2 उत्तरे
2
answers
शाह शरीफ दर्गा व शिवाजी महाराज माहिती द्या?
2
Answer link
छ. शिवाजी महाराज व शाह शरीफ दर्गा
http://bit.ly/3t1JIIv
____________________________
🌠 _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_ 🌠
____________________________
ही गोष्ट कदाचित तुमच्या ही कानी पडली असेल कि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा अहमदनगर मधील ‘शाह शरीफ’ दर्ग्याशी संबंध आहे. चला जाणून घेऊया काय आहे हा संबंध…!छत्रपती शिवाजी महाराजांची जी वंशावळ उपलब्ध आहे ती सुरु होते बाबाजी भोसले यांच्यापासून. त्यांचा जन्म १५३३ सालचा. त्यांनामालोजी राजे भोसले आणि विठोजी राजे भोसले हे दोन पुत्र! त्यापैकी मालोजी राजे यांचे पुत्र म्हणजे- शहाजी राजे आणि शरीफजी राजे.

╔══╗
║██║ _*ⓂⒶⒽⒾⓉⒾ*_
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ ▄ █ ▄ █ ▄ █
👁- - - - - - - - - - - -●
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
आता हा प्रश्न अनेकांना पडतो की, मालोजी राजांच्या दोन्ही पुत्रांच्या नावामध्ये मुसलमानीनावांचा प्रभाव डोकावतो. असे का?तर या मागे एक कथा सांगितली जाते.त्याचं झालं असं की, मालोजी राजांना मुल होतं नव्हतं. तेव्हा अहमदनगर मधील शाह शरीफ दर्ग्याची ख्याती मालोजींच्या कानी आली. या दर्ग्यात जे काही चांगल्या मनाने मागालं ते पूर्ण होतेच अशी भाविकांमध्ये श्रद्धा होती. त्यानुसार मालोजी राजांनी संतान प्राप्तीसाठी दर्ग्यात नवस म्हटला आणि नवस पूर्ण झाल्यास होणाऱ्या मुलाला ‘तुझे’ नाव देईन असा शब्द दिला. आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव ची पोस्ट, पण पुढे मालोजींना दोन पुत्र झाले. दिलेल्या वचनाला जागले पाहिजे या भावनेतून मालोजी राजांनी दर्ग्याच्या नावातील ‘शाह’ या शब्दावरून एका मुलाचे नाव ‘शहाजी’ ठेवले आणि ‘शरीफ’ या शब्दावरून दुसऱ्या मुलाचे ‘शरीफजी’ असे नामकरण केले. तसेच या निमित्ताने दर्ग्यावर रोज नगाऱ्याची नौबत वाजवण्याची प्रथा सुरु केली.
पुढे जेव्हा औरंगजेब दक्षिणेत उतरला होता, तेव्हा नगरात असताना एके दिवशी सकाळी ही नौबत त्याच्याकानी पडली. आपल्या धर्मासमोर काफिरांचे वाद्य वाजवणे पाहून त्याला चीड आली त्याने ती नौबत बंद करवली. त्यानंतर शाह शरीफ यांनी औरंगजेबाच्या स्वप्नात जाऊन ‘तू माझी नौबत बंद करवलीस आतामी तुझी नौबत बंद करतो’ असे सांगितले आणि नंतर अहमदनगर मध्ये असतानाच औरंगजेबाचा मृत्यू झाला. अशी कथा स्थानिकांनध्ये प्रचलित आहे.आजही अहमदनगर मध्ये हा दर्गा पहावयास मिळतो. शाह शरीफच्या दर्ग्याचे जे विद्यमान मुजावर आहेत त्यांना या गोष्टीचा अभिमान आहे की या दर्ग्याचे महापराक्रमी भोसले घराण्याशी नाते आहे. आजही भोसले घराण्याकडून दर्ग्याला वर्षासन मिळते आणि भोसले घराण्यातील मंडळी येथे दर्शनासाठी येतात.तर या दर्ग्याच्या आशीर्वादाने मालोजी राजेंना झालेला शरीफजी हा पुत्र देखील शूर निपजला.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
*ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* ☜♡☞
*_🥇 माहिती सेवा ग्रूप, पेठवडगाव 🥇_*
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0
Answer link
शाह शरीफ दर्गा आणि शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:
शाह शरीफ दर्गा:
- हा दर्गा महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात आहे.
- हा दर्गा सुफी संत शाह शरीफ यांचा आहे.
- या दर्ग्यात अनेक मुस्लिम आणि हिंदू भाविक दर्शनासाठी येतात.
- शाह शरीफ हे एक लोकप्रिय सुफी संत होते आणि त्यांनी लोकांना प्रेम आणि शांतीचा संदेश दिला.
शिवाजी महाराज:
- शिवाजी महाराज हे मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.
- त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला.
- शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध लढा दिला आणि मराठा साम्राज्याची स्थापना केली.
- ते एक महान योद्धा आणि कुशल प्रशासक होते.
- शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यात समानता आणि न्याय प्रस्थापित केला.
अधिक माहितीसाठी:
- शाह शरीफ दर्गा, कोपरगाव: अहमदनगर जिल्हा अधिकृत संकेतस्थळ
- शिवाजी महाराज: महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ