समाजशास्त्र समाज सेवा सामाजिक शास्त्रे राजकीय विकास

जपान या देशाची सामाजिक व राजकीय प्रगती विशद करा?

2 उत्तरे
2 answers

जपान या देशाची सामाजिक व राजकीय प्रगती विशद करा?

10
जपान आशिया खंडातील एक महत्वाचा देश आहे. हा देश 4 मोठे व अनेक लहान बेटांचा मिळून बनला आहे. चीन, रशिया व कोरिया यासारखे बल्याढय देश Japan चे शेजारी देश आहेत. जपानी लोक त्यांच्या देशाला निप्पोन म्हणतात. याचा अर्थ होतो उगवत्या सूर्याचा देश. अश्या ह्या अजब Japan देशाविषयी काही गजब गोष्टी जाणून घेऊयात.

Japan  छोट्या मोठ्या 6852 बेटांचा मिळून बनला आहे. ह्या पैकी फक्त 340 बेटांचे क्षेत्रफळ 1 वर्ग किलोमीटर पेक्षा जास्त आहे. 6852 बेटांपैकी फक्त 4 बेटांवर 97 टक्के जपान वसला आहे. व बाकीच्या 6849 बेटांवर 3 टक्के जपान वसला आहे. 

जपान च्या तैसीरोजिम्मा नावाच्या बेटाला Cat Island  अस म्हणले जाते कारण ह्या बेटावर 100 लोक राहतात परंतु 400 पेक्षा जास्त मांजर राहतात. ह्या बेटावर कुत्र्यांना न्यायला बंदी आहे.

जपान मध्ये वृद्ध लोकांची संख्या तुलनेने जास्त आहे तर भारतामध्ये 14 -25 ह्या वयोगटातील लोकसंख्या जास्त आहे.

जपान चा 70 टक्के हिस्सा पर्वतीय आहे, ज्यामध्ये 200 पेक्षा जास्त ज्वालामुखी आहेत.

भारताचे क्षेत्रफळ Japan पेक्षा 18 पटीने जास्त आहे . तर लोकसंख्या 10 पटीने जास्त आहे.

जपानी लोकांचं सरासरी आयुष्यमान ८२ वर्षे इतके आहे, जगात सर्वात जास्त सरासरी आयुष्यमान असणारा हा देश आहे. जपान मध्ये १०० पेक्षा जास्त वय असणारे ५०००० लोक आहेत.
  
फॅमिली व्यवसाय चालवण्यासाठी जपान मध्ये तरुण मुलांना दत्तक घेतले जाते.

लोकसंख्येचा विचार करता जपानचा अकरावा क्रमांक लागतो.

जपानच्या एकूण  क्षेत्रफळाच्या 13 टक्के जागेवर शेती केली जाते तर भारतच्या एकूण  क्षेत्रफळाच्या 47 टक्के जागेवर शेती केली जाते.

फुगू माश्यापासून बनवलेले पदार्थ जपान मध्ये खूप प्रसिद्ध आहेत. हे पदार्थ फुगू नावाच्या विषारी माश्यापासून बनवले जातात. हे फार जोखमीचं काम आहे आणि फक्त परवानाधारक व्यति च हे काम करू शकतात. हा परवाना मिळवण्यासाठी 7-11 वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते.

Japan मध्ये फक्त जपानी भाषेमध्ये च शिक्षण दिले जाते. जपानी लोकांना त्याच्या मातृभाषेचा खूप अभिमान आहे.

Japan मध्ये मुलांना वयाच्या १० व्य वर्षापर्यंत कोणतीही परीक्षा द्यावी लागत नाही.

जपान चा साक्षरता दर १००% आहे. जपानच्या  वृत्तपत्रांमध्ये दुर्घटना, राजकारण, वाद-विवाद ह्या विषयांवर बातम्या छापल्या जात नाहीत, फक्त आवश्यक असणाऱ्या गोष्टीच छापल्या जातात.

Sumo हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच बेसबॉल सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर खेळाला जातो
  
एक परदेश तरुण Japan मध्ये शिक्षण घेत होता, एके दिवशी त्याने सरकारी ग्रंथालयातून एक पुस्तक वाचण्यासाठी घरी नेले. त्या पुस्तकामध्ये खूप दुर्मिळ अशी चित्रे होती, त्या विद्यार्थ्याने त्या पुस्तकामधून ती चित्रे काढून घेतली व पुस्तक ग्रंथालयाला परत केले. जेव्हा हि गोष्ट ग्रंथालयाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी रीतसर त्याच्याविरुद्ध तक्रार केली. त्याची शिक्षा म्हणून त्या तरुणाला जपान मधून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्या देशाच्या कोणत्याही विद्यार्थ्याला त्या ग्रंथालयात प्रवेश देण्यात आला नाही.

Japan मध्ये विद्यार्थी व शिक्षक मिळून त्याच्या वर्गाची स्वच्छता करतात.

Japan च्या चहुबाजूने समुद्र आहे, तरीही इथले २७% मासे हे बाहेरून आयात केले जातात.

भारतामध्ये व्हेंडिंग मशीन्स फक्त ATM म्हणूनच वापरल्या जातात, परंतु Japan मध्ये अश्या व्हेंडिंग मशीन्स आहेत कि ज्यामधून अंडी, दूध, केळी, नूडल्स अश्या गोष्टी मिळतात. जपान मध्ये अश्या ५५ लाख व्हेंडिंग मशीन्स आहेत.

Japan हा एकमेव असा देश आहे कि जो मुस्लिम लोकांना नागरिकता प्रदान करत नाही. इथे मुस्लिम लोकांनां भाड्याने घर मिळणे देखील अवघड आहे.

Japan मध्ये ११ मार्च २०११ ह्या दिवशी आलेला भूकंप हा आतापर्यंतचा सर्वात जास्त शक्तिशाली भूकंप आहे. हा भूकंप ९ रिश्टर स्केल इतक्या ताकदीचा होता. जपान मध्ये दरवर्षी जवळ जवळ १५०० भूकंप येतात म्हणजे दररोज ४ भूकंप.

जपान मध्ये हत्या-दर खूप कमी आहे. सगळ्यात कमी हत्या होणाऱ्या देशांच्या यादीत जपान चा क्रमांक दुसरा आहे. इथे २,००,००० लोकांमागे एक हत्या होते.

जपान एकमेव देश आहे ज्याच्यावर अणुबॉम्ब चा हल्ला झाला आहे. अमेरिका ने ६ ऑगस्ट व ९ ऑगस्ट १९४५
ला हिरोशिमा व नागासाकी ह्या शहरांवर अणुबॉम्ब टाकले होते. ह्या बॉम्बना Little -Boy व Fat -Man हि नावे  दिली होती.

जपानी लोक वेळेचे काटेकोर पण पालन करतात. इथल्या रेल्वे जास्तीत जास्त १८ सेकंड उशिरा धावतात.

जपान च्या कोणत्याच विद्यपीठामध्ये अरबी अथवा इतर कोणतीही इस्लामी भाषा शिकवली जात नाही.

२०१५ पर्यंत जपान मध्ये रात्री उशिरा पर्यंत नाचण्यास बंदी होती.

Japan मध्ये प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांपैकी २०% पुस्तके Comic books असतात.

जपान कडे कोणतीही नैसर्गिक साधनसंपत्ती नाहीये तसेच दरवर्षी शेकडो भूकंप येतात, असं असूनही जपान जगातली दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.

जपान मध्ये वापरले जाणारे ९०% मोबाईल फोन वॉटर-प्रूफ आहेत कारण इथले लोक अंघोळ करताना देखील मोबाईल चा वापर करतात.

जपान हा जगातला सर्वात मोठा वाहन निर्माता देश आहे.

Japan ची ९६% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. सर्वात जास्त बौद्ध-धर्मीय लोकसंख्येच्या बाबतीत जपान चा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो.

Japan मध्ये एक अशी बिल्डिंग आहे, जिच्या आतून हायवे जातो.

काळ्या मांजरीला जपान मध्ये शुभ मानलं जाते.

जपान मध्ये वापरले जाणारे ९०% मोबाईल फोन वॉटर-प्रूफ आहेत कारण इथले लोक अंघोळ करताना देखील मोबाईल चा वापर करतात.

जपान मध्ये साफ-सफाई ची खूप काळजी घेतली जाते. जेव्हा जपानी लोक ग्रंथालयचे पुस्तक परत करतात तेव्हा ते UV किरणांचा वापर करून स्वच्छ केली जातात.

जपान मध्ये बसशी  नावाचा एक प्रसिद्ध पदार्थ खाल्ला जातो, ह्यामध्ये घोडयाचे कच्चे मांस आले व कांद्याबरोबर खाल्ले जाते.

Japan ऍनिमेशन टीव्ही चा सर्वात मोठा उत्पादक आहे, एकूण ऍनिमेशन इंडस्ट्री चा ६०% हिस्सा जपान चा आहे.
जपान मध्ये मुलांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त संख्या पाळीव प्राण्यांची आहे.

आतापर्यंत जपान ने २६ नोबेल पुरस्कार मिळवले आहेत.

जगातली सर्वात प्राचीन लाकडी इमारत जपान मध्ये आहे. होर्युजी ह्या मंदिराची हि इमारत आहे.

Japan मध्ये बाहेरून येऊन स्थायिक झालेल्या लोकांची संख्या खूप कमी आहे. इथली ९८% लोकसंख्या मूळ जपानी लोकांची आहे.

जपान मध्ये ऑफिस मध्ये काम करताना झोपण्यास मान्यता आहे.

Japan मध्ये कुणी रेल्वे खाली आत्महत्या केली तर त्या व्यक्तीच्या कुटुंबियांकडून नुकसान भरपाई घेतली जाते.

जपान मध्ये हॉटेल मध्ये टीप देणं अशुभ मानलं जाते.

जपान हा जगातला सर्वात मोठा वाहन निर्माता देश आहे.

Japan ची ९६% लोकसंख्या बौद्ध धर्माचे पालन करते. सर्वात जास्त बौद्ध-धर्मीय लोकसंख्येच्या बाबतीत जपान चा चीन नंतर दुसरा क्रमांक लागतो.

Japan मध्ये कोणत्याही बिल्डिंग मध्ये चौथा मजला नाहीये. इथे तिसऱ्या नंतर पाचवा मजला असतो. जपान मध्ये ४ ह्या अंकाचा उपयोग करणे अशुभ मानलं जाते.
जगात सर्वात जास्त आत्महत्या Japan मध्ये होतात.

Japan मध्ये कामगारांसाठी असणारे कायदे खूप चांगले आहेत. कोणतीही कंपनी त्यांच्या कामगारांना सहजासहजी कामावरून काढून टाकू शकत नाहीत. त्याना असं करायचं असेल तर त्या कामगारांना मोठी रक्कम द्यावी लागते.

जपान मध्ये १ जानेवारी ला नवीन वर्षाचे स्वागत मंदिरात १०८ वेळा घंटा वाजवून केले जाते.
उत्तर लिहिले · 9/1/2020
कर्म · 19320
0

जपानची सामाजिक आणि राजकीय प्रगती

जपानने सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. त्याबद्दल काही माहिती खालीलप्रमाणे:

सामाजिक प्रगती:

  • शिक्षण: जपानमध्ये शिक्षणाला खूप महत्त्व दिले जाते. साक्षरतेचे प्रमाण जवळजवळ 100% आहे.

    संदर्भ: Worldometers

  • आरोग्य: जपानमध्ये आरोग्य सेवा उत्तम दर्जाची आहे. लोकांचे सरासरी आयुर्मान जगामध्ये सर्वाधिक आहे.

    संदर्भ: World Bank

  • तंत्रज्ञान: जपानने तंत्रज्ञान क्षेत्रात खूप विकास केला आहे. रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमध्ये जपान अग्रेसर आहे.

    संदर्भ: Invest India

  • संस्कृती: जपानची स्वतःची अशी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. अनेक पारंपरिक उत्सव आणि कला जतन केल्या जातात.

राजकीय प्रगती:

  • लोकशाही: जपानमध्ये संसदीय लोकशाही आहे. लोकांमध्ये निवडणुकीद्वारे सरकार निवडण्याचा अधिकार आहे.

    संदर्भ: Ministry of Foreign Affairs of Japan

  • स्थिरता: जपानमध्ये राजकीय स्थिरता आहे. अनेक वर्षांपासून एकच राजकीय पक्ष सत्तेवर आहे.
  • आंतरराष्ट्रीय संबंध: जपानचे इतर देशांशी चांगले संबंध आहेत. जपान संयुक्त राष्ट्रसंघाचा (United Nations) सदस्य आहे.

    संदर्भ: United Nations

  • कायदे: जपानमध्ये मजबूत कायदे आहेत. कायद्याचे पालन काटेकोरपणे केले जाते.

जपानने शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान आणि संस्कृती यांसारख्या सामाजिक क्षेत्रांमध्ये खूप सुधारणा केली आहे. लोकशाही, राजकीय स्थिरता आणि आंतरराष्ट्रीय संबंधांमुळे जपानने राजकीय क्षेत्रातही प्रगती केली आहे.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 980

Related Questions

ब्रिटनमधील झालेल्या लोकशाही विकासाचा आढावा कसा घ्याल?
जपान या देशाचे सामाजिक व राजकीय प्रगती विशद करा. ?