उत्तर लिहिले · 22/2/2020
कर्म · 2660
0

शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुसलमान सैनिक होते. त्यांच्या काही प्रमुख नावांचा उल्लेख खालीलप्रमाणे आहे:

  • दौलत खान: हे मराठा आरमारातील महत्त्वाचे अधिकारी होते.
  • सिद्दी इब्राहिम: हे शिवाजी महाराजांच्या तोफखान्यातील प्रमुख होते. https://www.thehindu.com/news/national/other-states/Muslims-were-also-loyal-to-Sivaji-says-Governor/article16822741.ece
  • नूर खान बेग: हे शिवाजी महाराजांच्या सैन्यात महत्त्वाचे सरदार होते.

या व्यतिरिक्त, अनेक मुसलमान सैनिक आणि अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात विविध पदांवर कार्यरत होते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 960

Related Questions

प्रत्येक सेनादलाचा प्रमुखाला काय म्हणतात?
देशातील दहशतवादी घटनांचे तपास करणारे यंत्रणे कोणते आहेत?
भारतात सर्वात सुंदर इमारत कोणती?
भारतीय करार कायद्यानुसार करारात भाग घेणाऱ्या व्यक्तींची काय पात्रता असणे आवश्यक आहे? घोड्यांची विल्हेवाट कोणत्या मार्गाने करता येते?
हबीब रेहमान यांचे भारतीय आधुनिक वास्तुकलेतील स्थान कसे स्पष्ट कराल?
भारतातील भूदल, वायुदल, नवदल प्रशिक्षण केंद्रांची नावे कोणती आहेत?
भारत व ब्राझीलचे स्थान, विस्तार व सीमा कोणत्या आहेत?