अंधश्रद्धा प्राणी शकुन-अपशकुन

रात्री घुबड दिसल्यास काय होते?

2 उत्तरे
2 answers

रात्री घुबड दिसल्यास काय होते?

16
जर आपण शुभ/अशुभ या गोष्टींवरून प्रश्न केला असेल तर आपण निश्चिंत रहावे... रात्रीच काय दिवसाही घुबड दिसल्यास काहीही होत नाही.. हे मनाचे खेळ आणि पूर्वजनांपासून ऐकलेल्या दंतकथेमुळे मनात असे विचार येऊ शकतात...
घुबड हे रात्रीचे  स्वतःच्या उपजीविकेसाठी शिकार करीत असतो.. म्हणून शिकार शोधण्यासाठी कदाचित चुकून आपणास घुबड दिसले असावेत..
त्याचे भीतीदायक डोळे आणि घुत्कार मुळे मानव त्यास घाबरतो.. पिसांच्या वैपुल्यामुळे डोके मोठे व मान आखूड दिसल्याने घुबडाचा आकार भयावह वाटतो...तो डोळ्यातील बुब्बुळे गोलगोल फिरवू शकतो.. घुबड २७० अंशात मान फिरवू शकल्याने तो गोलगोल मान फिरवतो असे भास होतात.. घुबडाबद्दल अश्याच काही कारणांमुळे मानवास भीती वाटू लागली आणि तो अपशकुन वा अशुभच आहे असे काही ठिकाणी गैरसमज निर्माण झाले...
म्हणून अश्या अपसमजसास आपण बळी पडू नये.. ते त्याचे शारीरिक व नैसर्गिक क्रिया आहेत.. जे निसर्गाने त्यास बहाल केले आहे... तो ही एक जीव आहे.. इतर पक्ष्याहून वेगळा असला तरी पक्षीच आहे.. म्हणून घुबड कोणत्याही वेळेस दिसला तर काळजी नसावी..
उत्तर लिहिले · 30/12/2019
कर्म · 458560
0
रात्री घुबड दिसल्यास काय होते याबद्दल अनेक समज आणि मान्यता आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
  • शुभ: काही लोकांच्या मते, घुबड दिसणे शुभ असते. ते तुमच्यासाठी सकारात्मक बदल आणि सौभाग्य घेऊन येते.
  • अशुभ: काही संस्कृतींमध्ये घुबड अशुभ मानले जाते. ते नकारात्मक ऊर्जा आणि वाईट बातमीचे प्रतीक आहे, असा समज आहे.
  • ज्ञान आणि बुद्धी: घुबडाला ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे, ते दिसल्यास तुम्हाला ज्ञानप्राप्ती होऊ शकते.
  • संरक्षण: काही लोकांचा असा विश्वास आहे की घुबड तुमचे संरक्षण करते आणि तुम्हाला धोक्यांपासून वाचवते.
या समजुती वैयक्तिक श्रद्धा आणि सांस्कृतिक दृष्टिकोन यावर आधारित आहेत. त्यामुळे, तुमच्या अनुभवानुसार आणि मान्यतेनुसार तुम्ही याचा अर्थ लावू शकता.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 1760

Related Questions

वटवाघूळ घरात येणे म्हणजे अपशकुन असतो का?
रात्री सफेद घुबड दिसल्यास काय मानावे?
रात्रीच्या वेळी वटवाघूळ घरात शिरल्यावर काय होते?
अमावस्येला मुलगी पाहण्यासाठी जाणे योग्य आहे का?
मी नुकताच घराबाहेर गेलो होतो आणि आताच घरी परतलो आहे. माझ्या पाठोपाठ एक वटवाघूळ घरात आले आहे. घरात मंगलकार्य होणार आहे. वटवाघूळ येणे अपशकुनी तर नाही ना?
रस्त्यावर जाताना मुंगूस आडवे जाणे हे शुभ आहे की अशुभ?
फुलपाखरू घरी आलेले चांगले असते की वाईट?