मानसिक आरोग्य आर्थिक मानसिक स्वास्थ्य

माझी कुणी आर्थिक मदत करत नाही म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, योग्य आहे का? मला लवकरात लवकर उत्तर द्याल ही अपेक्षा आहे.

8 उत्तरे
8 answers

माझी कुणी आर्थिक मदत करत नाही म्हणून मी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे, योग्य आहे का? मला लवकरात लवकर उत्तर द्याल ही अपेक्षा आहे.

6
विनातारण किंवा without credit तुम्ही पैशाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या जीवनातील कोणीतरी एक व्यक्ती तरी असेल जी पूर्णपणे तुमच्यावर अवलंबून असेल व तिला तुमच्याकडून अपेक्षा असतील, तिचा विचार करा व नंतर आत्महत्येचा निर्णय घ्या.
उत्तर लिहिले · 25/11/2019
कर्म · 1630
5
🌺फक्त तू खचू  नकोस🌺

एक डाव हरला तरी
त्यात काय  एवढं...?

कुणीतरी जिंकलंच की,
हे ही नसे थोड...

संधी मिळेल तुलाही,
लगेच हिरमसु नकोस,
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...

               सूर्य रोजच उगवतो,
               त्याच  नव्या तेजाने...
               रोज मावळतीला जातो,
               रोजच्याच् नेमाने...
               येणे जाणे रितच् इथली,
               हे तू विसरु नकोस...
               आयुष्य खुप सुंदर आहे,
               फक्त तू खचु नकोस...

प्रेम तुझ्यावर करणारे,
कितीतरी लोक आहेत...
तुझ्यासाठी जोडणारे,
खुप सारे हात आहेत...
अरे अशाच आपल्यांसाठी,
तू ही थोड हसुन बघ...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...

               वाट तुझी बघत असतं,
               रोजच  कुणीतरी...
               तुझ्यासाठी जगत असतं,
               आस लावून प्रत्येक क्षणी...
               त्यांच्यासाठी तुलाही जगायचे,
               अश्रु तू गाळु नकोस...
               आयुष्य खुप सुंदर आहे,
               फक्त तू खचु नकोस...

उठ आणि उघडून डोळे,
पहा जरा जगाकडे...
प्रत्येकाच्या आयुष्यात,
काहीतरी असतेच् थोडे...
नाही नाही म्हणून,
उगाच कुढत तू बसु नकोस...
आयुष्य खुप सुंदर आहे,
फक्त तू खचु नकोस...

               सामर्थ्य आहे हातात जर,
               स्वप्ने डोळ्यात घेऊन चल...
               परिस्थितीशी भिडवून छाती,
               दोन हात करत चल...
               विजय तुझाच असेल,
               तेव्हा मागे वळून बघु नकोस...
               आयुष्य खुप सुंदर आहे,
               फक्त तू खचु नकोस...👍👍
0

आत्महत्या हा कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही. मला कल्पना आहे की तुम्ही खूप कठीण परिस्थितीतून जात आहात. आर्थिक अडचणींमुळे तुम्हाला खूप त्रास होत आहे हे मी समजू शकते. पण आत्महत्या केल्याने तुमच्या समस्या संपणार नाहीत, उलट तुमच्या प्रियजनांना कायमस्वरूपी दु:ख होईल.


तुम्ही एकटे नाही आहात:

अनेक लोक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अनेक मार्ग आहेत.


मदत उपलब्ध आहे:
  • शासकीय योजना: सरकार गरीब आणि गरजू लोकांसाठी अनेक योजना चालवते. त्या योजनांची माहिती घ्या आणि लाभ मिळवण्याचा प्रयत्न करा. https://maharashtra.gov.in/
  • स्वयंसेवी संस्था: अनेक स्वयंसेवी संस्था आर्थिक मदत पुरवतात. त्यांची मदत घेण्याचा प्रयत्न करा.
  • समुपदेशन: तज्ञांकडून समुपदेशन घेतल्यास तुम्हाला मानसिक आधार मिळू शकेल.

विचार करा:

आत्महत्या करण्यापूर्वी तुमच्या कुटुंबाचा आणि मित्रांचा विचार करा. त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे.


तात्काळ मदतीसाठी संपर्क साधा:

जर तुम्हाला आत्महत्या करण्याचे विचार येत असतील, तर कृपया खालील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधा:

  • आत्महत्या प्रतिबंध हेल्पलाइन: 022-27546669
  • आसरा: 022-27546669

धैर्य ठेवा आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. नक्कीच तुम्हाला यातून मार्ग मिळेल.
उत्तर लिहिले · 21/3/2025
कर्म · 2400

Related Questions

खूप कर्ज झाले आहे आणि काहीही सुचत नाही, टेन्शन पण खूप आहे. प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करावे?
क्रेडिट बी ऑनलाईन लोन बद्दल मला फोन येत आहेत, जरी मी त्यांच्याकडून लोन घेतलेले नाही, आणि ते अरे तुरे बोलून वेडी वाकडी उत्तरे देत आहेत. यावर काय उपाय आहे?
मी खूप कर्जबाजारी झालो आहे, मला आत्महत्या करावीशी वाटते?
सध्या मी जेथे भाड्याच्या घरात राहतो तेथे मला भाडे कमी आहे, पण शेजारी राहणारे लोक त्रास देतात, तर या लॉकडाऊनमध्ये जास्त भाडे देऊन खोली बदलणे शहाणपणाचे आहे की नाही व काम पण नाही, तर काय करावे? तुमचे मत काय?
मला एका हळद व्यापाऱ्याने 2.5 लाखांनी फसवले आहे. घर बांधकामासाठी मी कर्ज काढले होते. मला कोर्टात न जाता पैसे कसे काढता येतील?
ओटीपी विचारून फोन करून खात्यामधले पैसे काढले आहेत हे कसे ओळखावे? फ्रॉड असेल तर कसे ओळखावे?
माझ्या डोक्यावर खूप कर्ज झाले आहे. काही कारणामुळे माझी कंपनी बंद झाली आहे. तर आता ४-५ महिन्यांपासून माझे क्रेडिट कार्डची बिले थकली आहेत. बँकेत बोलून पण पर्याय निघत नाहीये. वसुलीवाले रोज घरी येऊन आणि माझ्या शेजाऱ्यांना पण जाऊन आता त्रास देऊ लागले आहेत. जीवनाचा अंत करावासा वाटायला लागला आहे?