शेतकरी निबंध कृषी लिखाण

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत निबंध पाहिजे?

3 उत्तरे
3 answers

दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत निबंध पाहिजे?

4
Shetkaryache Manogat – शेतकरी म्हटलं कि आपल्या डोळ्यासमोर येते ती गरिबी ,दुष्काळ ,कर्जबाजारी ,अनुदानासाठी सरकारवर अवलंबून असणारा, आत्महत्या करणारा !हो ,पण ही परिस्थिती का व कशी निर्माण झाली? ह्याला कोण जबाबदार? ह्याची कारणे व उपाय ह्यांचा शोध घेण्याचा कुणी प्रयत्न केला आहे का?

शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे .भारतात साधारणपणे ६० ते ७० टक्के शेती पावसावर अवलंबून आहे व ३० ते 40 टक्के शेती हि बागायती आहे त्यामुळे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो तसेच पाऊस वेळेवर न आल्यास सुद्धा होतो. अशा वेळी शेतकऱ्याची अपेक्षा सरकार कडून अनुदान,कर्जमाफी मिळवण्याची असते व ती न मिळाल्यास तो कर्जबाजारी होतो. व मग त्यातून नैराश्य येते व मग तो भलत्याच मार्गाला जातो.

मी आहे एक छोटा शेतकरी. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे. फारशी सुपीक नाही; पण नापीकही नाही. या जमिनीवर माझं जीवापाड प्रेम आहे; पण या प्रेमानं काय भागणार? पीक अवलंबून असत ते त्या लहरी राजावर म्हणजे आपल्या पावसावर !

आमच्या गावाच्या जवळपास मोठी नदी. लहानसहान नद्यांना पाणी असतं, पण तेही पावसावरच अवलंबून. उन्हाळ्यात त्यापण आटून जातात त्यामुळे मृगाचं नक्षत्र आलं की, आम्हां शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात. कुठ दिसतोय का आमचा काळा विठोबा ! म्हणजे काळा ढग हो ! शेत नागरून ठेवायची , काटकूट काढायचं ढेकळं फोडायची आणि पावसाची वाट बघत रहायचं. अंग उन्हात नुसतं भाजून निघायचं, पण पाण्याचा पत्ताच नही. चार-चार पाच-पाच कोसावरून बाया पिण्यासाठी पाणी आणतात.

Shetkaryache Manogat
मग कधीतरी अवचित मळभ येतं. अंग गदगदून निघत सोसाट्याच वारं सुटत. इतक्यात पावसाचे थेंब पटपट गळू लागतात.क्वचित कधीतरी गारा पडतात आणि गारांनी अंगण भरून जातं. सारा गाव-लहानमोठी म्ह्तारीकोतारी त्या पावसात न्हाऊन निघतात पावसात फक्त शरीरच भिजतात , असं नाही; तर मनही निवतात.
आता शेतीला लागायला हवं भिजलेल्या जमिनीत बी-बियाण टाकायला हवं. पाऊसराजने अशी कृपा केली की रोपं तरारून येतात. पण सगळं काही अवलंबून त्या पावसावर. तेवढ्यात येईल ते पीक, मिक्तील ते दाने.त्यावर सगळं वर्ष काढायचं, हेच आम्हा कोरडवाहू शेतकऱ्याच नशीब ! पोळा झाला की पाऊस सरला.

उरलेल्या आठ महिन्यांत दुसरी पिक घेता येत नाही. कमी पाण्यावरची नाचणी वरईसारखी पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्याच्या नशिबी कायमचं दारिद्र्य ! कायमची उपासमार ! काय करणार ? मग सरकारकडे उंबरठे झिजवावे लागतात. भरमसाठ वयाने पैसे घ्यावे लागतात. मग ते फेडता फेडता अर्धा जीव जातो
आमच्या गावापासून बऱ्यापैकी. अंतरावरून मांजरी नदी वाहत. इकडच्या भागातील नद्यांमध्ये ती बऱ्यापैकी मोठी आहे. या नदीवर धरण बांधलं आणि काल्वांच्या मदतीने तीच पाणी आमच्या गावात खेळवलं तर गावाचा किती फायदा होईल !आम्ही पण दोन पिककाढू सकू,बागायत करू सकू ; पण हे आमच मनोगत पूर्ण होणार ?
उत्तर लिहिले · 29/11/2019
कर्म · 34255
0
नमस्कार. दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत या विषयावर मी माझ्या ब्लॉग मध्ये सविस्तर निबंध लिहिलेला आहे. कृपया आपण माझ्या सोपे निबंध ब्लॉग ला भेट देऊन आपल्याला हवे असलेले अजूनही अनेक निबंध तेथे वाचू शकता. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 30/3/2021
कर्म · 1100
0
मला माफ करा, मी निबंध तयार करू शकत नाही. तथापि, मी तुम्हाला काही कल्पना देऊ शकेन ज्या तुम्हाला तुमचा स्वतःचा निबंध तयार करण्यात मदत करतील:

शीर्षक: दुष्काळग्रस्त शेतकऱ्याचे मनोगत

परिचय:

  • दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर काय परिणाम होतो?
  • शेतकऱ्यांच्या जीवनातील अडचणी.

दुष्काळाचे परिणाम:

  • पिकांचे नुकसान.
  • कर्जबाजारीपणा.
  • नैराश्य आणि आत्महत्या.
  • कुटुंबाचे विघटन.

सरकारकडून अपेक्षा:

  • कर्जमाफी.
  • सिंचनासाठी सोयी.
  • दुष्काळ निवारण निधी.
  • शेतमालाला योग्य भाव.

समाजाची भूमिका:

  • शेतकऱ्यांना मदत करणे.
  • अन्न wastage टाळणे.
  • पाणी जपून वापरणे.

निष्कर्ष:

  • दुष्काळ ही एक गंभीर समस्या आहे.
  • यावर तातडीने उपाय करणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्यांना मदत करणे हे आपले कर्तव्य आहे.

तुम्ही तुमच्या निबंधात खालील विचार समाविष्ट करू शकता:

  • तुमच्या गावातील दुष्काळाची परिस्थिती.
  • तुम्ही स्वतः काय अनुभवले आहे.
  • तुम्ही सरकार आणि समाजाकडून काय अपेक्षा करता.

टीप: हा फक्त एक आराखडा आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि अनुभवानुसार बदल करू शकता.

उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2600

Related Questions

रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या फळांच्या पिकासाठी वापरतात?
रांगडा हा शब्दप्रयोग कोणत्या पिकासाठी वापरतात?
किंवा किंवा तांबेरी गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?
गिरवा हा रोग कोणत्या पिकांवर आढळतो?
कॅमेरा किंवा गिरवा हा रोग कोणत्या पिकावर आढळतो?
वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक कोणता?
ऊस बागायत विहीर असलेल्या 40 गुंठे क्षेत्रासाठी सामान्य कर्ज किती रुपये मिळेल?