दिनविशेष भारतीय सेना नौसेना दिनदर्शिका संरक्षण नौदल

४ डिसेंबर भारतीय नौदल दिवसा निमित्त माहिती मिळेल का?

2 उत्तरे
2 answers

४ डिसेंबर भारतीय नौदल दिवसा निमित्त माहिती मिळेल का?

9
आज भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन

प्रत्येक देशात लष्कराला वेगळं महत्त्व असतंच, पण समुद्र किनारा असणाऱ्या देशांमध्ये नौदलाचंही तितकंच महत्त्व असतं. भारतासारख्या देशात नौदलाला सतत सतर्क राहावं लागतं. आज (4 डिसेंबर) भारतीय नौदल दिन आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊया आजच्याच दिवशी का साजरा केला जातो नौदल दिन…

भारतीय नौदलातर्फे ४ डिसेंबर हा प्रतिवर्षी नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्याआधीचा पूर्ण सप्ताह हा देशभरात नौदल सप्ताह म्हणून विविध उपक्रमांनी साजरा होतो. या साऱ्याला पार्श्वभूमी आहे ती १९७१ साली पाकिस्तानसोबत झालेल्या युद्धाची. तत्कालीन पूर्व पाकिस्तानातून भारतीय हद्दीमध्ये पाकिस्तानी हवाईदल सातत्याने घुसखोरी करत होते. भारताने अनेकदा इशारे देऊनही त्यात फारसा फरक पडला नव्हता. खरे तर १९७१च्या एप्रिल महिन्याच्या सुमारासच युद्ध पुकारण्यासदृश परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानच्या सततच्या कारवायांनी भारताच्या संयमाचा कडेलोट होणेच केवळ बाकी होते. अशा वेळेस युद्धाच्या निर्णयासंदर्भात बोलावलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लष्करप्रमुख सॅम माणेकशॉ यांनी खंबीर भूमिका घेत आताचा ऋतू आणि एकूणच परिस्थिती ही आपल्याला परवडणारी नाही, अशी ठाम भूमिका घेतली.

पंतप्रधान इंदिरा गांधींच्या निर्णयाविरोधात कोणाचीही बोलण्याची शामत नव्हती, अशा कालखंडात सॅम माणेकशॉ यांनी सत्य बोलण्याचे धाडस दाखवले. खरे तर बांगलादेश युद्धाच्या मुळाशी हा धाडसाचा पाया होता. त्यांनी नोव्हेंबपर्यंत थांबवण्याचा सल्ला दिला, जो मान्य करण्यात आला. तोपर्यंत सैन्याची जुळवाजुळवही व्यवस्थित करता येईल, याची खात्रीही देण्यास ते विसरले नाहीत. अखेरीस इरेस पेटलेल्या पाकिस्तानने ३ डिसेंबर रोजी ती चूक केलीच. त्यांनी भारतीय सीमाभागावर पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानातून जोरदार हल्ले चढवले. त्याच वेळेस भारताची ‘आयएनएस विक्रांत’ ही विमानवाहू युद्धनौका या युद्धात सागरतळाला धाडण्याची योजनाही पाकने आखली. मात्र तेच लक्षात घेऊन भारतीय नौदलाने चुकीचे संदेश पाठवून ‘पीएनएस गाझी’ची दिशाभूल केली आणि डाव साधला.

भारतीय नौदलाने चढविलेल्या हल्ल्यात ‘गाझी’ या पाणबुडीला जलसमाधी मिळाली. त्यानंतर मात्र ‘आयएनएस विक्रांत’ने बंगालच्या उपसागरात आपला दरारा पसरवला आणि पाकिस्तानी नौदलाचे कंबरडे मोडून काढले. विक्रांतवरील धावपट्टीचा वापर करत नौदलाच्या लढाऊ विमानांनी हल्ला चढवून पूर्वेकडे पाकिस्तानला डोकेही वर काढू दिले नाही. हे सुरू असतानाच पश्चिमी मुख्यालयाच्या नौदल ताफ्याने धाडसी नियोजन करून लहान आकाराच्या नौकांच्या मदतीने छुप्या पद्धतीने पाकिस्तानी सागरी हद्दीत प्रवेश करत थेट कराची बंदरावरच हल्ला चढवला. पाकिस्तानी युद्धनौका, पाणबुड्या त्यांच्यावरील या अचानक झालेल्या हल्ल्याने हादरून गेल्या. कराची बंदरावर थेट हल्ला होऊ शकतो, याची कल्पनाच पाकिस्तान नौदलाने केलेली नव्हती, किंबहुना तिकडची ताकद पूर्वेकडे वळविण्याचा त्यांचा इरादा होता, पण त्यालाच नौदलाने सुरुंग लावला.

३ आणि ४ डिसेंबरच्या मध्यरात्री भारतीय नौदलाने केलेल्या या हल्ल्याने पाकिस्तानचे कंबरडे मोडले आणि युद्धाचे पारडे भारताच्या दिशेने झुकले. त्यानंतर दहा दिवसांतच पाकिस्तानने शरणागती पत्करली. नौदलाच्या त्या पराक्रमाची आठवण म्हणून ४ डिसेंबर हा भारतीय नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर अरबी समुद्रामध्ये दीर्घकाळ केवळ भारतीय नौदलच सामर्थ्यशाली नौदल म्हणून वावरत होते. आज भारताचे नौदल हे शक्तीशाली नौदल म्हणून ओळखले जाते.

पुढील माहितीसाठी लोकसत्ता पेजला भेट द्या. त्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://www.loksatta.com/desh-videsh-news/indian-navy-day-4th-december-know-why-we-celebrate-this-day-india-pakistan-war-jud-87-2028214/
उत्तर लिहिले · 4/12/2019
कर्म · 458580
0

४ डिसेंबर: भारतीय नौदल दिन

४ डिसेंबर हा दिवस भारतात नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात भारतीय नौदलाने कराची बंदरावर केलेल्या यशस्वी हल्ल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. 'ऑपरेशन ट्रायडंट' असे या हल्ल्याला नाव देण्यात आले होते.

या दिवसाचे महत्त्व:

  • भारतीय नौदलाच्या शौर्याचे स्मरण.
  • देशाच्या सुरक्षिततेत नौदलाचे योगदान.
  • नौदलात सामील होण्यासाठी प्रेरणा.

नौदल दिनानिमित्त कार्यक्रम:

  • विविध ठिकाणी नौदलाच्या जहाजांचे प्रदर्शन.
  • युद्धनौका आणि नौदल तळांना भेटी.
  • नौदल कर्मचाऱ्यांसाठी विविध कार्यक्रम आणि स्पर्धा.

भारतीय नौदल हे भारतीय सशस्त्र दलाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय नौदल देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करते.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 5280

Related Questions

राणीच्या काळात इंग्लंडच्या सागरी मोहिमांना प्रोत्साहन का मिळाले?
भारतीय नौदलाच्या प्रमुखाला काय म्हणतात?
छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला सागरी किल्ला कोणता बांधला?
मराठा आरमारातील प्रमुख दोन नौका कोणत्या?
राधिका मेनन यांच्या नौसेनेत जाण्याच्या निर्णयाला विरोध करणारे कोण आहेत?
शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख अधिकारी कोण होते?
राधिका मेनन यांच्या नौसेनेत जाण्याच्या निर्णयाला विरोध का?