अभिनेता
अभिनय म्हणजे काय ?
2 उत्तरे
2
answers
अभिनय म्हणजे काय ?
5
Answer link
अभिनय -
ज्याचें रूप घेतलें असेल त्याचें वेष, भाषण चेष्टा, मनोविकार इत्यादि सर्व गोष्टींत अनुकरण करणें यास अभिनय म्हणतात. अभिनय या शब्दाचा यौगिक अर्थ “ जवळ नेणे ” असा होतो; म्हणजे कवीच्या भावार्थाजवळ प्रेक्षकांनां नेणें. तेव्हां प्रेक्षकांनां कवीच्या भावार्थाचें ज्ञान करून देण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यास अभिनय म्हणतात. रूपकरससिद्धि सर्वस्वी अभिनयावर अवलंबून असते. आपले नेहमीचे स्वाभाविक अभिनय नाट्यनृत्यप्रयोगांत जास्त प्रमाणांत व्हावे लागतात. सिनेमाद्दश्यांत तर त्याहूनहि जास्त प्रमाणांत पाहिजेत; कारण केवळ अभिनयांवरूनच त्यांतील भावार्थ समजून घ्यावयाचा असतो. मूकदृश्यांत अभिनयाला पहिलें स्थान जें दिलें जातें तें यामुळेंच. पॅथेसारख्या जगविख्यात् सिनेमाफिल्म तयार करणार्या कंपनीत जे मोठ्या पगाराचे नटनटी काम करितात व त्यांचीं नांवे सिनेमाप्रेक्षकांच्या तोंडी जीं अक्षय राहतात त्याचें कारण या नटांचा सर्वोत्कृष्ट व हदयंगम अभिनय हे होय. नाट्य व नृत्यकलांतून अभिनय कशा प्रकारचा असावा याविषयी बर्याच संस्कृत ग्रंथातून विवेचन आढळतें. भरत मुनिकृत नाट्यशास्त्रांत नाट्याभिनय विवेचिला आहे.नंदिकेश्वराचा “ अभिनयदर्पण ” नांवाचा जो ग्रंथ आहे त्यांत विशेषत: नृत्यकलेंत उपयोगी पडणार्या अभिनयाचे नियम फार विस्तारानें दिलें आहेत.
ना ट्या भि न य :—
नाटकांत निरनिराळ्या अवयवांच्या क्रिया व हालचाली विशेष महत्त्वाच्या आहेत. या हालचालींच्या क्रियेस नाट्य किंवा अभिनय म्हणतात. ज्याची भूमिका घेतली असेल त्याचें बोलण्या चालण्यांत हुबेहुब अनुकरण करणें याचें नांव अभिनय.
नृ त्या भि न य.—
नंदी हा नृत्यकलेंत प्रवीण आहे अशी कल्पना करून त्याच्यापासून अभिनयाचे धडे घेण्याची “ अभिनयदर्पणा ” च्या कर्त्यास इच्छा झाली. नंदिकेश्वर हें कर्त्याचें नांव खरें आहे की टोपण आहे याविषयी शंका आहे.

0
Answer link
अभिनय:
अभिनय म्हणजे एखाद्या व्यक्तिरेखेद्वारे भावना, विचार आणि कृती व्यक्त करण्याची कला आहे. हे नाटक, चित्रपट, दूरदर्शन, आणि इतर कला प्रकारांमध्ये वापरले जाते.
अभिनयाचे प्रकार:
- नैसर्गिक अभिनय (Natural Acting): रोजच्या जीवनातील हावभाव आणि बोलण्याची पद्धत वापरणे.
- शैलीकृत अभिनय (Stylized Acting): विशिष्ट शैली किंवा परंपरेनुसार अभिनय करणे, जसे की भारतीय नाटकांमध्ये असते.
- वास्तववादी अभिनय (Realistic Acting): पात्राच्या भावना आणि अनुभवांना सत्यतेने सादर करणे.
अभिनयाचे घटक:
- शरीर भाषा: हावभाव, मुद्रा आणि हालचाली.
- आवाज: आवाज Modulations, वेग आणि स्पष्टता.
- भावना: पात्राच्या भावनांना योग्य प्रकारे व्यक्त करणे.
- संवाद: संवादांची delivery आणि emphasis.